FPO Formation- शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

FPO Formation- शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना 


मित्रहो, FPO च्या माध्यमातून शेतकऱ्यांना संघटीत करून शेतीचे आधुनिकीकरण आणि शास्वतीकरण करण्याच्या उद्धेशाने मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संस्था व सरकारी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत, त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी बांधवांकारिता सदर ब्लॉग मधून वेगवेगळ्या लेखात माहिती देतांना, बऱ्याच होतकरू आणि ग्राम सुधारणावादी मित्रांनी त्यांचे गावात सरकारी मदतीशिवाय सुद्धा FPO तयार करून शेतीची सुधारणा करण्याची इच्छा दर्शविली आणि त्याकरिता FPO कसे तयार करायचे याबाबत माहितीची अपेक्षा केली, त्याबाबत या लेखात आपण शेतकरी उत्पादक संस्था (FPO) कसे तयार करायचे हे थोडक्यात जाणून घेऊ या.      

 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याअगोदर खालील प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पूर्ण करावी-

१)    गावातील सामाजिक परिस्थिती बाबत माहिती गोळा करून गटात चर्चा करावी व कंपनी उभी केल्यास आपणास करण्यायोग्य कोणत्या संधी (Opportunities) आपल्या गावात, प्रस्तावित सभासदांकडे, आजूबाजूला उपलब्ध आहेत त्याबाबत जाणून घेणे.

२)    कंपनी स्थापन करण्याकरिता प्रस्थावित क्षेत्रात / गावात असलेल्यापैकी होतकरू संभाव्य कार्यकर्त्यांची निवड करावी.

३)    निवड केलेल्या कार्यकर्त्याबरोबर वारंवार चर्चा करून त्यांना शेतकरी उत्पादक कंपनी बाबतचे महत्त्व आणि इतर बाबी समजावून सांगणे, तसेच त्यांना या प्रक्रियेत सामावून घेण्याकरिता प्रवृत्त करणे.

४)    गावातील इतर सदस्यांना कंपनीचे सभासद होण्याकरिता निवड केलेल्या प्रस्तावित क्षेत्रात / गावात कंपनी स्थापन करणे बाबत संविस्तर चर्चा करावेकंपनीबाबत समजावून सांगण्याकरिता लोकांच्या सभा घ्याव्यात आणि सभासदांची संभावित यादी तयार करून घ्यावी.

५)    शेतकरी उत्पादक संस्था तयार करण्याकरिता संभावित सदस्यांच्या संघनमताने कार्यकर्त्यांचा मुख्य गट नामांकन करून घ्यावा, जो की आपल्या कंपनीचे संचालक म्हणून कार्य सांभाळणार.

६)    अनुभवी संस्था किंव्हा व्यक्ती यांचेकडून शेतकरी उत्पादक संस्थेची रचना आणि व्यवस्थापणाची रचना तयार करून घ्यावी.

७)    आपल्या FPO ची रचना, कंपनी करिता प्रस्तावित ०४ नावे, संचालक मंडळाची निवड त्याची रचना आदी ठरल्यानंतर जवळच्या मान्यताप्राप्त चार्टड अकाऊंटच्या सल्ल्याने आणि मदतीने शेतकरी उत्पादक संस्थेची नोंदणी करून घ्यावी.

नोंदणीची प्रक्रिया सुरु केल्यानंतर साधारणतः ३० दिवसाचे आत नोंदणी होऊन तुमच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (नोंदणी प्रमाणपत्र) मिळू शकते, नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही त्रुटी असल्यास तश्या सूचना आपल्या चार्टड अकाऊंटच्या माध्यमातून आपणास मिळू शकतात.

शेतकरी उत्पादक संस्था नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे-

  • ·         प्रत्येक संचालकांचे  स्वतः प्रमाणित केलेले पॅनकार्ड.
  • ·         प्रत्येक संचालकांचे  आणि सभासदांचे स्वतः प्रमाणित केलेले आधार कार्ड.
  • ·         प्रत्येक संचालकांचे  स्वतः प्रमाणित केलेले मतदार ओळखपत्र किंव्हा ड्रायविंग लायसन्स आदी (ओळख पुराव्यासाठी).
  • ·         प्रत्येक संचालकांचे  स्वतः प्रमाणित केलेले विज बिल किंव्हा बँक पासबुक झेरॉक्स (रहिवासी पुराव्यासाठी).
  • ·         तहशिलदार आणि तलाठ्याच्या सही शिक्क्यासह कृषक प्रमाणपत्र.
  • ·         स्वतःचा किंव्हा जवळच्या नातेवाईकाच्या नावावर असलेला ७/१२ उतारा.
  • ·         सर्व संचालकांचे  शेतकरी असल्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्या सही शिक्क्यासह सर्वांचे मिळून एकत्रित प्रमाणपत्र.
  • ·         प्रत्येक संचालकांचे रंगीत पासपोर्ट आकाराचे प्रत्येकी ०३-०३ फोटो.
  • ·         प्रस्थावित कंपनीसाठी कमीत-कमी ४ योग्य प्रस्थाविक नावे. कंपनीचे नाव ठेवतांना कंपनीला साजेसे आणि ज्यात शेतकरीत्यांचे उत्पादनबिझनेस याचा उल्लेख असावा.
  • ·         कंपनीकरिता प्रस्थावित कार्यालयाचा पत्तात्याचे वीजबिल आणि ऑफिस मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र (फार्मेट मध्ये).
  • ·         प्रत्येक संचालकांचे  मोबाईल नंबर, इ-मेल आईडी, शैषणिक पात्रता, जन्माचे ठिकाण आणि शेअर्स रक्कम (फार्मेट मध्ये).
  • ·         मेमोरेन्डोम ऑफ असोसीएसन (कंपनीची घटना/ नियमावली).
  • ·         संचालक सभासदांची डीजीटल सही तयार करणे.
  • ·         कंपनीचा प्रस्थावित व्यवसाय याबाबत माहिती, आदी.

 

या व्यतिरिक्त अधिक माहितीकरिता कमेंट मध्ये लिहा........ध्यन्यवाद.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय