स्मरणशक्ती- घरगुती उपचार

 घरगुती उपचार 

 स्मरणशक्ती 🧠


आजकाल बहुतेक घरात लहान / मोठे सर्वांना कोणतीही गोष्टीचा विसर लवकर पडतो, अगदी सकाळ चे संध्याकाळीही आठवत नाही, हा काही आजार नाही पण भरपुर दिवस जर यावर दुर्लक्ष झाले केले तर याचे आजारात रूपांतर नक्कीच होऊ शकते, याची काही कारणे व काही जुन्या पण उपयुक्त पध्दतीने उपचार घेतले तर त्याचे अतिशय उपयुक्त परिणाम मिळतात. 


कारणे :- अशांत झोप, सतत विचार, पौष्टिक जेवणाचा अभाव, पाणि कमी पीने, मानसिक तणाव, सतत व्यस्तता, अतिशय हळवा स्वभाव ( जास्त करून स्रीयांचा ), मनातील अस्थिरता.


उपाय:- 

•ब्राम्हीवटी रोज रात्री २ गोळ्या.

•किमान ८ तास झोप.

•लहान मेंदु ( डोक्याचा मागील भाग ) यांस बादाम तेलाचे हळवे मालीश करणे. ५/१० मिनीट रोज.

•रोज रात्री पाण्यात ३ बदाम, १ अक्रोड भिजवुन सकाळी खाणे.

•तळपायाची खोबरेल तेलाने १०/१५ मालीश करणे.

•मानेपासून कमरे पर्यंत रोज तेल मुरेपर्यंत खालून वर अश्याप्रकारे मालीश करणे. खोबरेल तेलात एक लवंग + हिंग टाकुन गरम करून घेणे व नंतर त्याचा वापर करणे. 

•पचनास जे हळवे पदार्थ असतील ते घ्यावे. 

•रोज एक खारीक भिजवलेले खावे.

•बाहेरील पदार्थ पुर्ण कमी जाल्यास उत्तम. उदा.. मॅगी, पिज्जा.... व इतर.

•सकाळचे सुर्योदयानंतर चे कोवळे उन्हात ३० मिनीट बसावे. 

•हिरवे पालेभाज्या व साजुक तुप जेवणात असावेच. 

•रोज दुपारी एकवाटी दही + जिरे घ्यावे. 

•कोणत्याही हाताचा अंगठा दुसर्या हाताने १०/१५ धरून ठेवावा. ( लहान मुलांनी वाचन करताना ) हाताच्या व पायाच्या अंगठ्यामध्ये मेंदुचे पोईंट असतात. 

• कपभर दुधात प्रत्येकि १ याप्रमाणे बदाम, काजु, अक्रोड, इलायची याची बारिक पावडर करून घेतल्यास अतिशय लवकर चांगला परिणाम येतो. 

• दिवसभरात पाणि भरपुर पिणे व लघुशंकेस थांबु नये त्वरीत जावे. 

• गुळ व खोबरे खावे. 


वरील काही वीनाखर्चीक असे उपाय आहेत, त्यातील सर्वच करता येईल असेही आहेत, ज्यांना इतर काही उपाय सुरू आहेत त्यांनीही सोबत हे उपचार घेतल्यास हरकत नाही. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीस हे नियम व उपाय चालतात. 

याविषयी अधिक माहिती किंवा डोक्याचे पोईंट बद्दल माहिती हवी असल्यास मेसेंजर वर विचारावे. 

परंतु वरील उपायाने चांगले रिजल्ट आहेत. 


 वैद्य विश्राम माळाकोळीकर 

 श्रीराम आयुर्वेदिक 

 7350911888,9420242484 



निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय