FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act
FPO Registration- Cooperative Society act & Indian Company Act
मित्रहो, मागील लेखात आपण (FPO-Farmer producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था याबाबत सविस्तर जाणून घेतले, त्यामध्ये आपण बघितले की, शेतकरी उत्पादक संस्थेचे रजिस्ट्रेशन आपण ०६ प्रकारच्या कायद्याच्या तरतुदीनुसार करू शकतो, परंतु बहुतेक शेतकरी उत्पादक संस्था ह्या सहकारी सोसायटी कायदा (Cooperative Society Act) किंव्हा भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act) अश्या दोन कायद्यानुसार नोंदणी केलेल्या आहेत, किंबहुना केंद्र सरकारच्या नवीन योजनेनुसार नवीन तयार करावयाच्या शेतकरी संघटनांचे रजिस्ट्रेशन या दोन कायद्यांतर्गत करण्याकरिता नियोजन केले आहे.
तर आपण जाणून घेऊ या की, “सहकारी सोसायटी कायदा (Cooperative Society Act)” आणि “भारतीय कंपनी कायदा (Indian Company Act)” यातील फरक समजून घेऊ या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गावात शेतकरी उत्पादक संस्था (FPO) तयार करावयाचे ठरल्यास, त्यांची नोंदणी कोणत्या कायद्यानुसार करावी याचा निर्णय घेता येऊ शकतो.
१) नोंदणी- शेतकरी उत्पादक संस्थेची नोंदणी ही “को-ओपरेटीव सोसायटी एक्ट” किंव्हा “इंडिअन कंपनी एक्ट” मध्ये करता येतो. को-ओपरेटीव सोसायटी एक्ट मध्ये नोंदणी केल्यास त्या शेतकरी उत्पादक संस्थांना “सहकारी सोसायटी” म्हणता येणार किंव्हा इंडिअन कंपनी एक्ट मध्ये नोंदणी केल्यास त्याला “उत्पादक कंपनी” म्हणून संबोधता येणार.
२) उद्देश- सहकारी सोसायटीचा उद्देश फक्त एकच (Single object) असतो. तर, उत्पादक कंपनीचा उद्धेश एकापेक्षा अधिक (Multi-objects) असू शकतात.
३)
कार्यक्षेत्र- सहकारी सोसायटीचे
कार्यक्षेत्र हे प्रतिबंधित (Restricted & Discretionary) तसेच
मुखत्यारित, मर्यादित क्षेत्रापुरते असते. तर, उत्पादक कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत
देश असू शकते.
४)
सदस्यता- सहकारी सोसायटीचे सदस्य हे व्यक्ती आणि सहकारी संस्था असू शकतात तर, उत्पादक कंपनीचे सदस्यत्व हे व्यक्ती, व्यक्तींचा गट, संघटन किंव्हा वस्तू व सेवां पुरविणारे उत्पादक
यांना मिळू शकते.
५)
शेयर- सहकारी सोसायटीचे शेयर
हे विक्री करू शकत नाही. तसेच, उत्पादक कंपनीचे शेयर हे विक्री करू शकत नाही,
परंतु समान भागात सदस्यांमध्ये हस्तांतरित करता येतो.
६)
नफ्याची हिस्सेदारी/ सामायीकरण (Profit sharing)- सहकारी सोसायटीत शेयरनुसार मर्यादित लाभ मिळू शकतो, तर उत्पादक कंपनीत व्यवसायाच्या नफ्याच्या प्रमाणात हिस्सेदारी मिळू शकते.
७)
मतदानाचा अधिकार- सहकारी
सोसायटीच्या
सदस्यांना “एक सदस्य- एक मत” असा मतदानाचा अधिकार असते परंतु, सरकार किंव्हा
सहकार समिती रजिस्ट्रारला विटोचा अधिकार असतो. तर, उत्पादक कंपनीच्या सदस्यांना “एक
सदस्य- एक मत” असा अधिकार असतो, परंतु कंपनीच्या लेन-देन / व्यवहारात सामील
असलेल्या सदस्यांना मतदानाचा अधिकार नाही.
८)
सरकारचे नियंत्रण- सहकारी
सोसायटीवर सरकारी
यंत्रणेचे नियंत्रण खूप जास्त असते. तर, उत्पादक कंपनीवर सरकारी यंत्रणेचे
खूप कमी आणि फक्त संविधानिक बाबींपुरतेच नियंत्रण असते.
९)
स्वायत्तता- सहकारी सोसायटीला वास्तविक जगाशी
मर्यादित स्वातंत्र असते. तर, उत्पादक कंपनीला पूर्णपणे
स्वतंत्रता दिलेली असते. स्वतः तयार केलेल्या नियमावलीत राहून कार्य करण्याकरिता कंपनी
पूर्णपणे स्वतंत्र्य आहे.
१०)
राखीव/ संचय (Reserve)- सहकारी
सोसायटीला नफा
झाल्यास ते संचय करु शकतात. तर, उत्पादक कंपनीला प्रत्येक वर्ष संचय
करणे अनिवार्य आहे.
११)
कर्ज घेण्याकरिता आजादी- सहकारी
सोसायटीला कर्ज
घेण्यास मर्यादा आहेत. तर, उत्पादक कंपनीला कर्ज घेण्यास अधिक स्वातंत्र्य आणि
अधिक विकल्प असतात.
१२)
इतर व्यावसायिक/ कारोबारी घराणे/ गैर
सरकारी संस्था (NGO’s) यांचेबरोबर
संबंध- सहकारी सोसायटीने
व्यावसायिक,कारोबारी घराणे किंव्हा गैर सरकारी संस्था यांचेबरोबर संबंध
ठेवणे हे त्यांच्या लेन-देनवर/ व्यवहारावर आधारित असते. तर, उत्पादक कंपनीमध्ये उत्पादक आणि
कारोबारी एकत्रितपणे येऊन उत्पादक कंपनीची निर्मिती करू शकतात, त्यामुळे त्यांना व्यावसायिक,कारोबारी घराणे किंव्हा गैर सरकारी संस्था
यांचेबरोबर संबंध ठेवण्यास काही बंधने नाहीत.
यावरून आपणास लक्ष्यात आले असेल की, सहकारी संस्थापेक्षा (Cooperative Society) उत्पादक कंपनी (Producer Company) ला जास्त स्वातंत्र्य आहे आणि अधिक
व्यवसाय करायला वाव आहे.
(FPO-Farmer producer Organisation) शेतकरी उत्पादक संस्था याबाबत अधिक जाणून घेण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा)- https://aamhishetakari.blogspot.com/2021/01/farmer-producer-organisation.html
$$$$$$$$$$$$$$$$$$$

Comments
Post a Comment