कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण) Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम)

कंपोस्ट तयार करण्याचे प्रभावी तंत्रज्ञान- (प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण) 

Effective Microorganisms- (इफेक्टीव मायक्रोओर्गानिझम)


मित्रहो, शेतकऱ्यांना शेती कसणे दिवसेंदिवस कठीण होत आहे, कारण शेतीमध्ये येणारा अधिक खर्च हे एक महत्वाचे कारण लक्ष्यात येते, जसे निविष्ठा वरील अतिरिक्त खर्चखते आणि कीटकनाशकावरील खर्च, मशागत आणि मजुरी खर्च आदी. मग जर, खर्च कमी करण्याच्या दृष्टीने विचार केल्यास असे लक्षात येते की, काही गोष्टी अतिशय आवश्यक आहेतच, ज्यात खर्च कमी करणे आपल्या आवाक्यात नाही. परंतु बाहेरच्या बाजारातून आणाव्या लागणाऱ्या गोष्टींपैकी एक गोष्ट नक्कीच आपण कमी करू शकतो, आणि आपल्या खर्चात बचत करू शकतो,...... ते आहे कंपोस्ट खत !

कंपोस्ट खत तयार करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत, त्या पैकी बर्याच किचकट, कठीण, किंव्हा जास्त व्यवस्थापन करण्याची गरज असणाऱ्या आहेत. जसे, गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळाचे व्यवस्थापन करणे, बेड तयार करणे आदी खूप कठीण असते. नाडेप पद्धतीने खत तयार करण्याकरिता नाडेप टाकी तयार करणे. आदि, परंतु प्रभावी सूक्ष्मजीवानू (EM) द्रावणाचा वापर करून आपल्या शेतामधून निघणारा काडी-कचरागुरांचे शेण, घरातून निघणारा घण कचरा यांचेपासून अतिशय उत्कृष्ट प्रकारचे खत, एकदम अल्प खर्चात तयार करणे शक्य आहे. 

तर चला, प्रभावी सूक्ष्मजीवानू (EM) द्रावणाचा  वापर करून शेतकऱ्यांकरिता अल्प खर्चात कंपोस्ट खत तयार करण्याची सोपी व सरळ पद्धत समजून घेऊ या. प्रभावी सूक्ष्मजीवाणू युक्त द्रावण वापरून अतिशय अल्प कष्ठाने  शेतातील किंव्हा घरगुती कचऱ्यांचे उत्कृष्ट कंपोस्ट तयार करता येतो.

प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावण काय आहे ?

प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण हे प्रामुख्याने प्रकाशसंश्लेषित आणि दुधातील बॅक्टेरियायीस्ट्स, अ‍ॅक्टिनोमायसेट्स आणि फर्मेंटिंग बुरशी अश्याप्रकारच्या सूक्ष्मजीवातील विविधता वाढविण्यासाठी फायदेशीर सूक्ष्मजीवानुचे मिश्रण असते. ह्या जीवाणूंच्या मिश्रणामुळे कंपोस्ट तयार करण्याची प्रक्रिया तेज होते, मातीची गुणवत्ता आणि आरोग्य सुधारते, ज्यामुळे पिकांची वाढ, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते. प्रभावी सूक्ष्मजीव (EM) तंत्रज्ञान पद्धती ही जपानचे प्रोफेसर टेरुओ हिगा यांनी १९८२ मध्ये विकसित केली, (https://www.emrojapan.com) आणि साधारणपणे १०० पेक्षा जास्त देश्यात या पद्धतीचा वापर करून घनकचरा व्यवस्थापन, कंपोस्ट तयार करणेजल शुद्धीकरण, पशुपालन, घन कचरा व्यवस्थापन आदी करिता हे अत्यंत प्रभावीपणे द्रावण कार्य करते. प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावण हे धन कचरा गोठ्यातून निघणारे शेण आणि इतर पालापाचोडा यापासून जमिनीवर ठेवलेल्या ढिगाऱ्यापासून उन्हाळ्यात  ते  आठवड्याच्या कालावधीत उत्कृष्ट कंपोस्टमध्ये रूपांतरित करते. थंड हवामानात आणि कचरा जास्त खडबडीत, कठीण असेल तर कंपोस्टिंगची प्रक्रिया थोडी हळू असू शकते.

प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावण कसे काम करते ?

कंपोस्टिंग ही एक जैविक प्रक्रिया असते, जी हवाबंद आणि हवेशीर वातावरणात कार्य करते तसेच ज्यात सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन करतात आणि कार्बन-नायट्रोजनचे प्रमाण व्यवस्थित ठेवते, परिणामी कचरा कंपोस्टमध्ये रुपांतरीत होतो. तयार झालेल्या कंपोस्टमध्ये सेंद्रिय पदार्थ आणि महत्वाच्या पोषक द्रव्यांची उच्च मात्रा असते आणि ते जमिनीच्या संवर्धनासाठी आणि मातीची सुपीकता सुधारण्यासाठी आणि राखण्यासाठी खूप उपयुक्त सते. प्रभावी सूक्ष्मजीवाणू (ईएम) कंपोस्टिंग पद्धत कंपोस्टिंग प्रक्रिया वेगवान करण्यासाठी आणि सुधारित कंपोस्ट उत्पादन प्रदान करण्यासाठी प्रभावी सूक्ष्मजीव आणि गुळाचा वापर करावा लागतो.


 प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावण वापर करण्याची पद्धती-

बाजारात उपलब्ध असलेले प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावणाचे जीवाणू हे बॉटल मध्ये सुप्तावस्थेत असतातत्यांना कार्यक्षम   (Activateकरण्याकरिता दोन पद्धती आहेत,

) प्लॅस्टिक ड्रम किंव्हा बादलीमध्ये २० लिटर शुद्ध पाणी (क्लोरीन विरहीत  किलो गुळ यांचे मिश्रण तयार करून, त्यात  लिटर प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EMद्रावण मिश्रणात टाकावेत्या मिश्रणाला व्यवस्थितपणे ढवळून गुळ पूर्णपणे विरघळून घ्यावेतयार झालेले मिश्रण  आठवडाभर व्यवस्थित हवाबंद करून ठेवावेत्या द्रावणात तयार होणारी  गॅस निघून जाण्याकरिता दिवसातून एकदा पाच मिनीटाकरिता झाकण उघडे करून हवा बाहेर जाऊ द्यावीसात दिवसानानंतर द्रावणावर साय  (layerआल्याचे दिसून येणारम्हणजेच कार्यक्षम सूक्ष्मजीवाणूचे द्रावण वापरण्याकरिता तयार झाले.

ज्या ठिकाणी मोठ्या किचन / कॅन्टीन असतात त्या ठिकाणी भात तयार करण्यापूर्वी तांदूळभात पाण्याने स्वच्छ धुतल्या जाते आणि त्यानंतर जे सफेद स्टार्चयुक्त पाणी असते ते बाहेर फेकल्या जातेते स्टार्चयुक्त भाताचे पाणी ९५ लिटर   किलो गुळ यांच्या मिश्रणात लिटर प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EMद्रावण टाकावेत्या द्रावणात तयार होणारी गॅस निघून जाण्याकरिता दिवसातून एकदा पाच मिनीटाकरिता झाकण उघडे करून हवा बाहेर जाऊ द्यावीसात दिवसानानंतर द्रावणावर साय (layerआल्याचे दिसून येणारम्हणजेच कार्यक्षम सूक्ष्मजीवाणूचे द्रावण वापरण्याकरिता तयार झाले.

३) तयार झालेल्या कार्यक्षम सूक्ष्मजिवाणूंचे द्रावण १०० लिटर पाण्यात मिसळून त्याचा वापर करता येतो, तसेच त्याचा विस्तार करण्याकरिता वरीलप्रमाणे प्रक्रिया पुनःपुन्हा करून कार्यक्षम जीवाणू द्रावण अधिकाधिक वाढविता येतो.
) कार्यक्षम सूक्ष्मजीवाणूच्या द्रावणाची कार्यशमता 6 महिने पर्यंत असू शकते. परंतु १ महिन्याचे आत कार्यक्षम सूक्ष्मजीवाणू द्रावणांचा वापर केल्यास अतिशय चांगले परिणाम दिसून येतात.
) उन्हाळ्यात उन्हापासून तर पावसाळ्यात पाण्यापासून कंपोस्टबेडचे संरक्षण करावे.
) शेणखताच्या किंव्हा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर व्यवस्थितपणेआत्तपर्यंत जाईल असे कार्यक्षम सूक्ष्मजीवाणूचे द्रावण फवारावे आणि गवताने किंव्हा तनाने झाकून घ्यावे.

प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावणाचे फायदे-

प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावणाचे पर्यावरणीय दृष्टया खालीलप्रमाणे फायदे आहेत,
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण मानवी आरोग्यासाठी आणि पर्यावरणीय दृष्टया सुरक्षित आणि ऑर्गनिक आहे.
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण कचऱ्याचे रुपांतर उपयुक्त सूक्ष्मजीवांसह कंपोस्ट मध्ये करते आणि शेतात वापरासाठी ते अत्यंत उपयुक्त असते.
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण हे कोणत्याही परिस्थितीत काम करू शकते.
रुपांतरीत कंपोस्टमध्ये सूक्ष्मजंतूंची संख्या जास्त उपस्थित सल्यामुळे सी:एन (कार्बन:नायट्रोजनचे प्रमाण जास्त असते.
फक्त कचरा ढिगाऱ्यावर फवारणी करणे पुरेसे आहे, त्यामुळे ह्यात शारीरिक श्रम खुप कमी आहे.
कंपोस्ट आणि कचरा सडण्याच्या प्रक्रियेमुळे वास येत नाही.
• 
या तंत्रज्ञानाचा वापर करून माश्या आणि डासांचा धोका कमीतकमी होतो.
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण खूप किफायतशीर आणि कमी खर्चाचे आहे.
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावणाचे महत्वाचे फायदे म्हणजे कमी किंमत, वापरण्याची प्रक्रिया खूप सोपी असते, आणि त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण करते.


प्रभावी सूक्ष्मजीवाणू (EM) द्रावण कूठे उपलब्ध होते-
प्रभावी सूक्ष्मजीवाणू द्रावण कृषी केंद्र तसेच ऑनलाइन साईट वरती पण उपलब्ध असते.

 ***************************************************************



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय