पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय !



पांढरे केस काळे आणि मजबूत करण्याचे ७ नैसर्गिक उपाय  !

                          दाट, मुलायम केस असावेत, असे प्रत्येकाला वाटते. मात्र वेळेपूर्वी केस पांढरे झाले तर चिंता वाढते. आजकाल कमी वयातच केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यावर आपण निरनिराळे उपाय करु लागतो. खरंतर मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. त्याचबरोबर धूळ, प्रदूषण इत्यादी कारणांमुळे केसांचे पोषकतत्त्व कमी होऊ लागते. याव्यतिरिक्तही तणाव किंवा अनुवंशिक आजारांमुळे केस पांढरे होऊ लागतात. यावर काही नैसर्गिक उपायही आहेत. त्यामुळे केस पुन्हा काळे होण्यास मदत होईल.

पेरुची पाने

पेरुची पाने वाटून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट केसांना लावल्याने केस काळे होण्यास मदत होते. पेरुच्या पानात व्हिटॉमिन बी, सी असते. त्यामुळे केसगळती रोखण्यास आणि केस पुन्हा उगवण्यास मदत होते.

कडीपत्ता

कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वाद वाढवत नाही तर त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म ही आहेत. कडीपत्ता खोबरेल तेलात घालून रोज त्या तेलाने केसांना मसाज करा. रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवा. असे नियमित केल्यास लवकरच परिणाम दिसू लागेल.

खोबरेल तेल

खोबरेल तेलात लिंबाचा रस घाला. त्याने डोक्याला हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे केस काळे आणि चमकदार होतील. 

कांद्याचा रस

कांद्यात सल्फर असते ज्यामुळे केस काळे होण्यास मदत होते. यामुळे २,३ कांदे कापून त्याचा रस काढा आणि केसांना लावा. यामुळे केस काळे होतील आणि केसगळती थांबेल. मात्र हा उपाय नियमित करणे आवश्यक आहे.

चहापावडर

पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. चहा पावडर चांगल्या प्रकारे उकळवून घ्या आणि या पाण्याने केस धुवा. याचा परिणाम तुम्हाला हळूहळू दिसू लागेल.

आवळा

आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात उकळवा. आवळ्याचा रंग काळा झाल्यानंतर या तेलाने केसांना मालिश करा. याशिवाय आवळ्याच्या पेस्टमध्ये लिंबाचे काही थेंब घाला. 

कोरफड

कोरफड बहुगुणी असल्याचे आपण जाणतोच. त्वचेसोबतच केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोरफड फायदेशीर ठरते. केस धुण्यापूर्वी कोरफड जेल लावा आणि मसाज करा. त्यानंतर केस धुवा. केस काळे आणि दाट होतील.

8  ते 30 वयात केस पांढरे होत असतील तर सप्तामृत लोह गुग्गुळ हे औषध आहे वयानुसार घेण्याचं प्रमाण वेगवेगळं आहे , हे औषध डोळ्यांच्या समस्यांसाठी सुद्धा वापरतात

कोणताही शाम्पू निवडताना घ्यावयाची काळजी:
शाम्पू मध्ये SLS ( sodium Laurel Sulphate), SLES ( Sodium Laurel Ether Sulphate) both act as detergent and surfactant, Dioxane, Paraben with conditioners, Hair wash असे शाम्पू बॉटल वर उल्लेख असेल तर ते शाम्पू वापरू नयेत , 

सगळ्यात चांगला hair wash म्हणजे फार पूर्वीपासून वापरात येत असलेला सर्वांना परिचयाचा म्हणजे शिकेकाई ( श्यामला) ,  रिठा,  लिंबोळी चूर्ण , कढीपत्ता , जास्वंद चूर्ण , आवळा चूर्ण केसांच्या सर्व समस्यांपासून सुटकाही पुर्णतः नैसर्गिक.. वापरण्याची पध्दत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून लिहीत नाही..

आनंदी रहा, निरोगी रहा..

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय