सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

 सोयरासिस (अ‍ॅक्ने) सारख्या त्वचाविकारांवर परिणामकारक आयुर्वेदीक उपाय

रक्तामधील अशुद्धीमुळे अ‍ॅक्नेचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच ब्रेकआऊटचा त्रास कमी करण्यासाठी रक्तशुद्धीचा पर्याय सर्वप्रथम सुचवला जातो. रक्तासोबत शरीरात टाकाऊ घटक आणि कार्बन डायऑक्साईडचादेखील प्रवाह होतो. त्यामुळे या घातक घटकांना बाहेर काढणे आवश्यक असते.  काही नैसगिक उपायांनी रक्तातील अशुद्धता कमी करण्यास मदत होते. यामुळे सोयरासिस, गजकर्ण (eczema)यासारखे अनेक त्वचाविकार कमी करण्यास मदत होते.

फळं :  

संत्री, रास्पबेरी, किवी, अ‍ॅव्हॅकॅडो, द्राक्षं या सारखी मुबलक पाण्याचा समावेश असणारी फळं आहारात घ्या. यामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. यामुळे त्वचा तजेलदार होते.

हर्बल टी :  

चहा पिणे चांगले की वाईट हा अनेकांसाठी वादाचा मुद्दा आहे. मात्र त्यामध्ये काही हर्ब्स मिसळल्यास शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. काही हर्बल टी पसंतीनुसार घरी बनवता येतात. आलं, पेपरमिंट  हर्बल टी घरी देखील बनवता येतात.

हर्ब्स - :

पळस, बदाम, अळशी, बभूळ  यांची पानं नैसर्गिकरित्या औषधी असतात. यामुळे रक्तामधील अशुद्धता कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचाविकारांवर परिणामकरक गुण दाखवतात.  दुर्वांंचा रस गरम पाण्यासोबत प्यायल्यास नक्कीच फायदा होतो.

हिरव्या पालेभाज्या : 

हिरव्या पालेभाज्यांमध्ये पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे नियमित जेवणात पालेभाज्यांचा समावेश  करणे आवश्यक आहे. यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. ब्रोकोली, गाजर, बीट, कोबी, पालक अशा भाज्यांमध्ये अ‍ॅन्टी कॅन्सर आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे यकृताला रक्त डीटॉक्स करायला  मदत होते. परिणामी अनेक त्वचाविकार कमी होण्यास मदत होते.

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय