संधिवात

 संधिवात 

संधिवात नावावरून लक्षात येते की सांध्याच्या ठिकाणी वातदोष वाढल्याने संधिवात होतो. व्यवहारात संधिवात असा शब्द रूढ असला तरी आयुर्वेदात त्याला संधिगतवात असे नाव दिलेले आहे.

 वातपूर्णदृतिस्पर्श: शोध: सन्धिहते ङनिले । 

 *प्रसारणाकुच्ञनयोः प्रवृत्तिश्च सवेदना ।। .. चरक चिकित्सास्थान 

जेव्हा वायू प्रकुपित होऊन सांध्यांचा आश्रय घेतो तेंव्हा सांधे सुजतात, सांध्यांचे आकुंचन प्रसरण वगैरे हालचाली वेदनामय होतात व सांध्यांचा स्पर्श हवेने भरलेल्या पिशवीप्रमाणे जाणवावयास सुरुवात होते. यालाच संधिगतवात म्हणतात.

* स्नेहन : विशिष्ट औषधांनी सिद्ध तेल बाहेरून लावणे व खाण्यासाठी तूप वापरणे.

* स्वेदन  : आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्नान घेणे किंवा शेक करणे.

* चवीला गोड, आंबट, खारट, स्निग्ध व उष्ण वीर्य असलेले पदार्थ खाणे.

* वात वाढलेला ठराविक भाग हाताने दाबणे किंवा कपड्याने घट्ट बांधून ठेवणे. 

* वातशामक द्रव्यांनी बनवलेल्या काढ्याने स्नान करणे.

* चिंता व शोक वगैरेंचा त्याग करून सुखात व आरामात जगणे.

* ताजे , गरम व पचायला हलका स्निग्ध असा आहार घेणे.

*थंड व दमट वातावरण असताना गरम वा कोमट पाणी पिणे.

वाढलेल्या वातामुळे हाडांची झीज होते , त्यामुळे सांधे ठणकायला लागतात. गुडघेदुखी नंतर त्यातून सांधेदुखीचा त्रास व्हायला सुरुवात होते. मनावर असलेल्या ताणामुळे शरीरातील उष्णता वाढून या प्रकारे सुद्धा त्रास होऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे. गुडघेदुखी असो, संधिवात असो त्यावरचा मुख्य उपचार म्हणजे शरिरात वाढलेल्या प्रकुपित झालेला मास कमी करणे. त्यासाठी चरकाचार्यांनी पुढील उपचार सांगितले आहेत.

* शरीराला स्निग्धता देणाऱ्या अन्नाचे यांचे नियमित सेवन करावे उदा. दूध, लोणी , तूप विशेष आहारामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने बनविलेल्या साजूक तुपाचा योग्य प्रमाणात तुपाचा रोज पाच-सहा चमचे समावेश केला आणि मुख्य म्हणजे अभ्यंग करण्याचा द्रव्यांनी सिद्ध आयुर्वेदिक तेल आणि सर्वांगावर, सांध्यांवर लावावे.

*आयुर्वेदिक औषधांनी सिद्ध केलेले तेल हलक्‍या हाताने गुडघ्यामध्ये जिरवणे उत्तम असते गुडघे दुखत असताना हा प्रयोग दिवसातून दोन-तीन वेळा करावा पण दुखत नसतानाही पुढे कधी असा त्रास होऊ नये यासाठी अधूनमधून तेल लावणे चांगले होईल .

* नियमित योगासने करावी व चालायला जावे.

* संधिगत वातावरण वरील प्रमाणे वातशामक उपचार उत्तम आहेतच बरोबरीने योगराज गुग्गुळ, सिंहनाद गुग्गुळ, अमृतादि गुग्गुळ, अश्वगंधा, पुनर्नवासव ,दशमूलारिष्ट  गोक्षुरादी चूर्ण वगैरे औषधांचाही चांगला उपयोग होतो.

 * सांधे दुखायला लागल्यावर नुसत्याच वेदनाशामक गोळ्या इंजेक्शन घेऊन रोग दाबून आतल्या आत रोग वाढवत राहण्यापेक्षा अशा प्रकारची  कारण वगैरे काही गोष्टी ध्यानात घेऊन केलेले उपचार निश्चितच अधिक सोयीस्कर होईल .* 

 अशा उपचारा बरोबर घरच्या घरी करता येण्यासारखे काही प्रभावी उपचार खालील प्रमाणे आहे.

* दोन चमचे सुंठ व दोन चमचे एरंडेल मुळाची भरड चार कप पाण्यात उकळावी एक कप पाणी राहिल्यावर गाळून घ्यावं हा काढा नियमित थोडे दिवस घेतल्यास परसाकडे/ शौचास साफ होऊन सांध्यावरील सूज व वेदना कमी होतात.

* निर्गुडीची पाने पाण्यामध्ये उकळून त्याच्या वाफेने सांधा शेकल्यास सूज व वेदना कमी होतात.

* सूज व वेदना कमी होण्यास एरंडाची पाने वाफवून, कुटून तयार केलेला कल्प सांध्यावर बांधावा.

* रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप एकत्र करून छोट्या सुपारीएवढी तयार केलेली गोळी खाल्ल्यास  गुडघेदुखी कमी होते.

* पोळी किंवा भाकरीचे पीठ मळताना एक चमचा  एरंडेल तेल ( सुंठ सिद्धी) मोहन टाकवे व ती पोळी किंवा भाकरी गरम असताना खावी या उपायाने निश्चित फायदा दिसून येतो.

* अशक्तता असल्यामुळे सांधे दुखत असल्यास मेथीचे किंवा डिंकाचे लाडू खाल्ल्याने फायदा होतो याने सांध्यामधील झीज भरून येण्यास मदत मिळते आणि बरे वाटते.

* गुडघे दुखी होऊ नये किंवा बरी व्हावी म्हणून वेळेवर पंचकर्म करून घेणेही उत्तम होय . शास्त्रोक्‍त  पंचकर्मामध्ये अगोदर स्नेहन- स्वेदन केले जाते त्यानंतर बस्ती, जानु - बस्ती, संधी पोटली उपचारांना उत्तम गुण येताना दिसतो.

 पथ्य :  गहू ,तांदूळ, दुधी, दोडका, घोसाळी , पडवळ , तोंडली, ढेमसा, कोहळा , काकडी,  मूग,  तूर , उडीद, द्राक्ष, दूध, तूप, लोणी, आले , लसूण, गरम पाणी .

 अपथ्य : चवळी, वाल, पावटा, छोले, मटार, गवार, कारले, कैरी, कच्चा टोमॅटो , चिंच, आंबट दही, श्रीखंड , फ्रिजमधील थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स , इडली , डोसा वगैरे आंबवलेल्या पदार्थाचं अतिरिक्त सेवन.

पथ्य:  

ज्या गोष्टी पाळाव्यात किंवा प्रकृती स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत करतात ते पथ्य.

 अपथ्य: 

  या गोष्टी टाळाव्यात खाऊ नये ते आपथ्य किंवा कुपथ्य.

 टिप : उपचारापूर्वी वैद्यांचा सल्ला आवश्यक आहे.

संधर्भ,

 वैद्य विश्राम माळाकोळीकर 

 श्रीराम आयुर्वेदिक 

 7350911888,9420242484 

निरोगी रहा, आनंदी रहा!!!

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय