शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य- किसान क्रेडीट कार्ड (केसीसी)
शेतकऱ्यांकरिता आर्थिक सहाय्य- किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) प्रत्येक शेतकऱ्यांना शेती कामाकरिता नेहमीच आर्थिक चणचण जाणवत असते, आणि त्यामुळेच आहे त्या परिस्थितीत, मिळेल त्या प्रकारे निविष्ठा गोळा करून शेती करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असतो. खरंतर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य व्हावे, तसेच सावकाराकडून अधिक व्याजाचे कर्ज घ्यावे लागू नये या करिता सरकारच्या पिक कर्ज व किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) अश्या योजना तयार आहेत. परंतु माहितीच्या अभावामुळे शेतकरी त्याचा फायदा न घेता, सावकाराकडून किंव्हा इतर मार्गाने जास्त व्याजाने शेतीकरिता पैशाची उचल करीत असतो व त्याचा आर्थिक बोजा बसतो. तर चला किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) बाबत माहिती जाणून घेऊ या, किसान क्रेडिट कार्ड कर्ज योजना किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारची एक योजना आहे जे शेतकर्यांना वेळेवर पत (पैसा) उपलब्ध करुन देते. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजना १९९८ मध्ये शेतकर्यांना अल्प मुदतीच्या औपचारिक पतपुरवठा करण्याच्या उद्देशाने नाबार्ड ( नॅशनल बँक फॉर अग्रीकल्चर अंड रुरल डेव्हलपमेंट ) तर्फे सुरू करण्य...