Farmer Producer Organisation- शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी
शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक संघठन / शेतकरी उत्पादक कंपनी (FPO- Farmer Producer Organisation) मित्रहो , आज आपण बघुया फार्मर प्रोडुसर संस्था (FPO- Farmer Producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक संघठन / शेतकरी उत्पादक कंपनी काय असते, या बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. तर सर्वप्रथम हे समजून घेऊया कि, शेतकरी उत्पादक संस्था किंव्हा संगठन किंव्हा कंपनी हे शेतकऱ्यांना तयार करण्याची गरज आहे काय ? ढोबळमानाने वरील प्रश्नाचा विचार केल्यास, याचे उत्तर होय हे जास्त अभिप्रेत आहे...... याचे कारण असे की , नवीन शेती सुधार कायद्या २०२० नुसार शेतकऱ्याला मार्केट मध्ये टिकाव धरायचा असेल तर हे आवश्यक आहे. आपले शेतकरी हे छोटे-छोटे आणि असंघटीत आहेत , त्यामुळे त्यांना आता तशी बाजारात फारसा आदर-सम्मान मिळत नाही, आणि कोणीपण तोडण्याचा प्रयत्न करतो , मग तो दुकानदार असो , व्यापारी असो किंव्हा इतर कोणीही असो. आपल्या सर्वांना एकीचे बळ ही गोष्ट माहिती आहे. जर काट्या एकत्र बांधून असतील तर त्याला तोडणे...