चहा
चहा ☕
मग सकाळी उठल्यावर चहा प्यावा की नाही ?
अगदी सकाळी उठल्यावर तोडं धुतले की
लगेचच चहाची गरजही नसतेच !
वास्तविक रिकाम्यापोटी घेतलेला चहा
हा काही वेळाने लागणार्या भूकेलाही नाहीशी करतो.
म्हणजेच चहा प्यायचा टाळला
तर नाष्ट्याची भूक कडकडून लागते.
हा अनुभव प्रत्येकाने घेतला तरच कळतो…
चहा न घेता तसेच राहीले असता..
पित्ताचा काळ हा सकाळी १० ते दुपारी २ असल्याने
ह्या काळात चांगली भूक लागते.
चहा हे पेय शीतप्रदेशाचे पेय आहे.
थंड प्रदेशात गारठा कमी व्हावा म्हणून
चहा/कॉफी पाना ची पद्धती आहे.
▪ आपल्याकडे फारतर पावसाळ्यात व हिवाळ्यात चहा/कॉफी प्यायला हरकत नाही परंतु तो गोदुग्ध युक्त असावा.
▪अति तुरट किंवा कडू रसात्मक असा नसावा.
▪परंतु जे पित्तज प्रकृती आहेत, ज्यांना पित्ताचे विकार संभवतात त्यांनी चहा शक्यतो अतिप्रमाणात टाळावा.
त्यांना ऐवजी गोदुग्ध + गोघॄत (गाईचे तूप) + साखर घ्यायला हवे.
▪ चहा बनवताना त्यात सुंठ व वेलची पावडर टाकावी म्हणजे पचनास मदत होते,
पित्त वाढत नाही व इंद्रियांचा जडावलेपणा दूर होतो.
▪ चहा मध्ये दूध असते त्यामुळे चहा बरोबर बिस्किट इत्यादि नाष्टा इत्यादि खाऊ नये !
तसे खाल्यास विरुद्धान्न होते.
मूळ नियम = प्राणिज दुधाबरोबर ( गायी/शेळी/म्हशीच्या/आईच्या दुधासह ) + मीठ / आंबट / ताजीफळे एकत्रित खाणे = विरुद्धान्न !
मीठ
मीठ असलेले पदार्थ जसे चपाती / थेपला / चकली / फरसाण / शेव / ऑमलेट इ.
आंबट
आंबट पदार्थ जसे इडली / डोसा / सॉस / टोमॅटो-कोकम-चिंच-युक्त पदार्थ / लोणची / इ.
ताजी फळे
फळे जसे शिकरण, फ्रुटसॅलॅड / मिल्कशेक / कस्टर्ड इ.
प्रकारात फळ + दुध वापरले जाते.
(अपवाद फक्त हापूस आंबा हे फळ म्हणून आपण आमरस खातो )
▪मग नाष्टा आणि दूध /चहा पिणारच असा हट्ट
किंवा दिनक्रम असणार्यांनी
नाष्टा व दूधात किमान ४५ मिनीटांचा अवकाश(गॅप) ठेवावा.
▪चहाची वेळ
साधारण सकाळी उठल्यावर नाष्टा करायचा असल्यास
नाष्ट्याच्या आधी किंवा नंतर ४५ मिनीटे चहा घ्यावा. सोबत नाष्टा नकोच !
▪ जर नाष्ट्याची भूक नसेल व उत्साह जाणवत नसेल
तर वरील प्रमाणे बनवलेला चहा सकाळी ८ ते १० मध्ये एकदाच घ्यावा.
व तदनंतर संध्याकाळी ५ ते ६ मध्ये घ्यावा.
▪डायबेटीस,रक्तदाब,थायरॉईड इ, एलोपेथिक औषधी सेवन केल्यावर भूक लागते, किंवा
त्या वा तदसम औषधांना काहीतरी नाष्टा करण्याची आवश्यकता असते
अश्यावेळी चहा-बिस्किट असा आहार घेतला जातो.
चहा सोबत नाष्टा करु नये. अगदीच रहावत नसेल तर १ मीठ नसलेली ताजी चपाती व चहा घ्यावा.
▪ बर्याच मराठी घरांत, नाष्टा बनवायला वेळ नाही किंवा करायचा कंटाळा म्हणून सकाळी चहा + चपाती खाल्ली जाते.
▪चहात दूध असते व चपातीत मीठ म्हणून हे विरुद्धान्न आहे. ह्याने हळूहळू अनेक व्याधी निर्माण होऊ शकतात.
तरीही, चहाचपातीच खायची असल्यास चहात दूध असल्याने चपाती बिनमिठाची करावी.
▪ चहा वारंवार पिऊ नये. त्याने पित्तवृद्धी व अग्निमांद्य संभवते. करपट ढेकरा पोटफुगी मलावष्टम्भ होऊ शकते.
▪काहींना ग्रीन टी / ब्लॅक टी / प्लेन कॉफी (दुग्ध विरहीत) घेण्याची सवय असते.
विशेषतः एसी ऑफिस मध्ये काम करणारे IT Field मधील व्यक्ती !
▪वातजप्रकृतीच्या व्यक्तींना एसीच्या गार वातावरणात शरीरतापमान कमी पडल्याने गारठ्यामुळे त्वचेतील पित्त कोष्ठात (पचनसंस्थेत) आल्याने भूकेची जाणीव होऊ शकते ! त्यांनी दुध युक्त कॉफी घ्यायला हरकत नाही !
▪पित्तज प्रकृती वाल्यांनीही असेच भूकेची जाणीव झाल्यास कॉफी घ्यावी. कोराचहा / ब्लॅक टी नको ! फारतर फार ग्रीन टी घ्यावा.
▪कफज प्रकृतींनी मात्र ब्लॅक / ग्रीन टी घेतल्यास हरकत नाही !
© वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक,
7350911888,9420242484
आनंदी रहा, निरोगी रहा !!!
Comments
Post a Comment