आवळा आयुर्वेदिक महत्त्व
आवळा आयुर्वेदिक महत्त्व
नीसर्गाने कीती सुंदर वनस्पती आसपास दिल्या .त्यातीलच आवळा हा आवर्जून सांगांव लागेल .रोग होउ नये यासाठी उपाययोजना करण्यात आवळा महत्त्वाचा आहे.
व्हायरल आजार संसर्गजन्य आजार रोखण्यात आवळ्यासारख औषध नाही.
आयुर्वेदात त्रीफला खुप महत्व आहे( बेहडा हीरडा आवळा )हे तीनही वात पीत्त कफ नाडी संतुलीत ठेवतात .अगदि डोळ्यापासुन सर्व अवयव छान ठेवन्यात यांचा वाटा अप्रतीम आहे.
इं . - Emblic myroblan एंब्लिक मिरोब्लन . लॅ . - Phylanthus amblica
भरतखंडांत आंवळीची झाडे पुष्कळ ठिकाणी होतात . हे झाड बरेंच उंच असते . याची पानें शमीच्या पानांसारखी असतात . आंवळीस कार्तिकमासी आंवळे येतात . हे फळ साधारण सुपारीएवढे असते . आंवळ्यांत दोन जाती आहेत . रान - आंवळा व पांढरा आंवळा .
आंवळ्याचा मुरंबा करितात . तो पित्तावर चांगला आहे . त्याचे लोणचे होते .
आंवळे सुकविले म्हणजे याची आंवळकठी होते .
आंवळीच्या लांकडापासून पांढरा कात होतो .
आंवळकठी वाटून अंगास लावतात .
आंवळकठीचे रायतें होतें . वैद्यकांत ज्यास त्रिफळा म्हणतात त्यांत आंवळकठी येते . हिरडा , बेहडा , आंवळकठी ह्या तीन पदार्थास त्रिफळा अशी संज्ञा आहे .
आंवळा किंचित् तिखट , गोड , कडू , आंबट , तुरट , शीत , जरा व व्याधि यांचा नाशक , वृष्य , केश्य , सारक , हितकर , अरुचिकारक आहे ; आणि रक्तपित्त , प्रमेह , विष , ज्वर , वांती , आध्मान , बद्धविटकता , सूज , शोष , तहान , रक्तविकार , त्रिदोष यांचा नाश करितो .
आंवळकठी - कडू , आंबट , तिखट , मधुर , तुरट , केश्य , भग्नसन्धान कर , धातुवर्धक , नेत्र्य आहे ; व अंगाला लाविली असतां कांतिकारक ; व पित्त कफ , धर्म , मेह , विष , त्रिदोष यांचा नाश करिते .
( १ ) पांढऱ्या धुपणीवर - आंवळ कठीच्या बिया पाण्यांत वाटून त्यांत साखर व मध घालून ते घ्यावें , दिवस ३ .
( २ ) सर्व ज्वरावर अमलकादि चूर्ण व अमलकादि काढा - आंवळकठी , चित्रक मूळ , बाळहिरडे , पिवळी व सैंधव ही पांच औषधे समभाग घेऊन चूर्ण करून घेतले असता त्यानेही सारे ज्वर दूर होतात . तसेंच आंवळकठी , चित्रक , बाळ हिरडे , पिंपळी यांचा काढा करून घेतला असतां ज्वर दूर होतात .
( ३ ) पित्तावर आंवळ्याचा मुरंबा - एक शेर आंवळ्यांस टोचणीने बीपर्यंत भोंके पडतील असे टोंचे मारून , चुन्याच्या निवळीच्या पाण्यात काही वेळ टाकावे , म्हणजे त्यांचा राप निघून जातो . मग आधण आलेल्या दोन शेर पाण्यात टाकून थोडे उकळावे आणि बाहेर काढून वस्त्राने पुसून कोरडे करावे . नंतर साखरेची किंवा खडीसाखरेची चार तारी चांचणी करून तींत ते आंवळे बुडवून ठेवावे . हा मुरंबा चार - पांच वर्षे चांगला टिकतो . हा . भक्षण केल्याने पित्त शमन होऊन पुष्टताही येते .
( ४ ) आंवळ्याची . कोचकई - इरसाल आंवळ्यांस किंचित वाफ देऊन त्यांची टरफलें बारीक वाटावी . नंतर त्यांत जिरे , मिरे , पिंपळी , धणे , सुंठ , दालचिनी , सैन्धव , पादेलोण , हिरडे , मीठ , ही बारीक करून घालावी व त्याच्या वड्या किंवा गोळ्या करून वाळवाव्या . या गोळ्या फार रुचिकर व पाचक आहेत .
( ५ ) खरजेवर - आंवळकठी जाळून ती तेलांत खलून लावावी .
( ६ ) स्वरभेदावर - गाईच्या दुधांत आंवळकठीचे चूर्ण देणे . ( ७ ) अशुद्ध अभ्रक भक्षणापासून होणाऱ्या विकारांवर - आंवळ्याचा रस अथवा आंवळे पाण्यात टाकून तीन दिवस खावे . म्हणजे सर्व विकार शांत होतात .
( ८ ) उचकी व श्वासावर - आंवळ्याचा आंगरस मध व पिंपळी घालून द्यावा .
( ९ ) रक्तपितीवर - आंवळकठी एरंडेलांत तळून साखरेबरोबर सांजसकाळ घेऊन ऊन पाण्याचा पोट घ्यावा .
( १० ) ओकारीवर - आंवळकठीचें चूर्ण चन्दनाच्या गंधांत कालवून मधांत द्यावें .
( ११ ) प्रमेहावर - आंवळ्याचा रस काढून अथवा आंवळकठीचा काढा करून त्यांत २ मासे हळदीची पूड व मध घालून द्यावे .
( १२ ) जरा न येण्यास - आंवळकठी पाण्यांत वाटून अंगास लावून नंतर काही वेळाने स्नान करीत जावें . याप्रमाणे नित्य क्रम ठेवल्यास वार्धक्य यणार नाही व केश पांढरे होणार नाहीत .
( १३ ) डोळ्यांची आग शांत होण्यास आवळकठी आणि तीळ , रात्री पाण्यात भिजू घालून सकाळी वाटून डोळ्यांस लावावे . नतर एका तासाने स्नान करावे , म्हणजे डोळे हमेश थंड राहून आग होणार नाही .
( १४ ) पित्तावर आंवळकठीचे चूर्ण - त्याचे द्विगुणित साखर व त्याचे दुप्पट साजुक तूप ही एकत्र करून द्यावी .
( १५ ) ज्वरांत शोष पडतो त्यावर माळकठी आणि द्राक्षे वाट्रन तुपाशी मिळवून तोंडास चोळावें व तोंडात धरावें . म्हणजे जिव्हा , तालु , गळा यांचा शोष शांत होतो .
( १६ ) ज्वरांत अरोचक
झाल्यास - आंवळकठी , द्राक्षे व साखर यांचा कल्क करून तो तोंडात धरावयास द्यावा .
( १७ ) मूत्रकृच्छ म्हणजे उन्हाळीवर - आंवळ्यांचा व उसाचा रस एकत्र करून द्यावा .
( १८ ) आम्लपित्तावर - आंवळकठीचे चूर्ण , केळीच्या कांद्याच्या रसांत द्यावें .
( १९ ) नाकातून रक्त पडते त्यास - तुपांत आंवळकठी भाजून कांजीत वाटावी , तिचा मस्तकास लेप करावा .
( २० ) योनिदाहावर - आंवळ्याचा रस साखर घालून प्यावा .
( २१ ) बहुमूत्रावर - आंवळीच्या पाल्याचा रस पावशेर काढून त्यांत दारुहळद उगाळावी व त्यांत खडीसाखर ९ टांक घालून तें प्यावे .
( २२ ) प्रमेहावर - आंवळीच्या सालीच्या पानाचा रस पावशेर व ताक पावशेर एकत्र करून प्यावे .
( २३ ) रेचक - आंवळीच्या रसांत मिरपूड , पांच लवंगा , व वेळा वांटून देणे . उतार तूपभात .
( २४ ) अंगावर पित्त उठते त्यास - आंवळकठी रात्री गोमूत्रांत भिजत घालून ठेवावी व सकाळी वांटून त्यांत नारळाचा आंगरस मिळवून अंगास चोळावा .
( २५ ) शरीराची कांति चांगली होण्यास - आंवळकठी अगर भाजलेले आंवळे व गोडे तीळ एकत्र बारीक वाटून दररोज अंगास चोळावे व काही वेळाने ऊन पाण्याने स्नान करावें .
( २६ ) वीर्यवृद्धीवर - आंवळ्याचा रस व तूप एकत्र घ्यावे .
( २७ ) जरादूर होण्यास - आंवळकठीचे चूर्ण व तिळाचे चूर्ण समभाग एकत्र करून , तूप व मध यांत २० दिवस प्रातःकाळी प्यावें .
( २८ ) दिव्य देह होण्यास - आंवळकठीचे चूर्ण व अस्कन्धाचे चूर्ण समभाग तुप व मध यांबरोबर शिशिररृतुत घ्यावे .
( २९ ) नाकांतून रक्त पडते त्यास - आंवळ कठी तुपांत भाजून कांजीत वांटून मस्तकास लेप करावा .
( ३० ) मस्तकशूलावर आंवळीचे चूर्ण , तूप व साखर एकवट करून प्रातःकाळी भक्षावें .
( ३१ ) पित्त शुलावर - आंवळीचे चूर्ण मधांत द्यावें .
( ३२ ) मूर्छेवर - आंवळ्यांचा रस . तूप घालूव द्यावा .
( ३३ ) रक्तपित्तावर - आंवळकठीचे चूर्ण , साखर व तूप यांत द्यावें . ' अथवा आंवळ्याचा किंवा हरीतकीचा मुरंबा द्यावा .
( ३४ ) लघवी लाल होत असल्यास - आंवळकठी मासे ३ , संचळ मासे २ , व सैन्धव तोळे यांनी करून ते शक्तीप्रमाणे पावशेर पाण्यातून घ्यावे .
( ३५ ) रक्तातिसारावर - आंवळ कठीच्या अंगरसांत मध , तूप , व दूध मिळवून द्यावे .
( ३६ ) अम्लपित्तावर आंवळकठी एक तोळा रात्रौ भिजत घालावी . दुसरे दिवशी सकाळी त्यांत तीन मासे सुंठ , व एक मासा जिरे घालून बारीक वाटून गोळी करावी . ती गोलीमा तोळे दुधांत कालवून त्यांत दोन तोळे खडीसाखर टाकून ते प्यावे .
( ३ मुलांच्या अतिसारावर - आवळकठी , चित्रक , बाळहिरडे , पिंपळी व पादेलोण , ळा व पादेलोण यांचे चूर्ण करून ते नित्य सकाळी व रात्री निजतेवेळी ऊन पाण्याशी शक्यतो
( ३८ ) पित्तविकारावर - आंवळकठी १ तोळा , रात्री कल्हईच्या भाच्या घालून सकाळी वाटून गाईच्या सात तोळे तुधात कालवून ते प्यार विकार दूर होऊन शक्ति वाढते .
( ३९ ) कामीण रोगावर - आवळला गावर - ओवळकठी , हळद वगेरू उगाळून त्याचे अंजन करावें .
( ४० ) धातुपुष्टतेस - आंवळकठी व गोखरूं या प्रत्येकाचे चूर्ण २ मासे , आणि गुळवेलीचें सत्त्व १ मासा , हीं तूप - साखरेत घालून रोज सकाळी खावी ; म्हणजे धातुस्थानची उष्णता जाऊन ती पुष्ट होते .
संदर्भ - स्वानुभव कै.आयुर्वेदमहोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे गुरुजी
टिप-
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888,9420242484
निरोगी रहा, आनंदी रहा!!!
Comments
Post a Comment