FPO Licenses and Certificate's- एफपीओ आवश्यक परवाने वा प्रमाणपत्रे
एफपीओकरिता आवश्यक परवाने वा प्रमाणपत्र
मित्रहो, FPO (शेतकरी उत्पादक कंपनी) कशी
तयार करायची, तीचे बिझनेस प्लान कसे करावयाचे, लिगल व
संविधानिक अनुपालन कसे करायचे, एफपीओची यशोगाथा,अश्याप्रकारच्या अनेक लेखातून आपण FPO- शेतकरी उत्पादक कंपनीबाबत समजून घेतले, परत
उजळणीसाठी आपण https://aamhishetakari.blogspot.com येथे जाऊन सविस्तरपणे बघू शकता. या लेखात आपण बघूया की, शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्यांनतर आपणास कोण-कोणत्या प्रकारच्या
परवान्यांची (Licenses)/ प्रमाणपत्रांची (Certificate’s) गरज असते
त्याबाबत थोडक्यात समजून घेऊ या........
1) (Common Certificates)- सामान्य
परवाने / प्रमाणपत्र-
- पॅन कार्ड- नवीन पॅन कार्ड एकतर ऑनलाइन किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त पॅन सुविधा केंद्राद्वारे काढून घेता येईल. कंपनीचे पॅन कार्ड हे आपल्याला फक्त एकदाच काढण्याची गरज आहे. भारत सरकारच्या आयटी विभागामार्फत पॅन कार्ड मिळत असते.
- टॅन नंबर प्रमाणपत्र- टॅन नंबर मिळविण्याकरिता फॉर्म एनएसडीएल वेबसाइटवर किंवा “कर माहिती नेटवर्क सुविधा केंद्र” (टीआयएन-एफसी) वर ऑनलाइन सबमिट केला जाऊ शकतो. किंव्हा आपला CA याकरिता मदत करू शकतात. कंपनीचे टीन नंबर हे आपल्याला फक्त एकदाच काढण्याची गरज आहे. भारत सरकारच्या आयटी विभागामार्फत टॅन नंबर मिळत असतो.
- जीएसटी प्रमाणपत्र- जीएसटी वस्तू आणि सेवा कर विक्री व खरेदीचा व्यवहार करणार्या कोणत्याही घटकास लागू असते.
2)
इनपुट
पुरवठा (कृषी केंद्र) सुरु करावयाचे असल्यास लागणारी परवाने-
a) बियाणे परवाना -जर आपण दुसर्या उत्पादक किंवा कंपनीकडून पुन्हा विक्रीसाठी
बियाणे खरेदी केले
तर बियाणे विक्रीचा परवाना आवश्यक आहे. हा परवाना कृषी विभाग मार्फत उपलब्ध होतो.
b) खत परवाना- खत खरेदी व विक्रीच्या कोणत्याही घटकाच्या व्यवहारासाठी खत परवाना आवश्यक आहे.
c) कीटकनाशक परवाना- कोणत्याही कीटकनाशकाची विक्री, साठवणूक, वितरण, किंवा कोणत्याही
कीटकनाशकाच्या वापरासह व्यावसायिक प्रकारचे कार्य करण्यास इच्छुक असलेल्या एफपीओला
कीटकनाशक परवाना आवश्यक आहे.
3) अन्न पदार्थ- प्रक्रिया आणि विपणनासाठी आवश्यक प्रमाणपत्र:
- FSSAI Certification- खाद्य उत्पादनांची मानके, पॅकेजिंग आणि लेबलिंग, आदि संबंधीचे नियमांचे पालन करणेबाबत या प्रमाणपत्रातून प्रमाणित केले जाते. याबाबतची अधिक तपशीलवार माहिती www.fssai.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- (AGMARK) एगमार्क- एगमार्क हे एक कृषी प्रमाणपत्र आहे, जे कृषी उत्पादला प्रमाणित करते. या परवान्यांद्वारे आपले उत्पादन ग्राहकाला आश्वासन देते, की ते भारत सरकारची एजन्सी मार्केटिंग अँड इंस्पेक्शन संचालनालयाने मंजूर केलेल्या मानदंडांचे पालन करते. सध्याच्या एगमार्क मानदंडांमध्ये 205 वेगवेगळ्या वस्तूंच्या डाळी, तृणधान्ये, आवश्यक तेल, भाजी, फळे आणि भाज्या यासारख्या प्रक्रिया व अर्ध-प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी गुणवत्ता मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.
- शाकाहारी चिन्ह- विकल्या जाणार्या पॅकड फूड उत्पादनांना शाकाहारी व मासाहारी हा फरक ओळखण्यासाठी भारतात या चिन्हाचे लेबल लावणे आवश्यक आहे. कायद्यानुसार शाकाहारी भोजन हिरव्या चिन्हाने आणि तपकिरी चिन्हासह मांसाहारी पदार्थ ओळखले जाते.
- इंडिया ऑर्गेनिक सर्टिफिकेशन मार्क- सेंद्रिय उत्पादित खाद्यपदार्थाकरिता हे प्रमाणपत्र चिन्ह आहे.
4) इतर प्रकारचे आवश्यक परवाने व प्रमाणपत्र-
- आयात निर्यात प्रमाणपत्र,
- एफेडा फळ आणि भाजीपाला आयात आणि निर्यात करण्यासाठी एगमार्क
- राज्य / नगरपालिका संस्थांकडून दुकाने व आस्थापनांचे दुकान परवाना घेणे आवश्यक आहे.
- वजन व मापन परवाना
- ईएसआय, पीएफ, बाल कामगार धोरण
- पर्यावरण, जमीन इत्यादी बाबींसाठी परवाना (प्रक्रिया, रसायनांचा साठा वगैरे) संबंधित
- फेअर ट्रेड सर्टिफिकेट (सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीची अपेक्षा ठेवणार्या एफपीसींना लागू)
- पीजीएस प्रमाणपत्र (सेंद्रिय उत्पादनांसाठी लागू)
- थर्ड पार्टी ऑर्गेनिक सर्टिफिकेशन (सेंद्रिय उत्पादनांसाठी लागू)
- ईएसआय अधिनियमाअंतर्गत, (१० हून अधिक कर्मचारी कामावर असल्यास)
- स्टॉक विमा / वाहन विमा, आदि,
- स्थानिक ग्रामपंचायत / नगरपालिका कडून व्यवसाय स्थापण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र, इत्यादी पैकी आपल्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या परवान्यांची वा प्रमाणपत्रांची गरज असते.


This is very important information.
ReplyDeleteThanks
Delete