घरगुती उपचार - डिप्रेशन/मानसिक त्रास

 

घरगुती उपचार 


👤 डिप्रेशन/मानसिक त्रास 


नमस्कार 🙏🏼 … आत्ताच्या या जलदगती युगात बहुतांश वेळेस आपण डिप्रेशन ने ग्रासलेले व्यक्ती फार प्रमाणात पाहतो, तसे डिप्रेशन हा रोग नसुन एक विशिष्ठ वेळेत मेंदुवर अतिप्रमाणात विचारांचा ताण किंवा जीवनात अशी एखादी घटना ज्याने व्यक्ती पुर्णता नैराश्येने ग्रासुन जातो, आणि नंतर सुरू होते डिप्रेशन ची वाताहात. जर योग्य वेळेस त्यावर काही उपाय न जाल्यास व्यक्ती पुर्ण आयुष्य त्यामध्येच राहतो. जास्तकरून याचे प्रमाण हे विवाहीत स्रीवर्ग, तरूण वयातील प्रेमप्रसंग, कामधंद्यात मोठे नुकसान, किंवा वैवाहिक जीवनातील तणाव ह्याच्या जास्त तक्रारी असतात, तसे याची अनेकानेक कारणे असतात पण या जलदगती युगात हे सर्रास पाहायला मिळतात. 

तसे यावर डॅाक्टरी, आयुर्वेदीक उपाय भरपुर आहेत पण आज आपण काही मोजके घरगुती उपचार पण जाणुन घेऊया. 


➡️ याची लक्षणे :- गॅस - पित्त वाढणे, सतत विचारांत राहणे, सतत चिडचिड होणे, अतिशय राग येणे, रात्री झोप न येणे किंवा कमी झोप, बोलतांना आपले म्हणने स्पष्टपणे सांगता न येणे, अनामिक भीती वाटणे, याशिवाय अनेक लक्षणे असतात पण मुख्यता हि लक्षणे जास्त दिसतात. 


 उपचार :- खालील काही मोजके परंतु परिणाम कारक उपाय सुचवत आहे, ज्यांना असे डिप्रेशन वाटत असेल त्यांनाही सांगा व एक निरोगी मानवता मिशन ला सहयोग करा, एक स्वस्थ भारत बनवुया. 


➡️ ७ इलायची २ लिटर पाण्यात उकळुन घ्या, पाणि २५० मि. होईपर्यंत उकळावे, पाणि गार जाले कि त्यामध्ये हलकेसे काळेमिठ टाकावे, व सकाळी/ संध्याकाळी असे दोन वेळेस ते पाणि प्यावे. ५ दिवस नियमित. 

➡️ १ इलायची ( पावडर ) व १ बादाम ची ( पावडर ) साजुक तुपात टाकुन तुप गरम करून घ्यावे, तुप गार जालेवर ते तुप नाभीमध्ये सोडावे व तसेच किमान ४५ मीनीट शांत झोपावे. सकाळी व रात्री. १० दिवस नियमित करावे. 

➡️ उजव्या व डाव्या पायाचा पुर्ण अंगठ्यावर हिंगाचा लेप दररोज करावा. 

➡️ खाण्यामध्ये हिंग तसेच सुंठाचा वापर फायदेशीर आहे. 

➡️ कडुलिंबाच्या पानांचा बारिक करून लेप तयार करावा व मानेवर तो लेप करावा. 

➡️ तिखट व ज्या पदार्थावर पित्त वाढेल असे पदार्थ वर्ज्य करावे. 

➡️ दररोज दुपारी एकवाटी दही खावे. ( आंबट नसलेले ) 

➡️ दिवसातुन एकदा काळेमिठ किंवा साधेमिठाचे पाणि करून ते नाभीत सोडावे व शांत ४५ मीनीट झोपावे. ( पाणि खारट करावे ) 


हे काही त्वरीत परिणाम देणारे घरगुती उपाय आहेत, याशिवाय डिप्रेशन जास्त प्रमाणात असल्यास त्याचा नसांचा एक पोईंट पण असतो पण तो लिहुन सांगता येत नाही किंवा विडीयो करून दाखवता येत नाही म्हणुन त्याबद्दल क्षमस्व: 🙏🏼


 वैद्य विश्राम माळाकोळीकर 


 श्रीराम आयुर्वेदिक, 

 7350911888 




निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय