जमिनीतील सेंद्रिय कर्ब व शेतीतील त्याचे महत्त्व


बरेच शेतकरी माती परीक्षण करतात किंबहुना ते करायलाच पाहिजे. माती परीक्षण अहवालात सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये किती प्रमाणात आहे, याबाबत माहिती दिलेली असते. परंतु शेतकऱ्यांना त्या बाबत माहिती नसते. 

  तर आज आपण सेंद्रिय कर्ब याबाबत जाणून घेऊ या...... 


जमिनीतील सेंद्रिय कर्ब-

मातीतील सेंद्रिय कर्ब किंव्हा सेंद्रिय कार्बन हा जमिनीतील सेंद्रिय पदार्थ मोजण्याचा घटक आहे. सेंद्रिय पदार्थ बहुतेक मातीच्या 2-10% या प्रमानात असते, आणि शेतीमध्ये मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घडामोडीत याची खूप महत्वाची भूमिका असते. सेंद्रिय पदार्थ अन्नद्रव्य धारण करणे आणि  त्यांची जमिनीत उलाढाल करणे , मातीची रचना घडविणे, जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि त्याची पिकाला उपलब्धता करून देणे असा महत्वाचा रोल सेंद्रिय कर्बचा असतो. या व्यतिरिक्त प्रदूषनाचा ऱ्हास आणि कार्बन सीक्वेस्ट्रेशनमध्ये यावर आवलंबून असते.

मातीतील सेंद्रिय पदार्थ-

सेंद्रिय पदार्थ म्हणजे प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा यापासून बनलेले असते आणि त्यात खूप कमी प्रमाणात इतर घटक जसे- नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जैविक अवशेषांमध्ये असतात. हे साधारणतः 'जिवंत' आणि 'मृत' घटकांपासून  तयार होतात, जसे की पिकांचे अवशेष, खूप वर्षापासून कुजलेले साहित्य, जमिनीखालील असलेले सेंद्रिय पदार्थ जसे- मुळे आदी तसेच प्राणी आणि सूक्ष्मजीव असे 'जिवंत' घटक.

मातीतील सेंद्रिय कार्बन आणि कार्बन सीक्वेस्ट्रेशन

वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईड कमी करून हवामानातील बदल (Climate Change) कमी करण्याचा एक महत्वाचा मार्ग म्हणजे सेंद्रिय कार्बन हा घटक होय. असा दावा केला जातो, की  शेती आणि पशुपालन अशा मोठ्या क्षेत्रांवर सेंद्रिय कार्बन खूप कमी प्रमाणात वाढ होत असल्यामुळे वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडमध्ये लक्षणीय घट होत आहे. वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी ठेवायचे असल्यास जमिनीतील सेंद्रिय पदार्थात  नियमित वाढ करायला पाहिजे. 


म्हणजेच जमिनीत जास्तीत जास्त कंपोस्ट खत, शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचे खत, पालापाचोडा जास्तीत जास्त टाकायला पाहिजे. त्यामुळे आपल्या जमिनितील सेंद्रिय कर्ब / सेंद्रिय पदार्थात जास्तीत जास्त प्रमानात वाढ होऊन पर्यावरण संतुलित राहण्यास मदत होईल, तसेच हवामानातील बदल (Climate Change) रोखण्यास मदत होईल किंबहुना आपल्या जमिनीची पोत/ प्रत सुधारणार हा अधिक महत्वाचा फायदा आहे. 

सेंद्रिय कर्बाचे नियमित प्रमाण असल्याने होणारे फायदे-

जमिनीत सेंद्रिय कर्बाच्या अस्तित्वामुळे सूक्ष्मजीव व पिकाला आवश्यक जिवाणू वाढीस गती प्राप्त होते. जीवाणूंच्या संख्येत वाढ झाल्यामुळे खालीलप्रमाणे फायदे होतात.

जमिनीच्या भौतिक गुणधर्मात सुधारणा होते.

जमिनीचा घट्टपणा कमी होऊन मातीच्या कणाकणांतील पोकळी वाढते. परिणामी जमिनीमध्ये हवा खेळती राहते.

हलक्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. भारी काळ्या जमिनीत अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो.

मातीची धूप कमी होते. मातीची जडणघडण सुधारते.

रासायनिक द्रव्यांची उपलब्धता वाढते.

नत्र आणि स्फुरद उपलब्ध होतो.

रासायनिक नत्राचा ऱ्हास होत नाही.

जमिनीचा सामू नॉर्मल / उदासीन (6.5 ते 7.5) ठेवण्यास मदत होते.

आयन विनिमय क्षमता वाढते.

चुनखडीयुक्त जमिनीत अन्नद्रव्यांची स्थिरता कमी होते.

जमिनीची आघात प्रतिबंधक क्षमता वाढते.

अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेवर चांगला परिणाम होतो.


आशा करतो कि,आपणास या लेखातून सेंद्रिय कर्ब बाबत योग्य माहिती मिळाली असेल, याव्यतिरिक्त माहिती हवी असल्यास कॉमेण्ट मध्ये लिहा आणि पुढील लेख वाचण्याकरिता AAMHI SHETAKARI आम्ही शेतकरी पेजला FOLLOW करा. पुढील लेखात जमिनीचा PH याबाबत जाणून घेऊ या..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय