वात, पित्त, कफ आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदामध्ये तीन प्रकारच्या प्रकृती सांगितल्या आहेत वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती
वात प्रकृती
* शरीराची शरीराची ठेवण उंच व बारीक .
* राठ व जाड केस.
* लहान व ठिसूळ हाडे
* खरखरीत, रुक्ष, काळपट व फुटणारी त्वचा .
* सहज दिसणाऱ्या शिरा.
* जलद व अस्थिर हालचाली.
* कर्कश किंवा घोगरा आवाज.
* धांदरट स्वभाव .
वातदोष असंतुलित झाला असता, मानसिक व चेतासंस्थेचा त्रास होऊ शकतो, वजन खूप वाढते वा कमी होते, रक्ताभिसरणाचे समस्या येऊ शकतात.
अपथ्य
मटार ,हरभरा ,पावटा,चवळी,राजमा, उडीद,कोबी, फ्लॉवर, अळू, कच्चा कांदा, शिळे व कोरडे पदार्थ ,थंड पाणी, शीतपेये.
पित्तप्रकृती
* मध्यम व नाजुक अंगयष्टी.
* मऊ शिथिल व मस्से असणारी त्वचा.
* लालसर, पिवळसर चेहरा.
* पिंगट रंगाचे व लवकर गळणारे केस.
* पिंगट ,लालसर डोळे.
* जास्त घाम येण्याची सवय.
* तहान व भुकेचे प्रमाण अधिक.
* हुशार, सरळ - साधा स्वभाव.
* चटकन राग येण्याचा स्वभाव .
* तीव्र भावना.
पित्त दोष असंतुलित झाला असता, शरीरातून वाफा निघाल्याची भावना होते, तसेच त्वचा रोग होऊ शकतात.
अपथ्य :
कैरी ,सिमला मिरची, गवार, कच्चा हिरवा टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा, चिंच ,आंबट दही ,मद्य, इडली, डोसा, ब्रेड वगैरे आंबवलेले पदार्थ ,अननस ,तळलेले पदार्थ, पिस्ता ,लस्सी.
कफ प्रकृती
* किंचीत स्थूल व मजबूत अंगयष्टी.
* मऊ-मुलायम व विपुल केस .
* मुलायम त्वचा, तेजस्वी कांती.
* संथ व संयमित हालचाली.
* तेजस्वी व प्रेमळ डोळे.
* उत्तम धारणाशक्ती .
* उत्तम स्मरणशक्ती.
* शांत व समजूतदार व श्रद्धाळू स्वभाव.
* संयमित भावना.
कफ प्रकृतीच्या व्यक्तींना फुप्फुस, घसा ,सांधे व रक्तवाहिन्यांचे विकार होण्याची शक्यता अधिक असते.
अपथ्य :
उडीद, रताळे,साबुदाणा, पेरू, सीताफळ, रामफळ, श्रीखंड ,चीज, पनीर, रसमलाई, बर्फी, चॉकलेट वगैरे मिठायांचे अतिसेवन.
आपण आपली कोणती प्रकृती आहे आणि त्यानुसार आपण पथ्य पाळावे.
संधर्भ-
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888 9420242484 .
निरोगी राहा, आनंदी राहा !!
Comments
Post a Comment