FPO- FAQ Series (Part-1)

 FPO- शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न


मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया. 

उत्पादक संस्था म्हणजे काय असते?

कोणत्याही शेती वा पशुपालन वा ग्रामीण कारागीर यापैकी कोणत्याही क्षेत्रातील प्राथमिक उत्पादकांनी एकत्रित येऊन एक कायेदेशीर तयार केलेली नोंदणीकृत संस्था म्हणजेच उत्पादक संस्था होय. उदा. शेतकरी, दूध उत्पादक, मच्छीमार, विणकर, ग्रामीण कारागीर, इतर कारागीर आदि. उत्पादक संस्था ही एक उत्पादक कंपनी, सहकारी संस्था किंवा इतर कोणताही कायदेशीर फॉर्ममध्ये नोंदणीकृत करू शकतो व त्यात आपल्या सदस्यांमध्ये नफा / फायदे वाटून घेण्याची तरतूद केलेली असते.

शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) म्हणजे काय?

शेतकरी उत्पादक संस्था हा एक उत्पादक संस्थेचा(Producer Organisation) एक प्रकार आहे, ज्याचे सदस्य हे शेतकरी असतात, म्हणून त्याला शेतकरी उत्पादक संस्था असे म्हणतात. शेतकरी उत्पादक संस्थेचे साधारणतः शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी सहकारी सोसायटी असे प्रकार करता येतील.

शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी) म्हणजे काय?

शेतकरी उत्पादकांनी एकत्र येऊन जी उत्पादक संस्था तयार केली असेल, त्या उत्पादक कंपनीची नोंदणी जर भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत केले तर त्याला शेतकरी उत्पादक कंपनी म्हणता येईल.

शेतकरी सहकारी सोसायटी (फार्मर को-ऑपरेटीव सोसायटी) म्हणजे काय?

शेतकरी उत्पादकांनी एकत्र येऊन जी उत्पादक संस्था तयार केली असेल त्या उत्पादक कंपनीची नोंदणी जर सहकारी संस्था अधिनियम कायद्याअंतर्गत केले तर त्याला शेतकरी सहकारी सोसायटी म्हणता येईल.

शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त लोकांची (बिगर शेतकरी) उत्पादक संस्था (पीओ) होऊ शकते काय?

वरील प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. उत्पादक संस्था (पीओ) ही एक प्राथमिक उत्पादकांची संस्था आहे. शेती व्यतिरिक्त उत्पादन करणारे उत्पादक जसे- हातमाग किंवा हस्तकला, मासेमारी, आदींनी एकत्र येऊन जर उत्पादक संस्थेची स्थापना केली असल्यास बिगर शेतकरी उत्पादक संस्था असू शकते. त्यांचा उद्देश हा आपल्या सभासदांना चांगले उत्पन्न प्राप्त करून देणे हा असणार आहे. ते सुद्धा त्यांच्या उत्पादनाचे एकत्रिकरण, मूल्यवर्धन किंव्हा विक्री करून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यास संधी निर्माण करून देऊ शकतात व अधिक उत्त्पन्न सुनिश्चित करू शकतात.

शेतकरी किंव्हा बिगर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची गरज आहे काय?

भारतात 85% पेक्षा जास्त लहान आणि सीमांत शेतकरी आहेत, ज्यांची जमीन दोन हेक्टरपेक्षा कमी म्हणजेच सरासरी जमीन धारण क्षमता १.३३ हेक्टर प्रती शेतकरी कुटुंब इतकी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे आणि खते, किटकनाषक यासारख्या शेतीला लागणाऱ्या गोष्टी वाजवी दराने खरेदी करणे शक्य नाही, बाजारात बार्गेनिंग करू शकत नाही, उत्पादनांला चांगले मूल्य मिळत नाही, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू शकत नाही, तांत्रिक शेती करू शकत नाही. इत्यादी बाबींचा सामना करावा लागतो. अश्याप्रकारे बहुसंख्य छोटे उत्पादक त्यांच्या शेतीतून योग्य उत्पन्न घेण्यात आणि स्वतःची आर्थिक प्रगती करण्यास सक्षम नसतात. दुसऱ्याबाजूला बिगर-शेती क्षेत्राच्या बाबतीत उत्पादनाच्या गुणवत्ता आणि बाजारपेठ यासंबंधित जास्त समस्या आहेत. उत्पादनाची डिझाईन, नाविन्य, एकत्रीकरण आदि ह्या देखील मुख्य समस्या हेत.

म्हणूनच वरील समस्या लक्ष्यात घेता, छोटे, व मध्यम शेतकऱ्यांनी किंव्हा उत्पादकांनी एकत्रित येऊन कमी किंमतीत शेतीला आवश्यक गोष्टीची पूर्तता करणे, शेतीतून निघणारे उत्पादन जास्तीत जास्त किमतीत विक्री करण्याकरिता एकत्रितपणे बाजारपेठेची व्यवस्था करणे. शेतीची उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान, मशिनरीज आदी उपलब्ध करणे. उत्पादक संस्थेची स्थापना करून शेतकऱ्यांना आवश्यक पतपुरवठा करणे, आदि सर्व गोष्टी शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करून छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना तसेच बिगर शेती उत्पादकांना अधिक लाभ मिळविणे शक्य आहे आणि म्हणूनच शेतकरी किंव्हा बिगर शेतकरी उत्पादक संस्था तयार करणे खूप गरजेचे आहे.

###############

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय