पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त झाडाचे महत्त्व


 

पारिजातक (हरसिंगार) प्राजक्त :- 

हे झाड दहा ते पंधरा फूट उंच वाढते. हे झाड समुद्रमंथनातून निघाले असा पुराणात उल्लेख आहे. तसेच माता कुंतीने पांडवांच्या अज्ञातवासात असताना सत्यभामेच्या वाटिकेतून पारिजातक भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणला होता ते ठिकाण उत्तरप्रदेशातील बारांबाकी जिल्ह्यातील किन्नूर हे गांव आहे. तसेच इंद्रदेवाच्या शापामूळे याला फळ येत नाही असे पौराणिक उल्लेख आहेत. असो. याची फुले फार सुकुमार असते, सुवासिक असते. फुले रात्री फुलतात व सकाळी गळून पडतात. याचा दूरवर सुगंध पसरतो.

पारिजातकाची पाने, फुले, साल, व बिया औषधांत वापरतात.

 औषधी उपयोग:- 

पोटात जंत झाल्यास याच्या पानांचा अंगरस खडीसाखरे बरोबर दिल्यास जंत मरतात.

कफरोग आणि दमारोगात सुकलेली साल एक ते दोन गुंजा या प्रमाणात नागवेलीच्या पानातून दिवसातून तीन ते चार वेळेस द्यावी.

केसांत कोंडा झाल्यास बियांची पेस्ट करून लावावी. याने लगेच फरक पडतो.

लघवीला सारखी होत असल्यास पारिजातकाची साल, पाने व फुले यांचा काढा करून सात दिवस प्यावा. सात दिवसात फरक पडतो.

गालगुंड झाल्यास पारिजातकाचा पाला, वेळूचा पाला एकत्र वाटून सात दिवस लेप करावा.

डोक्यात खवडे झाल्यास पारिजातकाच्या बिया वाटून लेप करावा.

मलेरियाच्या तापात ताज्या पानांचा अंगरस व आद्रकाचा रस मधातून द्यावा. 

अंगात मुरलेल्या तापात सुंठ, मिरी व पिंपळी पारिजातकाच्या रसातून द्यावे. याने चांगला गुण येतो. अशा तापामध्ये यकृत व प्लिहा मोठी झालेली असते ती पूर्वस्थितीत येते.

गजकर्णावर पारिजातकाचा रस वरवर लावावा.

हृदयविकारात पारिजातकाच्या फुलांचे सेवन करावे.

पारिजातकाच्या पानांचा रस सतत पिल्याने सांधेदुखीमध्ये फार फायदा होतो.

पारिजातकाचे तेलाने तोंडावरील काळे डाग कमी होतात.

पारिजातकाचे औषध घेत असताना दूध, तूप व साखरेचे सेवन करावे असा प्रघात आहे.

अजूनही भरपूर फायदे आहेत ते पुढील भागात सांगितले जातील..

कोणतेही औषध घेण्यापूर्वी तज्ज्ञांच्या सल्ल्याने घ्यावी.

श्रीराम आयुर्वेदिक

निरोगी रहा, आनंदी रहा !!🙏

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय