लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार
लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या - थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे… असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया आहे, आपले शरिर हे जेवढे पोषक तत्वे हवी आहेत तेवढे घेऊन ज्यामधुन शरिरास हानी होईल अशी तत्वे लवघी वाटे, घामा वाटे, शौचावाटे बाहेर टाकते, त्यास जर मज्जाव केला तर शरिरात इतर आजारास वाढ होण्यास मदत होते म्हणुन कधीही कुठेही केव्हाही लघवी किंवा शौचास आल्यास वेळ लावु नये. त्याने शरिर निरोगी राहतेच शिवाय आजार होत नाही. काही १००% घरगुती उपचार सुचवत आहे ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी करून पहा व निरोगी रहा. 🔹दिवसातुन किमान एकदा ताक घ्यावी, आंबट नसावी व शक्यतो दुपारी घ्यावी. 🔹 ताकावरील जे पाणि असते त्यास ताकपरास म्हणतात, लघवीला होणार्या कोणत्याही समस्येवर ते पाणि अत्यंत गुणकारी असते, अंगावरील सुज पण त्याने उतरते. 🔹 तुरट...