Posts

Showing posts with the label कृषी कायदा

FPO Scheme (एफपीओ योजना)- Launch For 10,000 New FPOs Formation

Image
  FPO योजना - १०,००० नवीन शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करणे मित्रहो , नवीन शेती सुधार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने रु. ६००० कोटी रुपयांची तरतूद करून त्याअंतर्गत संपूर्ण देशभरात १० , ००० एफपीओ (फार्मर प्रोडुसर ऑर्गनायझेशन - शेतकरी उत्पादक संस्था) तयार करण्याकरिता योजना आणि त्यांची मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यामध्ये काय-काय तरतुदी केल्या गेल्यात याबाबत थोडक्यात जाणून घेऊया,    योजने ची उद्दीष्टे - १)    कार्यक्षम आणि शास्वत उत्पन्न देऊ शकेल, अश्याप्रकारच्या शेतीच्या विकासासाठी आणि एकूणच सामाजिक-आर्थिक विकासासाठी आणि कृषी क्षेत्राच्या कल्याणकारीतेसाठी नवीन 10,000 एफपीओ तयार करण्यासाठी समग्र आणि व्यापक व सहाय्यक अशी संरचना उपलब्ध करून देणे.   २)      कार्यक्षम, किफायतशीर आणि टिकाऊ संसाध नांचा वापर करून, शेतीची उत्पादकता वाढविणे, आणि त्यांच्या उत्पादनांसाठी उत्तम , सरळ,  बाजारपे ठेसोबत जोडून जास्तीत-जास्त नफा मिळवून देणे आणि सामूहिक प्र क्रियेतून त्याला शास्वत बनणे. ३)      एफपीओ चे...

Farm Reform Bill- 2020 in Marathi - शेती सुधार कायदा २०२०- मराठी

Image
शेती सुधार कायदा २०२०- मराठीमध्ये थोडक्यात   मित्रांनो , मागील १-२ महिन्यापासून सरकार आणि शेतकरी यांचेमध्ये आंदोलन चालले आहे , याचे कारण सर्वज्ञात आहे. तर चला, ज्या शेती सुघार कायद्यामुळे आज शेतकरी आणि सरकार या दोन्हीवर कठीण परिस्थिती निर्माण झाली , त्या कायद्यात असे काय आहे? तर आज आपण जाणून घेऊ या, “शेतकरी (सबलीकरण व संरक्षण) किंमती विषयक आश्वासन व शेती सेवा किंमत आश्वाषण आणि शेत सेवा कायदा - २०२०”           ह्या कायद्याला राष्ट्रपतींनी २४ सप्टेंबर २०२० ला स्वीकृती दिली.       कोण-कोणत्या गोष्टींचा समावेश कायद्यात केला आहे? - शेती उत्पादन (जसे गहू , तांदूळ किंव्हा इतर दाणेदार धान्ये , डाळी , भाज्या , फळे , कवची फळे , मसाले , ऊस), कुक्कुटपालन , वराहपालन , शेळीपालन , मत्स्यपालन, नैसर्गिक किंव्हा प्रक्रिया केलेले दुग्धजन्य पदार्थ, ढेप , पशुखाद्य, पिंजलेला व नपिंजलेला कच्चा कापूस, सरकी , कच्चा ताग आदि ,      हा कायदा कोणाला लागू आहे? - शेतकरी , कृषी व्यावसायिक संस्था, घाऊक विक्रेते , प्रक्रिया करणारे , निर्यातदार , शे...