जवस खाण्याचे महत्त्व
जवस घेण्याचे महत्त्व
यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात.
जवसाचे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.
बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्या भाजण्यावरचा फायदेशीर उपाय आहे.
जवसामध्ये 'ओमेगा-३' या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% राहते त्यामुळे,हृदयाला रक्तपुरवठा करणार्याे वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत.जवस हे रक्तातील कॉलेस्टेरॉल चे प्रमाण ९ ते १८ टक्क्याने कमी करते.हे सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे 'ग्लिसराईड' चे प्रमाण कमी होते.याचे सेवनाने आतड्याचा कर्करोग होत नाही.अकाली वृध्द्त्व टळते.
जवसामधे ९ टक्के आद्र्रता, २ टक्के प्रथिने, ३४ टक्के स्निग्ध पदार्थ आणि ३६ टक्के काबरेहायड्रेट्स असतात. जवसाच्या बियांचा पृष्ठभाग कडक असतो आणि तो चकाकतो. जवसाच्या दोन जाती असतात. एकाच्या बिया सोनेरी, तर दुस:याच्या लालसर तपकिरी रंगाच्या असतात. जवसाला विशिष्ट स्वाद असतो. त्यामधे प्रचंड प्रमाणात ओमेगा-३ मेदाम्ले, उत्तम प्रमाणात मँगनीज, चांगल्या प्रमाणात चोथा, मॅगAेशियम आणि फोलेट व थोडय़ा प्रमाणात तांबे, फॉस्फरस आणि व सहा जीवनसत्व असतात.
वनस्पतीजन्य पदार्थामध्ये सर्वात जास्त प्रमाणात ओमेगा-३ मेदाम्ले जवसात असतात. त्यातील गुणधर्मामुळे अस्थमा, ऑश्चिओआरथ्रायटिस, अर्धशिशी, ओश्चिओपोरॉसिस या आजारांमधे जवसाचा चांगला फायदा होऊ शकतो. खरं तर हाडांसंबंधी कोणत्याही रोगामध्ये जवसाचा उपयोग होतो. जवसासंबंधी केलेल्या एका वैद्यकीय संशोधनातील निकषांनुसार जवसाचा नियमित वापर करणा:या रुग्णांच्या एकूण कोलेस्टेरॉल पातळीत तसेच विघातक (एल.डी.एल.) कोलेस्टेरॉल पातळीत फरक पडून ती कमी झालेली दिसते. असाही एक निष्कर्ष आहे की, ओमेगा-३ मेदाम्लांमुळे रक्तात गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. आपल्या शरीरातील पेशी पोषण घेत असतात आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकत असतात. हे करण्यासाठी त्यामधे लवचिकता लागतो. मधुमेही रुग्णांमधे ही लवचिकता कमी होते. विशेषत: ज्यांच्या आहारात संपृक्त मेदाम्लांचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ असतात त्यांच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता जास्त असते. जवसात भरपूर ओमेगा-3 मेदाम्ले असल्याने त्याच्या नियमित सेवनाने पेशींमधील ही लवचिकता चांगली राहण्यास मदत होते. मोठय़ा आतडय़ांच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो.
जवसाच्या नियमित सेवनाने भरपूर ओमेगा 3 मेदाम्ले पोटात जाऊन कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळाल्याने उच्च रक्तदाबावरही नियंत्रण मिळते. जवसामधे भरपूर चोथा असल्याने मलोत्सर्जासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच हा चोथा पाण्यात मिसळला की एक थलथलीत घट्ट पदार्थ तयार होतो. त्यामुळे अन्न हळूहळू पुढे ढकलले गेल्याने रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही.
जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजी या कर्करोगविषयक नियतकालिकातील शोधनिबंधातील निष्कर्षानुसार जवसातील ओमेगा-३ मेदाम्लांमुळे पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. जवसाचा उपयोग स्त्रियांसाठीही खूप होतो असं आढळलं आहे. जवसामधे लिगAन खूप प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात हार्मोन्ससारखी रसायने तयार होतात, ज्यामुळे स्तनांच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. जवसाचा उपयोग स्त्रियांसाठीही खूप होतो असं आढळलं आहे. जवसामधे लिगAन खूप प्रमाणात असतं. त्यामुळे शरीरात हार्मोन्ससारखी रसायने तयार होतात, ज्यामुळे स्तनांच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो. जवसाचा उपयोग रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमधे अचानक येणा:या गरम लहरींचे (हॉट फ्लशेस) प्रमाणही कमी झाल्याचे आढळले आहे. डोळे कोरडे पडण्याचा रोग अमेरिकेत ब:याच प्रमाणात आढळतो. जवस रोज आहारात असेल तर यालाही प्रतिबंध होतो असं आढळलं आहे.
जवस कढईत थोडंसं भाजून त्यात ऑलिव्ह तेलावर परतलेला कढीपत्ता आणि लाल मिरच्या, थोडे भाजलेले तीळ, थोडी चिंच व मीठ असं सगळं एकत्र करून मिक्सरवर कोरडी चटणी बनवून ठेवावी. एका वेळी तीन दिवस पुरेल एवढीच चटणी बनवावी. हवाबंद डब्यात फ्रीजमधे ठेवावी. रोज सकाळ-संध्याकाळ एक टेबलस्पून खावी. जवसाचे कितीही फायदे असले, तरी त्याचं सेवन नियमित पण बेतातच करावं. विशेषत: गरोदर स्त्रीला जवस शक्यतो देऊच नये.
जवस
जवसालाच "अळशी' असेही संबोधले जाते. नजीकच्या काळात जवसाला खूप महत्त्व लाभले आहे. त्यास पूर्वेकडच्या देशांमध्ये "सुपर फूड' असा दर्जा दिला गेला आहे. याचे प्रमुख कारण आहे जवसामध्ये असलेले ओमेगा - 3 हे मेदाम्ल. न्युट्रिशन सायन्सच्या मते, आपल्या आहारात ओमेगा-6 व ओमेगा-3 या दोन मेदाम्लांचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. सामान्यत: ओमेगा-6 हे मेदाम्न रोजच्या वापरातल्या तेलांमधून सहजत: मिळत असते, परंतु ओमेगा-3 असलेले पदार्थ खूपच कमी असल्याकारणाने आवश्यहक तितक्याा प्रमाणात हे मेदाम्ल शरीराला मिळत नाही. तेलीय मासे, अक्रोड, मोहरी, मेथी व जवस यापासून ओमेगा-3 आपल्याला मिळू शकते. हे मेदाम्ल विशेषत्वाने हृदय व त्याच्या धमन्यांचे आरोग्य राखण्याचे मोलाचे कार्य करते. रक्ताातील कोलेस्टेरॉल व ट्रायग्लिसराइड्स या घटकांचे प्रमाण ओमेगा-3 ने कमी होण्यास मदत होते.
ओमेगा-3, पेशींचा दाह कमी करते. त्यामुळे उच्च रक्ततदाब, संधिविकार, कर्करोग इत्यादी मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते. ओमेगा-3 या मेदाम्लाच्या नित्यसेवनाने स्मरणशक्तीॉ वाढते व डोकेदुखी, तसेच नैराश्यय कमी होते, असे एका संशोधनात आढळून आले आहे.
जवस हे रज:निवृत्तीशी संबंधित तक्रारी कमी करते. रज:निवृत्ती होण्यापूर्वी काही काळ जाणवणारे डोकेदुखी, चिडचिडेपणा व शरीरातून गरम वाफा निघणे ही लक्षणे रोज साधारणत: तीस ग्रॅम जवस खाण्याने कमी होतात, असे एका अभ्यासात दिसून आले.
जवसातील तंतूंमुळे कोलेस्टेरॉल कमी करणे, साखरेवर नियंत्रण आणणे व आंत्रकुंजन योग्य राखणे, हे फायदे मिळतात. मधुमेहींनी जवसाची चटणी रोज खावी किंवा जवस बारीक करून सॅलेड अथवा कोशिंबिरीतून घ्यावे. जवस हे डायबिटीक कॉम्प्लिकेशन्स्पासून संरक्षण देते. अस्थमा (दमा) च्या पेशंटनादेखील जवस उपयुक्ता ठरते.
जवसामध्ये "लिगनान' (ङळसपरप) हे फायटोकेमिकल आहे- जे स्त्रियांमधील संप्रेरकांचे स्रवन योग्य राखण्यास मदत करते. हे फायटोकेमिकल प्रजननक्षमता वाढवणे, रजोनिवृत्तीच्या समस्या कमी करणे व स्तनांच्या कॅन्सरपासून संरक्षण देण्याचे काम करते.
जवसाचा शरीराला फायदा मिळण्यासाठी ते चांगले चावून खावे किंवा कुटून वापर करावयास हवा. अन्यथा ते न पचता शौचावाटे तसेच बाहेर पडतात. जवसाच्या तेलापेक्षा जवसाच्या बीमधून आरोग्यदायी फायदे अधिक मिळतात. जवसाचा आहारात समावेश करताना सुरवातीला अगदी थोड्या प्रमाणात सुरू करून मग हळूहळू त्याचे खाण्यातले प्रमाण वाढवावे, अन्यथा पोटात दुखून त्रास होतो.
फळे वगळता इतर आणखी कोणत्या पदार्थांमधून अँटिऑक्सिदडंट्स मिळू शकतात? याच्या गोळ्या घेणे कितपत योग्य आहे?
अँटिऑक्सि डंट्स (antioxidants)असे घटक आहेत- जे शरीरातील काही विजातीय घटकांवर (free radical )अटकाव आणतात. त्यामुळे आपल्याला अनेक मोठ्या विकारांपासून संरक्षण मिळते.
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment