Posts

Showing posts with the label शेतकरी कंपनी

FPO- FAQ Series (Part-1)

Image
  FPO - शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया.  उत्पादक संस्था म्हणजे काय असते? कोणत्याही शेती वा पशुपालन वा ग्रामीण कारागीर यापैकी कोणत्याही क्षेत्रातील प्राथमिक उत्पादकांनी एकत्रित येऊन एक कायेदेशीर तयार केलेली नोंदणीकृत संस्था म्हणजेच उत्पादक संस्था होय. उदा. शेतकरी, दूध उत्पादक, मच्छीमार, विणकर, ग्रामीण कारागीर, इतर कारागीर आदि.  उत्पादक संस्था ही  एक उत्पादक कंपनी, सहकारी संस्था किंवा इतर कोणताही कायदेशीर फॉर्म मध्ये नोंदणीकृत करू शकतो व त्यात आपल्या  सदस्यांमध्ये नफा / फायदे वाटून घेण्याची तरतूद केलेली असते. शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) म्हणजे काय? शेतकरी उत्पादक संस्था हा एक उत्पादक संस्थेचा च ( Producer Organisation ) एक प्रकार आहे , ज्याचे सदस्य हे शेतकरी असतात , म्हणून त्याला शेतकरी उत्पादक संस्था असे म्हणतात. शेतकरी उत्पादक संस्थेचे ...

FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act

Image
  FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act मित्रहो , मागील लेखात आपण (FPO- Farmer producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था याबाबत सविस्तर जाणून घेतले, त्यामध्ये आपण बघितले की , शेतकरी उत्पादक संस्थेचे रजिस्ट्रेशन आपण ०६ प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीनुसार करू शकतो , परंतु बहुतेक शेतकरी उत्पादक संस्था ह्या सहकारी सोसायटी कायदा  ( Cooperative Society Act) किंव्हा भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) अश्या दोन कायद्यानुसार नोंदणी केलेल्या आहेत, किंबहुना केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार नवीन तयार करावयाच्या शेतकरी संघटनांचे रजिस्ट्रेशन या दोन कायद्यांतर्गत करण्याकरिता नियोजन केले आहे.  तर आपण जाणून घेऊ या की , “सहकारी सोसायटी कायदा  ( Cooperative Society Act) ” आणि “भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) ”  यातील फरक समजून घेऊ या , जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावात शेतकरी उत्पादक संस्था ( FPO ) तयार करावयाचे ठरल्यास, त्यांची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार करावी याचा निर्णय घेता येऊ शकतो.     १)     नोंदणी- ...

Farmer Producer Organisation- शेतकरी उत्पादक संस्था / कंपनी

Image
  शेतकरी उत्पादक संस्था  /  शेतकरी उत्पादक संघठन  /   शेतकरी उत्पादक कंपनी   (FPO- Farmer Producer Organisation) मित्रहो , आज आपण बघुया   फार्मर प्रोडुसर संस्था   (FPO- Farmer Producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक संघठन / शेतकरी उत्पादक कंपनी   काय असते, या बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. तर सर्वप्रथम हे समजून घेऊया कि,  शेतकरी उत्पादक संस्था   किंव्हा संगठन किंव्हा कंपनी हे शेतकऱ्यांना तयार करण्याची गरज आहे काय ? ढोबळमानाने वरील प्रश्नाचा विचार केल्यास, याचे उत्तर होय हे जास्त अभिप्रेत आहे...... याचे कारण असे की ,  नवीन शेती सुधार कायद्या २०२० नुसार शेतकऱ्याला मार्केट मध्ये टिकाव धरायचा असेल तर हे आवश्यक आहे. आपले शेतकरी हे छोटे-छोटे आणि असंघटीत आहेत , त्यामुळे त्यांना आता तशी बाजारात फारसा आदर-सम्मान मिळत नाही, आणि कोणीपण तोडण्याचा प्रयत्न करतो , मग तो दुकानदार असो , व्यापारी असो किंव्हा इतर कोणीही असो. आपल्या सर्वांना एकीचे बळ ही गोष्ट माहिती आहे. जर काट्या एकत्र बांधून असतील तर त्याला तोडणे...