लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार
लघुशंका / लघवीला त्रास- घरगुती उपचार
लघवीला त्रास होणे, जळजळ, कमी होणे, जास्त होणे, थोड्या - थोड्या वेळाने वारंवार जाणे, लघवीला वास येणे, लघवी होतांना दुखणे… असे बरेच त्रास होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लघवीला आल्यावर लघवी थांबवने, बर्याच वेळाने जाणे. ह्या कारणाने मग हळुहळु त्रास सुरू होतो व नंतर त्याचे आजारात रूपांतर होते. लघवी होणे हि एक शारिरीक व नैसर्गिक क्रिया आहे, आपले शरिर हे जेवढे पोषक तत्वे हवी आहेत तेवढे घेऊन ज्यामधुन शरिरास हानी होईल अशी तत्वे लवघी वाटे, घामा वाटे, शौचावाटे बाहेर टाकते, त्यास जर मज्जाव केला तर शरिरात इतर आजारास वाढ होण्यास मदत होते म्हणुन कधीही कुठेही केव्हाही लघवी किंवा शौचास आल्यास वेळ लावु नये. त्याने शरिर निरोगी राहतेच शिवाय आजार होत नाही. काही १००% घरगुती उपचार सुचवत आहे ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी करून पहा व निरोगी रहा.
🔹दिवसातुन किमान एकदा ताक घ्यावी, आंबट नसावी व शक्यतो दुपारी घ्यावी.
🔹 ताकावरील जे पाणि असते त्यास ताकपरास म्हणतात, लघवीला होणार्या कोणत्याही समस्येवर ते पाणि अत्यंत गुणकारी असते, अंगावरील सुज पण त्याने उतरते.
🔹 तुरटी फिरवुन पाणि कपभर घेतल्यास लघवी साफ होते.
🔹 लवघी करतांना हळुवार दात एकमेकांना दाबल्यास लघवीपुर्ण होते, वारंवार जावे लागत नाही.
🔹 १५ दिवसांतुन एकदा फक्त कोथींबीर चे ज्युस घ्यावे कपभर. वास येणे - दुखणे - जळजळ थांबते.
🔹 जीरे भाजुन त्याची पावडर पाण्यात किंवा ताकासोबत घेतल्यास लघवीचे बरेच त्रास कमी होण्यास मदत होते.
🔹 ज्यांना लघवीचा कोणताही त्रास आहे त्यांनी तीखट खाणे पुर्णता बंद करावे लवकर फरक पडतो.
🔹 मातीचा लेप ओटीपोटावर केल्यास लघवीच्या बर्याच समस्या कमी होतात.
🔹 रक्त येत असल्यास २ चमचे तांदुळ वाटीभर पाण्यात भिजवुन ठेवावे व नंतर ते तांदुळ चावुन खावे. लवकर आराम होतो.
वरील उपाय हे रोजच्या जेवणात किंवा सहज करता येईल त्याप्रमाणे केल्यास होणार्या असह्य वेदनेपुर्वीच रोखतां येऊ शकतात.
ह्याशिवाय अधीक त्रास असल्यास वैयक्तिक मेसेज करून पुर्ण माहिती देऊन उपचार घेऊ शकता.
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment