वांग- घरगुती आयुर्वेदिक उपचार


 

🌹 वांग, 🌹

वांग-उपचार - शरीरातील हार्मोन्स कमी - जास्त झाल्याने चेहऱ्यावर व मानेवर काळसर डाग व पुळ्या येतात त्याला वांग म्हणतात. गरोदरपणात महिलांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोसची निर्मिती होत असते तेव्हा वांग येण्याचे प्रमाण जास्त असते-                                                 

उपचार- 1) दररोज कच्चा बटाट्याचे वेफर्स करून वांग वर दिवसातून 3 वेळा 10 मिनिटे दाब देऊन चोळावे                       2) चंद्रप्रभा वटी गोळी दररोज नास्ता च्या अगोदर सकाळ- जेवण्या अगोदर दुपार  व जेवणाच्या अगोदर रात्री  1 ह्या प्रमाणे घ्यावी. 50 वर्ष वरील व्यक्तीनी सकाळी-दुपारी व सायंकाळी 2 गोळ्या                                  टीप-गरोदरपणात ह्या गोळ्या घेऊ नये तर बाळंतपण झाल्यावर 2 महिन्या नंतर घ्याव्यात                                                    3) दररोज सकाळी 8 व सायंकाळी 8 अश्या 16 काळ्या मनुका दररोज 2 महिने किंवा वांग नष्ट होई पर्यंत खाव्यात                                         

           4) पठाणी लोध/साधे लोध  चूर्ण 50 ग्रॅम व वेखंड चूर्ण 15 ग्रम असे प्रमाणात घेऊन एकत्र करावे. दररोज सकाळी त्यातील एक अर्धा मोठा चमचा चूर्ण घेऊन त्यात आवश्यकते नुसार गाईचे दूध (म्हशीचे घेतल्यास उपयुक्त नाही) टाकून पेस्ट बनवावी व चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून चेहरा फक्त पाण्याने धुवावा. रात्री झोपताना सुद्धा असा लेप लावून सकाळी चेहरा धुवावा. ह्या लेप मुळे 2 महिन्यात चेहऱ्यावर असणारे वांग, मुरूम, मुरूमचे काळे डाग नष्ट होतात. (दोन्ही चूर्ण आयुर्वेदिक औषधी दुकानात मिळते) हा फारच प्रभावी फेसपॅक आहे.                                                                           5) महामंजिष्ठादी काढा दररोज दुपारी जेवण झाल्यावर दीड चमचा घ्यावा.  वरील 5 उपाय एकाच वेळी केल्याने अनेकांच्या चेहऱ्यावरील व माने वरील वांग 3 महिन्यात नष्ट झालेले आहेत.                                   6) आठवड्यातून दोनदा लाल टमाटर चेहऱ्यावर व मानेवर 10 मिनिट चोळावा


चेहर्यावर  काळसरपणा, पिंपल, डाग, कोरडि त्वचा, पिगमेटेशन, फ्रेकल्स,.. यासर्वांवर 

 उपायः

१) जाईच्या पाल्याच्या रसात हळकुंड उगाळून लावावित

२)  कच्चा उकडलेला बटाटा लावा.

३)  संत्र्याच्या सालिचं चूर्ण व गुलाबजल तोंडाला लावावे पेस्ट करून.

४) तुळस व लिंबु रस आठवड्यात दोनदा लावणे.

५)  कडुलिंबाचि मुळि उगाळुन तीचा लेप लावणे दहा दिवस.

६) निंबोण्यांचि पेस्ट बनवून चेहर्यावर लावणे.

७) जांभूळ बी पावडरचा लेप चेहर्यावर लावणे.

८) शीतसुधा रस पोटात घेणे.

९) ओलिहळद वाटून चेहर्याला लावणे.

१०) साय, हळद, लिंबू, मध, एकत्र करून त्वचेवर लावा. मवू पडते व चेहरा उजळतो.

११) आवळ्याचि पूड तेलात भिजवून लावणे.

१२) रोज अक्रोड खावा.

१३) कार्ल्याच्या पानाचा रस लावा.

१४)  मध व तूप एकत्र करून आंघोळिपूर्वी दोन तास लावा.

१५)  महामंजिष्ठादि काढा ३ चमचे व तितकेच पाणि टाकून घेणे.

१६) काळे डाग व पिगमेटेशन, वांग असल्यास कोथिंबिर लेप लावा.

१७) रोज साबणाचा वापर न करता हळद, कोरफड, मध, कडूलिंब, व कोथिंबिर रस यांचा फेसवाँश एकदम , अथवा वेगवेगळा वापर करून तोंड धुणे.

१८)  ज्येष्ठमध पावडर, व दूध, व चंदन पावडर एकत्र करून झोपण्यापूर्वि सतत दहा दिवस लावा. सगळे वांग, पुळ्या, ब्लँकहेड गायब होईल

   चेहरा एकदम चिकना होईल.

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.


Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय