Farmer Producer Organisation- शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी
शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक संघठन /
शेतकरी उत्पादक कंपनी
(FPO- Farmer Producer Organisation)
मित्रहो, आज आपण बघुया फार्मर प्रोडुसर संस्था (FPO- Farmer Producer Organisation) शेतकरी उत्पादक
संस्था / शेतकरी उत्पादक संघठन / शेतकरी उत्पादक कंपनी काय असते, या
बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.
तर सर्वप्रथम हे समजून घेऊया कि, शेतकरी उत्पादक संस्था किंव्हा संगठन किंव्हा कंपनी हे शेतकऱ्यांना तयार करण्याची गरज आहे काय?
ढोबळमानाने वरील प्रश्नाचा विचार केल्यास, याचे उत्तर होय हे जास्त अभिप्रेत आहे...... याचे कारण असे की, नवीन शेती सुधार कायद्या २०२० नुसार शेतकऱ्याला मार्केट मध्ये टिकाव धरायचा असेल तर हे आवश्यक आहे. आपले शेतकरी हे छोटे-छोटे आणि असंघटीत आहेत, त्यामुळे त्यांना आता तशी बाजारात फारसा आदर-सम्मान मिळत नाही, आणि कोणीपण तोडण्याचा प्रयत्न करतो, मग तो दुकानदार असो, व्यापारी असो किंव्हा इतर कोणीही असो. आपल्या सर्वांना एकीचे बळ ही गोष्ट माहिती आहे. जर काट्या एकत्र बांधून असतील तर त्याला तोडणे कठीण असते, आणि एक-एक काठी वेगवेगळी असेल तर त्याला सहजपणे तोडल्या जाते. ती कहाणी आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अगदी बरोबर लागू पडते. आपला शेतकरी हा छोटा आहे, त्याचेकडे संसाधने कमी आहेत, बाहेरील बाजाराला तोडून एकटे लढण्याची त्यांची सध्यापरीस्थितीत ताकत नाही, एकटा शेतकरी बाजारलॉबी तोडू सकत नाही, आणि म्हणूनंच आपल्या शेतकऱ्याला बाजारावर आपलं प्रभुत्व निर्माण करावयाचे असेल तर, शेतकरी उत्पादक संस्था किंव्हा संगठन किंव्हा कंपनी तयार करून, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता व क्वांटम वाढविणे, उत्पादकता वाढविणे, एकमेकांना मदत करणे, खूप-खूप गरजेचे आहे.
अश्याप्रकारच्या बर्याच शेतकरी उत्पादक संस्था / संघटना किंव्हा कंपन्या आहेत, ज्या अतिशय सुंदरप्रकारे कार्य करीत आहेत, आणि आपल्या सभासदांना कमी किमतीत बियाणे, खते, कीटनाशके, मशिनरी आणि शेती करण्याचे तंत्रज्ञान पुरवितात, या बरोबरच सभासदांना त्यांच्या उत्पादनाला अधिक भाव मिळवूनही देतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, सह्याद्री फार्मर प्रोडूसर कंपनी- नाशिक (https://www.sahyadrifarms.com), VAPCOL- वसुंधरा अग्री प्रोडूसर कंपनी लिमिटेड, जुन्नर तालुका फार्मर प्रोडूसर कंपनी लिमिटेड आदी, अश्या बऱ्याच शेतकरी उत्पादक कंपन्या यशस्विरित्या कार्य करीत आहेत, आणि आपल्या सभासदांना नफा मिळवून देत आहेत.
शेतकरी
उत्पादक संस्थेची संकल्पना काय आहे ?
विविध
प्रकारचे शेतकरी उत्पादक,
लहान आणि किरकोळ शेतक-यांचे गट, समूह
एकत्रीत येऊन, शेतीबाबत असणारी अनेक आव्हाने एकत्रितपणे सोडवणे, अशी शेतकरी
उत्पादक कंपनीची संकल्पना आहे,
तसेच सदर शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत एक प्रभावी संघटन तयार करून शेतीपयोगी गोष्टीकरिता त्याचा फायदा करून घेणे,
जसे की गुंतवणूक करणे, नवीन
तंत्रज्ञान अद्यावत करणे,
नवीन बाजारपेठ निर्माण करणे तसेच तयार
असलेल्या बाजारपेठेत आपले अस्थित्व निर्माण करणे, विविध
शेती पिकांचे उत्पादन घेणे, तसेच उत्पादित मालावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे
बाय-प्रोडक्ट बनविणे, कंपनी
मार्फत खरेदी-विक्री केंद्र उभारणे, मालाची प्रतवारी करून वर्गीकरण किंव्हा मालाची
श्रेणी करणे, मालाची
बाजारपेठेमध्ये मार्केटिंग करणे, कंपनी सदस्यांनी उत्पादित केलेला माल कंपनीच्या
नावाने ब्रँडिंग करून विक्री करणे, सदस्यांचे प्राथमिक उत्पादन निर्यात करणे
किंवा वस्तू किंवा सेवा आयात करणे. अश्या प्रकारे विविध उपक्रम करून आपल्या
सभासदांना अधिक नफा मिळवून देणे हा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यामागचा मुख्य
हेतू आणि संकल्पना आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी उत्पादक संस्था किंव्हा संघटन काय असते ?
प्राथमिक
शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांनी १० पेक्ष्या जास्त कितीही सदस्यांनी एकत्र येऊन सरकारी
कायद्यानुसार नोंदणीकृत केल्यास त्याला शेतकरी उत्पादक संस्था म्हणता येणार, शेतकरी
उत्पादक संस्था वेगवेगळ्या कायद्यात नोंदणीकृत करता येतात,
मग जर अशी संस्था कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत केली असेल तर त्याला शेतकरी
उत्पादक कंपनी असे म्हणता येणार. तर जर नोंदणी सोसायटी कायदा,
मल्टीस्टेट सोसायटी, शेक्सन २५, अश्या वेगवेगळ्याप्रकारे शेतकरी उत्पादक संस्थांची नोंदणी करता
येणार. १० पेक्ष्या जास्त कितीही शेतकरी एकत्र येऊन स्वतःच सभासद व स्वतःच
व्यवस्थापन करणारी स्वतःची संस्था किंव्हा कंपनी तयार करूण कायद्यानुसार नोंदणी
करतात, त्यालाच शेतकरी उत्पादक संस्था म्हणतात. अश्या संस्थांची नोंदणी सरकारच्या
वेगवेगळ्या कायदानुसार शेतकरी उत्पादक संस्था कायदेशीर होते.
शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्याकरिता शेती आधारित उत्पादन करणारा प्राथमिक उत्पादक शेतकरी किंव्हा शेतकरी गट आवश्यक आहे. प्राथमिक उत्पादक म्हणजे त्याने शेतमाल उत्पादन केला पाहिजे आणि तो खरोखरच शेतकरी किंव्हा अश्या शेतकऱ्यांचा गट असायला हवा.
१) शेतकरी, २) शेतकऱ्यांचे गट / समूह किंव्हा ३) क्रमांक १ आणि २ मिळूनही,
वरीलप्रमाणे
तीनहीपैकी कोणीही शेतकरी उत्पादक कंपनीचे सभासद बनू शकतात.
शेतकरी
उत्पादक कंपनी मध्ये सर्व सभासदांचे शेअर्स समान असतात,
त्यामुळे प्रत्येक सभासदांना कंपनीमध्ये समान अधिकार असतात. प्रत्येकाला समान
मतदानाचा अधिकार असतो.
शेतकरी उत्पादक कंपनी तयार करण्याकरिता किती सदस्यांची गरज असते ?
कमीत
कमी १० आणि त्यापेक्षा जास्त शेतकरी ज्यांची खरोखर शेती आहे, अश्यांनी एकत्र येऊन
शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करू शकतात. किंव्हा दोन किंव्हा त्यापेक्षा जास्त
संस्था ज्या खरोखरच शेती उत्पादन करतात, अश्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक
कंपनीची स्थापना करू शकतात. तज्ञांच्या सर्वेनुसार ६०० ते ७०० सभासदांची शेतकरी
उत्पादक कंपनी चांगल्याप्रकारे सफलतेने कार्य करू शकते, असा अभ्यास आहे.
शेतकरी उत्पादक कंपनी किती दिवसांनी रजिस्ट्रेशन मिळते ?
चार्टर्ड अकौंटंट द्वारा कंपनी रजिस्ट्रारकडे संपूर्ण आवश्यक दस्तावेज प्रस्तुत केल्यानंतर, कंपनी रजिस्टारला जर सर्व दस्तावेज कायद्याच्या नियमानुसार बरोबर समाधानकारक असल्यास, अर्ज दाखल केल्यानंतर 30 दिवसात कंपनी स्थापन झाल्याचा दाखला मिळतो, म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली.
शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी स्थापन करण्याचे फायदे काय आहेत ?
· शेतीला लागणारे बि-बियाणे, खते, किटनाशके, मशिनरीज, इतर साहित्य ठोक भावात, कमी भावात, शेताकर्यांच्या दारात होलसेल दरात उपलब्ध होणार.· पिकाला लागणारे माहिती व तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मदत होणार.
· शेतकर्यामध्ये मोलभाव करण्याची क्षमता निर्माण होणार.
· कोणतेही शेतातील उत्पादन जसे, तृणधान्य, कडधान्य, सब्जीवर्गीय उत्पादने, फळे, व इतर शेती उत्पादणाला शेतकरी ग्रेडिंग करून, पॅकिंग करून सरळ बाजारात विकू शकतील.
· शेतकरी स्वतः त्यांच्या उत्पादनावर प्रक्रिया करू शकतील आणि विक्री करू शकतील.
· सरकारी योजना मार्फत अधिक लाभ मिळवू शकतील - नवीन कृषी सुधार कायद्याच्या अंमलबजावणी करिता रू. ६००० करोड ची केंद्र शाशनामार्फत योजना, नाबार्डच्या विशेष योजना, अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या योजना, सन २०१९-२० च्या बजेट मध्ये ऑपरेशन ग्रीनला मंजुरी,
- नाबार्ड कडून सवलतीच्या दारात कर्ज उपलब्धता तसेच विविध प्रकल्पांना अनुदान,
- नाबार्डच्या प्रोड्युसर ऑर्गनायजेशन डेव्हलपमेंट फंड (PODF) तर्फे विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध आदी,
· आपले उत्पादन सरळ शहरामध्ये किंव्हा उपलब्ध मार्केटमध्ये विक्री करू शकणार.
· कंपनी स्वतःदेखील त्यांचे उत्पादन सरळ ग्राहकास विक्री करू शकतात.
· शेतकरी त्यांच्या मालाचा भाव स्वतः ठरवू शकत शकणार. गावातच रोजगार निर्माण होईल, नैसर्गिक आपत्तीपासून येणारे संकट कमी होईल, एखादवेळेस जरी सभासद सदस्याकडे उत्पादन नाही झाले तरी बाहेरून आणून त्यावर प्रक्रिया करून उद्योग आणि रोजगार सुरू राहील.
· फार्मर प्रोडूसर कंपनी मुळे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळणार.
· शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी झाल्यापासून पुढील ५ वर्ष तिच्या नफ्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
· शेतकरी उत्पादक कंपन्यांना जास्तीत जास्त कर्ज मिळण्यामध्ये सुलभता.
· सहकारी संस्थाना दिल्या जाणाऱ्या विविध योजना उत्पादक कंपन्यांना दिल्या जातात.
· समूह शेती तसेच समूह शेतीला लागणारे तंत्रज्ञान अगदी सुलभतेने उपलब्ध होऊ शकते.
वैयक्तिक शेतकऱ्याने शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये का सहभागी व्हावेत, शेतकऱ्याला काय लाभ मिळणार ?
वरीलप्रमाणे
फायदे बघितल्यानुसार ते फायदे प्रत्यक्ष्यरीत्या कंपनीच्या सभासदांना म्हणजेच वैयक्तिक शेतकऱ्याला होणारच, कारण
ह्या कंपन्या नेहमी आपल्या सभासदांच्या फायद्याकरिता कार्यरत असतात,
याव्यतिरिक्त शेतकरी उत्पादक कंपनी एकत्रितपणे मालाची विक्री करणार, प्रक्रिया
करणार किंव्हा काही मूल्य वर्धन करून त्यातून येणारा अधिकचा नफा हा सभासदांमध्ये
वाटून घेणार, शेतकऱ्याला त्याचे उत्पादन गावात किंव्हा नजीकच्या ठिकाणी चांगल्या
दराने, दलाली, हमाली, वराई, आडत, कमिशन, ट्रान्सपोर्ट यांच्या शिवाय विक्री करता
येणार.
शेती उत्पादक कंपनी कायद्याअंतर्गत शेतकरी कंपनी काय काय करू शकते ?
शेतमाल उत्पादन (कोणतेही पिक), प्रोक्यूरमेन्ट- शेत उत्पादन विकत घेने तसेच शेतीला आवश्यक वस्तूची ठोक भावात कमी दरात उपलभ करून देणे, शेतमालावर प्रक्रिया, पुलिंग- (शेतमाल एका ठिकाणी साठवणूक करणे), ग्रेडिंग व पेकेजिंग, हाताळणी, विपणन- मार्केटिंग, विक्री, निर्यात, आयात, करू शकते. कंपनी ह्या सर्व क्रिया स्वतः किंवा बाहेरील एखाद्या एक्स्पर्ट संस्थेकडून करून घेऊ शकतात.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कोणते व्यवसाय करू शकता ?
किसान सेवा केंद्रामार्फत बि-बियाणे, कीटकनाशके- खते पुरवठा करणे, अवजारे बँक चालविणे, हमीभावात शेतमाल खरेदी- विक्री करणे, शेतकऱ्यांना क्रेडीटवर रोपे अवजारे बी-बियाणे, खत-बियाणे देणे, प्रक्रिया उद्योग व विक्री, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, पोल्ट्री फार्मिंग, गोट फार्मिंग, डेअरी फार्मिंग, मिल्क प्रोजेक्ट, फिश प्रोजेक्ट, मशरूम प्रोजेक्ट, अंडी प्रोडक्शन, आयुर्वेदिक मेडिसीन प्लांट, बायोफ्युल डेवलपमेंट प्लांट, ॲग्री आणि रिटेल मार्ट, ऑरगॅनिक फार्मिंग व इतर ॲग्री प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग, कोल्ड स्टोरेज, किसान कॉल सेंटर, पापड उद्योग, फड-फुलाची शेती, करार पद्धतीने शेती करणे शेतकऱ्यांना पिकासाठी मोफत मार्गदर्शन करणे, सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे जसे (स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत अभियान, आमचं गाव आमचा विकास अभियान, समृद्ध शेतकरी अभियान, उन्नत शेतकरी अभियान, आरोग्य विकास उपक्रम, वृक्षरोपण अभियान इत्यादी).
शेतकरी उत्पादक संस्था कोणत्या प्रकारच्या सेवा देऊ शकतात ?
- आर्थिक सेवा
- कृषी निविष्ठा पुरवठा सेवा
- बाजारपेठ / विक्री सेवा
- तांत्रिक सेवा
- नेटवर्किंग सेवा
शेतकरी उत्पादक संस्था कोणत्या कायद्या अंतर्गत नोंदणी करता येते ?
१) सहकारी सोसायटी कायदा
२) मल्टीस्टेट कोओपरेटीव सोसायटी कायदा, २००२
३) प्रोडूसर कंपनी- शेक्सन ५८१ (c), भारतीय कंपनी कायदा. १९५६, सुधारित २०१३.
४) शेक्सन २५ कंपनी, भारतीय कंपनी कायदा. १९५६, सुधारित २०१३.
५) सोसायटी रजिस्टर- सोसायटी रजिस्ट्रेशन कायदा १८६०,
६) पब्लिक ट्रस्ट रजिस्टर- भारतीय ट्रस्ट कायदा १८८२.
(Source- small farmers agribusiness consortium)
शेतकरी
उत्पादक संस्थेची रचना-
शेतकरी उत्पादक संस्थेची रचना खालीलप्रमाणे असते,
· प्रत्येक संचालकांचे स्वतः प्रमाणित
केलेले पॅनकार्ड.
- प्रत्येक संचालकांचे आणि सभासदांचे स्वतः प्रमाणित केलेले आधार कार्ड.
· प्रत्येक संचालकांचे स्वतः प्रमाणित केलेले विज बिल किंव्हा बँक पासबुक झेरॉक्स (रहिवासी पुराव्यासाठी).
· तहशिलदार आणि तलाठ्याच्या सही शिक्क्यासह कृषक प्रमाणपत्र.
· स्वतःचा किंव्हा जवळच्या नातेवाईकाच्या नावावर असलेला ७/१२ उतारा.
· सर्व संचालकांचे शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्या सही शिक्क्यासह सर्वांचे मिळून एकत्रित प्रमाणपत्र.
· प्रत्येक संचालकांचा रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो.
· प्रस्थावित कंपनीसाठी कमीत-कमी ४ योग्य प्रस्थाविक नावे. कंपनी चे नाव ठेवतांना कंपनीला साजेसे आणि ज्यात शेतकरी, त्यांचे उत्पादन, बिझनेस याचा उल्लेख असावा.
· कंपनीकरिता प्रस्थावित कार्यालयाचा पत्ता, त्याचे वीजबिल आणि ऑफिस मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र (फार्मेट मध्ये).
· प्रत्येक संचालकांचे मोबाईल नंबर, इ-मेल आईडी, शैषणिक पात्रता, जन्माचे ठिकाण आणि शेअर्स रक्कम (फार्मेट मध्ये).
· मेमोरेन्डोम ऑफ असोसीएसन (कंपनीची घटना/ नियमावली).
· संचालक सभासदांची डीजीटल सही तयार करणे.
· कंपनीचा प्रस्थावित व्यवसाय याबाबत माहिती, आदी.
मान्यताप्राप्त
चार्टड अकाउंटटच्या सल्ल्याने आणि मदतीने शेतकरी उत्पादक संस्थेची नोंदणी करावी.
· समाजातील संभाव्य नेते/ कार्यकर्त्यांची निवड करणे.
· निवड केलेल्या कार्यकर्त्याबरोबर वारंवार चर्चा करणे.
· गावात संस्था स्थापन करणे बाबत, संस्थेबाबत समजावून सांगण्याकरिता लोकांच्या सभा घेण्याकरिता मदत करणे.
· शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याकरिता नेते/ कार्यकर्त्यांचा मुख्य गट तयार करण्यासाठी नामांकन करून घेणे.
· अनुभवानुसार शेतकरी उत्पादक संस्थेची रचना आणि व्यवस्थापणाची रचना तयार करणे.
· शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याची प्रक्रिया सुरु करणे.
· शेतकरी उत्पादक संस्थेकरिता निवळ केलेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी करणे.
· शेतकरी उत्पादक संस्थेच्या कामांची देखरेख आणि मूल्यमापन करणे, आदी.
शेतकरी उत्पादक संस्था / कंपन्यांची कार्यपद्धती-
शेतकरी
उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर एक मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.ई.ओ.-चिफ एक्सिक्युटीव्ह ऑफिसर) ची नेमणुक
करावी लागते. कंपनीसाठी सभासदांतून एक चेअरमनची नेमणुक करतात. कंपनीत किमान ५ तर
जास्तीत जास्त १५ डायरेक्टर असावेत. जे कंपनीच्या मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशन वर सही
करतील ते डायरेक्टर असतात. कंपनी कशाप्रकारे कार्य करेल याची रुपरेषा ही कंपनीच्या (A&A) आर्टिकल्स आणि (MoA) मेमोरॅन्डम ऑफ असोसिएशनमध्ये नमुद केलेले असावे. याच्या विरोधात
जावून कार्य केल्यास तसे करणा-या पदाधिका-यास किंवा सभासदास शिक्षेची तरतुद
कायद्यात तर आहेच पण तशी तरतुद आर्किटक्स आणि मेमोरॅन्डम मध्येदेखील करुन ठेवावी.
कंपनीच्या नफ्यापैकी काही भाग हा कायद्यानुसार कंपनी प्रशासनाने रिझर्व म्हणुन
काढून ठेवणे गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही शिल्लक राहील ते कंपनीच्या
मिटिंगमध्ये आणि नियमावलीत नमुद केल्याप्रमाणे तसेच कंपनी कायद्याच्या आधीन राहुन
सभासदात शेअरच्या किंवा डिविडंटच्या रुपात सर्व सभासदांना वाटप करता येते.
- कंपनी तिच्या सभासदांना
आर्थिक कर्ज देखील देवू शकते मात्र ते केवळ ६ महिने मुदतीचे असावे लागते.
- कंपनीचे अंतर्गत
लेखापरिक्षण हे मान्यताप्राप्त चार्टड अकाउंटट कडून करुन घेणे गरजेचे असते.
- जे कार्य करणारे सभासद
असतात त्यांना काही विशेषाधिकार देखील कंपनी प्रशासन प्रदान करु शकते.
- कंपनीचे शेअर हे
ट्रान्सफरेबल नसतात, सभासदाने सभासद होतांनाच तीन महिन्याच्या आत, सभासदाच्या
मृत्युनंतर कोणास त्याचे सभासदत्व ट्रान्सफर होईल हे कळवणे गरजेचे असते.
- कंपनी बोर्डाने वर्षातुन
एकदा जनरल मिटिंग घेणे बंधनकारक आहे, त्यामिटिंगची
वेळ ठिकाण आणि इतर बाबी सभासदांना कळवणे बंधनकारक आहे.
- बोर्ड मिटिंगसाठी कोरम हा
एकुण सभासद संख्येच्या एक तृतीयांश
जो कमीत कमी ३ असावा.
- ज्या कंपनीचा सतत तीन
वर्ष ५ करोड पेक्षा जास्त टर्नओव्हर होतो त्या कंपनीस पुर्णवेळ कंपनी
सेक्रेटरी ठेवणे गरजेचे आहे. कंपनी सेक्रेटरी हा इंस्टिट्युट ऑफ कंपनी
सेक्रेटरीज ऑफ इंडियाचा सभासद असणे बंधनकारक आहे.
शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करण्या करिता किती खर्च येतो ?
साधारणपणे
३९६०० रुपये खर्च येऊ शकतो, परंतु आपल्या चार्टड अकाउंटटची फी किती आहे त्यानुसार
थोडा यात फरक असू शकतो.
शेतकरी उत्पादक कंपनी करिता सरकारच्या कोणत्या योजना मदत करतात ?
·
नाबार्ड
द्वारे अश्या कंपन्यांना कर्ज पुरवठा केला जातो. ज्याच्या आधारे कंपनी स्वतःचा
विकास करू शकते.
·
इक्विटी ग्रॅन्ट योजना: SFAC, Delhi या संस्थेकडून शेतकरी उत्पादक कंपन्यांना १५ लाख
रुपये पर्यंत इक्विटी ग्रॅन्ट दिली जाते.
·
क्रेडिट ग्यारंटी फंड: SFAC, Delhi या संस्थेकडून उत्पादक कंपन्यांना त्यांच्या
प्रोजेक्टच्या ८५% किंवा जास्तीत जास्त १ कोटी रुपयापर्यंतचे कर्ज विनातारण व कमी
व्याज दाराने दिले जाते.
·
अवजारे बँक: उत्पादक कंपन्यांना विविध प्रकारची अवजारे आणि
यंत्र सामग्री भाडे तत्वावर आणि सुलभ हप्ताने दिले जातात, याकरिता सरकार मदत करीत
असते.
·
स्मार्ट (SMART) प्रकल्प: जागतिक बँक आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमाने
राज्यातील १० हजार गावांमध्ये स्टेट ऑफ महाराष्ट्राज अग्रिबिझिनेस अँड रूरल ट्रान्सफार्मेसन
(स्मार्ट).
·
बिनव्याजी बिनातरण प्रकल्प कर्ज: शेतकरी उत्पादक कंपन्यांना
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा तर्फे १० लाख रुपये बिनातरण
बिनव्याजी प्रकल्प कर्ज दिले जाणार.
शेतकरी उत्पादक संस्थाचे बिझनेस प्लान कसे करायचे तसेच काही FPO ची यशोगाथा, याबाबत पुढील लेखात जाणून घेऊ या......




Its very nice info
ReplyDeleteThanks Sir
DeleteThanks Sir
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThe fpo registration is a free, open source software project that aims to provide an easy way for programmers to create and share programs. The FPO has been developed by the Open Source Initiative (OSI), a group of researchers and developers who want to make it easier for people to build software.
ReplyDelete