“शतावरी” -शंभर फायदे


मित्रांनो, आपल्या शेताच्या आजूबाजूला किंव्हा जंगलाशेजारी बरेचदा आपल्याला शतावरीचे छोटे झुडूप बघायला मिडते, तसेच विधर्भामध्ये तान्हा पोळ्याच्या दिवशी शेतातून किंव्हा जंगलातून आणून एकमेकांच्या घरी जाऊन भिंतीवर खोचतात आणि भोजारा (पैसे) मागतात, अशी परंपरा चालत आली आहे.

ती शतावरी आपल्या जीवनात खूप महत्वाची वनस्पती आहे. आपण घरगुती पद्धतीने त्याचे कल्प / पावडर तयार करून सेवन केल्यास खूप सारे आपल्या आरोग्यास फायदे आहेत. बाजारात खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ब्रांडनी ते खूप जास्त किमतीत उपलब्ध केलेली आहेत. ती आपल्याला शुद्ध रुपात शेतावर, किव्हा आजूबाजूला उपलब्ध होऊ शकते.

शतावरी कल्पाचे शंभर फायदे आहेत. त्यातील काही खालील प्रमाणे :

1. शतावरी एक उत्तम औषध असून, स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही उपयुक्त आहे.

2. बहुतांश महिलाना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पाळीदरम्यान पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवत असतील तर शतावरी घेतल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. 

3. स्मरणशक्ती कमी होणे तसेच रजोनिवृत्तीच्या काळात जळजळ होणे आदि समस्यांवर उपाय म्हणून शतावरी वापरता येते. 

4. बहुतेक पुरुषांना यौन समस्या आढळून येतात या समस्या निवरण्यासाठीही शतावरी हे उत्तम औषध असल्याचे दिसून आले आहे.

5. बाळांतीन स्त्रियांना दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढवण्यासाठी शतावरी उपयोगी आहे. 

6. शतावरीमुळे वाढत्या वयात येणारा थकवा तसेच कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. 

7. शतावरी अँटी बॅक्टीरिया, अँटी कॅन्सर आणी अँटी अल्सर गुण असल्याने पचनशक्ति सुधारून पोटाचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. 

8. शतावरीमुळे antioxident, बुरशी यामुळे होणाऱ्या रोगांपासून बचाव होण्यास मदत होते. 

9. मनावरील ताणतणाव कमी होऊन मन शांत होण्यासाठीही शतावरी उपयोगी आहे.  

10. प्रसूती नॉर्मल होण्यासाठी दररोज दोन वेळा एक चमचा शतावरी दुधातून घेणे फायद्याचे. 

11. लहान मुलांमध्ये ऊंची वाढणे तसेच वजन संतुलित होण्यासाठी मदत होते. 

12. अनिद्रा : ज्या व्यक्‍तींना अनिद्रेचा त्रास होतो त्यांच्यासाठी शतावरी खूप फायदेशीर असते. शतावरी  पाच ते दहा ग्राम घेऊन त्यात 10 ते 15 ग्रॅम तूप तसेच दूध घालून घेतल्यास अनिद्रेचा त्रास बंद होतो. 

13. कर्करोग : शतावरीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे कर्करोगाला प्रतिकार करतात. त्याशिवाय शतावरी मध्ये ए, बी, सी जीवनसत्त्व, पोटॅशिअम आणि झिंक असते. त्यात हिस्टोन नावाचे प्रथिनही असते जे कर्करोगाच्या उपचारात मदत करते. 

14. किडनी स्टोन असलेल्या लोकांनी सकाळी अनोशापोटी गरम पाण्यासोबत घेतल्यास खडा विरघळून जातो. 

15. कोलेस्ट्रॉल त्रासात वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.


संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.





Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय