वातप्रकोपाची लक्षणे
वातप्रकोपाची लक्षणे
* सांधा निखळणे किंवा गर्भाशयासारखा अवयव खाली घसरणे .
* एखाद्या अवयवाचा आकार वाढणे उदा. पायाच्या शिरा फुलणे .
* हात ,पाय ,सुन्न होणे .
* कोणत्याही प्रकारची वेदना उदा. ठणकने, सुई टोचल्याप्रमाणे दुखणे, त्रिशूल भोसकल्याप्रमाणे दुखणे, पिरगाळले गेल्याप्रमाणे दुखणे वगैरे सर्व प्रकारच्या वेदना होणे.
* खांदा ,पाठ , मान वगैरे अवयव जखडून जाणे.
* कारण नसतानाअंगावर काटा येणे.
* थरथर, कंप सुरू होणे.
* त्वचा, डोळे, तोंड, योनी वगैरे अवयवांच्या ठिकाणी कोरडेपणा जाणवणे.
* डोळा फडफडणे किंवा शरीरावर इतरत्रही आंतून स्पंदन जाणवणे.
* त्वचा काळसर , कोरडी व निस्तेज होणे.
* हाडे ठिसूळ होणे.
* शरीर शुष्क होणे, वजन कमी होणे. * आवाज कर्कश होणे.
* मन अतिशय चंचल व अस्वस्थ होणे.
* झोप न येणे.
* थकवा जाणवणे व त्यामुळे काम करण्यास उत्साह न वाटणे.
* मलप्रवृत्ती कडक होणे,पोटात वायू धरणे .
* गरम तापमानाच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे .
अशी लक्षणे दिसत असल्यास वात वाढलेला आहे असे समजावे .
याऊलट वात प्रमाणापेक्षा कमी झाला तर,
* शारीरिक हालचाली मंदावतात.
* बोलायची इच्छा होत नाही.
* काहीच आवडेनासे होते, म्लानता येते.
* इंद्रियांची ज्ञानग्रहण करण्याची शक्ती मंदावते .
वाताचे नानात्मज 80 विकार सांगितले आहेत. वातदोष जसा सर्वापेक्षा जास्त कार्य करतो तसा सर्वाधिक रोगही तयार करतो. वाताचे काही महत्वाचे नानात्मज विकार खालील प्रमाणे आहेत,
* आक्षेपक* ( झटके येणे )
* पक्षाघात ( अर्धांगवायू )
* अर्दित ( चेहऱ्याचा अर्धा भाग वाकडा होणे )
* सायटिका
* कटिग्रह ( कंबर जखडणे )
* निद्रानाश
* मिन्मिनत्व ( अस्पष्ट व अडखळत बोलणे ).
वातज विकार वातप्रकृती असणाऱ्या व्यक्तींना सहज होऊ शकतात व
वातप्रकोप खालील कारणांनी होऊ शकतो .
* कडू , तुरट व तिखट पदार्थ तसेच थंड वीर्याचे व तापमानाचे पदार्थ अतिप्रमाणात खाणे . हेल्थफूडच्या नावाखाली आज-काल कारल्याचा रस , कडूनिंबाचा रस प्यायला दिला जातो याचाही अंतर्भाव यात होतो.
* कोरडे, नि:सत्व पदार्थाचे सेवन करणे .
* वाळवलेले पदार्थ उदा.वाळवलेल्या भाज्या, सुकवलेले मासे, पापड वगैरे पदार्थाचे सेवन करणे.
* चना, वाटाणा, पावटा, चवळी, छोले, मटार वगैरे कडधान्यांचे सेवन करणे.
* उपवास करणे किंवा कमी प्रमाणात खाणे .
* शरीरशक्तीपेक्षा अधिक व्यायाम करणे किंवा परिश्रम करणे.
* जोराजोरात बोलणे तसेच सतत बोलणे.
* उंचावरून खाली पडणे, अपघात होणे.
* खूप प्रवास करणे, दुचाकी, गाडी, रिक्षा, बस, विमान अशा कोणत्याही वाहनातून दीर्घकाळ प्रवास करणे.
* रात्री जागरण करणे.
* मल ,मूत्र , वायू , उलटी वगैरे वेग आले असता जबरदस्तीने.अडवून धरणे.
* सतत चिंताग्रस्त राहणे, भय , शोक, उद्वेग, क्रोध यांचा अतिरेक होण्यानेही वातप्रकोप होऊ शकतो.
पुढील भागात आपण वातदोषावरचे सामान्य उपचार पाहू या..
संधर्भ-
वैद्य विश्राम माळाकोळीकर,
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888 9420242484
निरोगी रहा, आनंदी रहा !!
Comments
Post a Comment