Success Story- Farmer Producer Company ( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी )
Success Story- Farmer Producer Company ( यशोगाथा- शेतकरी उत्पादक कंपनी ) मित्रहो , शेतकरी उत्पादक कंपनी बाबत आपण मागील लेखात जाणून घेतलेहोते , संदर्भाकरिता लिंक बघा. ( https://aamhishetakari.blogspot.com / 2021/01/farmer-producer-organisation.html ). या लेखात जाणून घेऊ या की , आपल्या देशात शेतकऱ्यांच्या अश्या प्रकारच्या काही शेतकरी उत्पादक कंपन्या ( FPO- Farmer Producer Organization) अतिशय योग्य प्रकारे कार्य करीत असून आपल्या सभासदांना विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देत आहेत, तसेच योग्य नफा मिळवून घेत आहेत. अश्याच प्रकारची एक यशोगाथा उदाहरणादाखल समजून घेऊ या.......... राजस्थान मधील अशीच एक शेतकरी उत्पादक कंपनी आहे , भारत सरकारची संस्था - SFAC ( Small Farmers’ Agri-Business Consortium ) ने त्यांच्या योजनेमधून तयार केलेल्या ह्या शेतकरी कंपनीची ही यशोगाथा मराठी शेतकऱ्यांकरिता अनुवादित करून उपलब्ध करीत आहो. जेणेकरून या उदाहरणावरून मराठी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याबाबत उत्सुकता जागरूक होणार. केदारनाथ किसान अ ग्रो प्रोड्यूस...