आयुर्वेद समज/गैरसमज

 आयुर्वेद समज/गैरसमज 


1) रोज सकाळी उठल्यावर गार पाणी ,साधे पाणी  कोमट पाणी ,लिंबू पाणी,गरम पाणी मध लिंबू,पंचामृत असे पिल्यास शरीर शुद्ध होते आणि अनेक छोटे मोठे त्रास कमी होतात असे कुठे ही आयुर्वेदात म्हणलेले नाही..

2)गरम पाणी आणि मध एकत्र करू नये.

3)आयुर्वेदात शाम्पू,conditionar,साबण,फेस पॅक बनवण्याची कृती लिहिलेली नाही.

4) कडधान्ये खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते हा अजून एक गैरसमज आहे.

5)एका आठवड्यात ३ पंचकर्म असे आयुर्वेद सांगत नाही

6)रोज ३,४ लिटर पाणी पिल्यास बाथरूम धुतल्याप्रमाने किडन्या पण धुतल्या जातात..हे आयुर्वेद सांगत नाही.

7)तहान लागेल तेवढेच पाणी प्यावे..जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यावे.

8)आयुर्वेदात बिस्किटांची कृती नाही. आयुर्वेदीक बिस्किटे असा प्रकार अस्तित्वात नाही.ते एक निव्वळ थोतांड आहे 

9)स्पा आणि wellness center म्हणजे आयुर्वेद नव्हे.

10)मासिक पाळी च्या वेळी लोणच्याला हात लावू नये ..लोणचे खराब होते हा अजून एक गैर समज आहे.

11) कोणत्याही वस्तूच्या मागे किंवा पुढे आयुर्वेद शब्द जोडला की वस्तू विकण्यास सोपी होते.हा केवळ मार्केटिंग चा फंडा आहे...आयुर्वेदात नसलेल्या गोष्टी आयुर्वेदाच्या नावावर खपवल्या जातात.

12)आयुर्वेदीक औषधांना side effects नाहीत हा एक गोड गैरसमज आहे ..आयुष काढे पिऊन कित्येक लोकांना acidity,piles, तोंड येणे असे अनेक त्रास झालेले प्रत्यक्ष पाहिले आहेत.

13) कोलेस्टेरॉल फ्री वस्तू अस्तित्वात नाहीत .

14)आयुर्वेदीक चहा,tooth paste, तेल, डिटर्जंट हे हर्बल प्रॉडक्ट्स आयुर्वेदाच्या नावाखाली खपवले जात आहेत.

15) आयुर्वेदीक औषधांनी गुण येण्यास वेळ लागतो हा अजून एक गैर समज.. आजार जुना असेल तर कोणत्याही औषधांनी बरा होण्यास वेळ हा लागतोच.

16)Sugar free गोष्टी खाल्ल्याने रक्तातील साखर वाढत नाही ..असे आयुर्वेद सांगत नाही

17) मंत्रतंत्र, बुवाबाजी,भोंदू वैद्य,रस्त्याच्या कडेला बसणारे हकीम ..हा खरा आयुर्वेद नाही

18) An apple a day keeps a doctor away .. हा सुविचार आयुर्वेदात नाही

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय