निरोगी दात - घरगुती उपचार



निरोगी दात 


आपले दात म्हणजे आरोग्याचा महामेरूच, जेवण व्यवस्थित चावुन खाल्यास पचन व्यवस्थित होते व पचनशक्ती चांगली असेल तर आरोग्य हे निश्चितच येते. दातांवरील काही समस्येवर घरगुती उपाय सुचवत आहे, करून पहा व निरोगी रहा. 


🦷 दातदुखी 

- लसणाची पाकळी दाताखाली ठेवल्यास ठणक येऊन दुखत असल्यास थांबते. 

- तुळशीची पाने व काळेमिरी एकत्र बारीक करून त्याची गोळी करून दाताखाली दाबून धरल्यास वेदना थांबतात.


🦷 दाताची किडे 

- तुळशीच्या पानांचा रस करून त्यात थोडासा कापुर टाकुन ते दातांवर ठेवल्यास किडे मरतात. 

- सकाळी अनोश्यापोटी पालक चा रस करून त्याची चुळ भरावी तसेच तो रस थोडा वेळ ठेवुण प्यावा, किडे होत नाहीत ! 


🦷 पायरिया 

- मुळ्याच्या रसाने दिवसातुन ५ वेळेस गुळण्या कराव्या आराम होतो.

- पुदिना स्वच्छ धुवुन हळुहळु चावुन खाल्यास त्वरीत आराम मिळतो. 

- आवळा चावुन खाल्यास आराम मिळतो. 


🦷दातातील किड 

- मधाने दाताची हळुहळु मसाज केल्यास किड व दुर्गंधी जाते.

- लवंगाची पावडर व लिंबुचा रस एकत्र करून दातांवर लावल्यास किड जाते. 

- बाभळीच्या जाडाचे दातवण रोज सकाळी केल्यास किड व दुर्गंधी जाते. 


अत्यंत सोपे व १००% घरगुती उपायाने आपणांस चांगले गुण येऊ शकतात, पुर्वीचे लोक बाभळी चे दातवण, कडुलिंबाचे दातवण, कडीपत्त्याचे दातवण वापरत असे, आम्ही पण लहानपणी त्यानेच दात घासत होतो, अत्यंत उपयोगी असे दातवण आजही बरेच लोक वापरतात. 

-लवंग तेल सुद्धा वापरतात

🌾ऊस दातांनी चावुन त्याचा रस पिल्यास दातांच्या भरपुर समस्या ह्या नाहिश्या होतात. 


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय