शेतकरी उत्पादक संघटना - (FPO) चे व्यवसाय नियोजन (बिझनेस प्लान)
शेतकरी उत्पादक संघटना - (एफपीओ) चे व्यवसाय नियोजन
(बिझनेस प्लान)
तर मूल्यवर्धन साखळी विकास (व्हॅल्यूचेन डेव्हलपमेंट) संकल्पना काय आहे?
व्हॅल्यू चेनमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांत सर्व क्रिया एकमेकांशी निगडीत असतात, ज्यात कच्च्या मालाची खरेदी व इतर साधनांसह उत्पादनांच्या वेगवेगळ्या टप्प्यांत विशिष्ट उत्पादनाचे मूल्य जोडले जाते. उदा. दुधाळ जनावरांची खरेदी करण्यापासून ते ग्राहकांना दुधाच्या पाकिटांच्या वितरणापर्यंतची संपूर्ण साखळी ही दुधाची मूल्य साखळी आहे. ह्याच्या प्रत्येक टप्प्यावर मूल्य जोडले गेले असले तरी, दूध शीतकरण, पास्च्ररायझेशन आणि प्रक्रिया यात मोठ्या प्रमाणात मूल्य साखळीची भर पडते.
q शक्यतो
एफपीओ मूल्यवर्धन साखळीत कोणतीही एक किंवा अधिक प्रक्रिया (Activities) निवडू
शकतो.
q मूल्यवर्धन साखळी (व्हॅल्यू चेन) संकल्पनेचा काय फायदा आहे?
• इनपुट सप्लाय, उत्पादन विक्री आणि सेवा या दोहोंच्या किंमती मध्ये पिओ ला नफा असू शकतो.
• कृषी व्हॅल्यू चेनमध्ये खालील घटकांवर फायदे मिळू शकतात जसे, खर्च कमी
करणे किंव्हा विक्रीवर जास्त
फायदा घेणे,
•
व्यवसाय प्रक्रिया: एकत्रीकरण, ग्रेडिंग आणि लॉजिस्टिक्स व्यवस्था करणे,
•
उत्पादनक्षमता: मनुष्य, साहित्य, पैसा, इनपुट आणि आउटपुट
•
वखार (Warehouse): जागा, खर्च आणि लॉजिस्टिक्स
•
प्रक्रिया: स्वतः किव्हा बाहेरून (Outsourcing)
•
उत्पादने (Products): कच्च्या मालावर
प्रक्रिया फायनल
पदार्थ तयार करणे,
•
जोखीम कमी करणे (Risk Mitigation)
बिझनेस प्लान काय असते?
• व्यवसाय योजना हे एफपीओ चे एक दस्तऐवज असते, ज्यात
व्यवसायाचे मिशन, बाह्य आणि अंतर्गत परिस्थितीचे सखोल विश्लेषण केले जाऊन त्या समस्यांसंबंधित धोरण आखले असते. बिझनेस सुरु करण्या आधी हे दस्तऐवज तयार
केले जाते.
• व्यवसायाची संकल्पना, व्यवसायाची संधी, स्पर्धा, यशस्वी होनेसाठी या सर्वांचा समावेश यात करावा लागतो.
• थोडक्यात, व्यवसाय योजनेत “कोण
/ काय
/ कोठे
/ केव्हा / का
/ कसे
/ कसे
/ किती”
या प्रश्नांची उत्तरे असणे आवश्यक आहे.

पीओला बिझनेस प्लान ची गरज का आहे?
• आकाराने
कितीही छोटा किंव्हा मोठा असो
प्रत्येक व्यवसायात नियोजन आवश्यक असते.
• स्वताचा
विकास आणि बाजारात टिकाव धरणे करिता नियोजन मदत करते.
• अपेक्षित आणि अनपेक्षित संधी (Opportunities) आणि भविष्यातील अडथळे (Threats) पार करण्यासाठी हे सखोल कल्पना देते.
• पीओच्या बाबतीत, हे अधिक महत्वाचे आहे कारण बहुतेक सदस्य प्रथमच व्यावसायिक म्हणून काम करतील.
बिझनेस प्लान पीओला खालील प्रकारे
मदत करते?
a) बिझनेस
प्लान आपल्या बिसनेसची बाजारात व्यवहार्यता चेक/
परीक्षण करण्यात मदत करते.
b) बिसनेसचे
प्लानिंग व अंमलबजावणी सोयीचे करण्यास मार्गदर्शन करते.
c) वित्तपुरवठा करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. फायनान्सर प्लानच्या आधारावरच पीओला तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगू शकतात.
बिझनेस प्लान कसा तयार करावा?
मॉडेल बिझनेस प्लानमध्ये खालील गोष्टींचा उल्लेख असतो.
•
सारांश- (Executive Summary)
•
व्यवसायाचे सविस्तर वर्णन- (Business
Details)
•
उद्योग / क्षेत्र विश्लेषण- (Industry/ Sector
Analysis)
•
विपणन योजना- (Marketing Plan)
•
ऑपरेशन्स योजना-( Operations Plan)
•
आर्थिक योजना- (Financial Plan)
A)
सारांश (Executive Summary):
•
उद्योग आणि बाजारपेठेतील वातावरण ज्यामध्ये संधी मिळेल आणि एफपीओचा विकास होईल त्याचा परिचय देणे,
•
खास आणि युनिक बिसनेस आयडिया व त्यात येणाऱ्या
समस्या सोडवण्याची यशस्वी रणनीती (Problem Solving strategy)
काय
असणार,
•
स्पर्धक उत्पादन तसेच उत्पादक यांचेवर
मात कसे करणार,
•
आर्थिक संभाव्यता – बिसनेस मधील अपेक्षित रिस्क/ जोखीम आणि त्याचे नियोजन,
•
व्यवस्थापक टीम (Management
Team),
•
संसाधने किंवा भांडवलाची विनंती संदर्भ स्टेटमेंट. आदी गोष्टींचा
समावेश करावा.
B)
व्यवसाय वर्णन- (Business Description):
·
व्यवसायाचे वर्णन मध्ये, इतिहास,
फोटो, मूलभूत स्वरूप, व्यवसायाचे
उद्दीष्ट, आणि व्यवसाय यशस्वी कसा होईल याचा संक्षिप्त अहवाल आदी, जेणेकरून
बिसनेस ची संकल्पना स्पष्ट होणार.
·
व्यवसायाच्या वर्णनाची उद्दीष्टे स्पस्ट करणेकरिता खालील
गोष्टी घ्यावे,
i.
व्यवसायाची संकल्पना स्पष्टपणे समजून येणार,
ii.
उद्योजकांचा उत्साह स्पष्टपणे दिसून येणार,
iii.
वास्तव चित्र दर्शविणे,
C)
उद्योग विश्लेषण (Industry Analysis):
·
उद्योगाबाबतचा समज, त्यातील स्पर्धा आणि व्यवसायातील महत्वपूर्ण बाबी समजून घेणेकरिता. व्यवसायातील खरी समस्या सोडविणारी व सदस्यांना खरी संधी ओळखण्यास हे विश्लेषण मदत करेल.
·
विश्लेषणाचा फायदा खालीलप्रमाणे होतो,
a.
व्यवसायाच्या वातावरणाची संपूर्ण समज मिळते,
b.
प्रभावी विपणन योजना विकसित (Effective Marketing
plan Development) करण्याला मार्गदर्शक ठरते,
c.
(Sponsors) वित्त पुरवठादारांचे मन वळवण्यास मदद करते,
D)
विपणन योजना (Marketing Plan):
·
विपणन योजना उत्पादन कसे विकले जाईल याचे वर्णन करते, आपला व्यवसाय ग्राहकांना कसा प्रवृत्त करते याचा संदर्भ ह्यात घ्यावा,
ह्याचे दुहेरी उद्देश असतात,
a) सुसंगत विपणन योजना व्यवसायाची कल्पना व यशस्वीता तपासण्यास तसेच पर्याय निवडन्यास व यशस्वी होण्यास मदत करते,
b) चांगल्या कल्पनां व सुसंगत विपणन योजनेद्वारे व्यवसायाच्या कार्यक्षमतेबद्दल पटवून देते,
E)
विपणन धोरण (Marketing Strategy):
·
विपणन योजना ही कोणतीही नवीन रणनीतीवर आधारित पाहिजे,
यात संस्थात्मक, उत्पादन, मानव संसाधन आणि आर्थिक योजनांवर माहिती दिली जाते.
F)
बाजार विश्लेषण (Market Analysis):-
·
बाजाराच्या विश्लेषणामध्ये खालील बाबींचा समावेश केला पाहिजे:
- एकूण बाजारपेठ
(व्यवस्था, अंतर, ट्रान्सपोर्ट,
मागणी, आदी,)
- बाजारातील आव्हाने
- बाजाराचे विभाग, मागणी
आणि नफा
- कोणते बाजार टार्गेट करायचे आणि टार्गेट ग्राहक
- ग्राहकाचे वर्णन
- प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष
प्रतिस्पर्धी,
G)
ऑपरेशन्स प्लॅन :
·
ऑपरेशन्स म्हणजे (Activities) प्रक्रियांची
अंमलबजावणी करणे होय. ऑपरेशन्स प्लान हा व्यवसायातील दैनंदिन कामकाजाचा प्रवाह आणि बिजनेसला समोर नेणाऱ्या धोरणांचे अवलोकन करते.
·
ऑपरेशन्स प्लॅन करताना कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष
केंद्रित करावे याचा उल्लेख असावा.
H)
वित्तीय प्लान (Financial Plan):
·
वित्तीय प्लान मध्ये
सर्व बाबींचा समावेश
असतो, जसे- संधी
(Opportunity), ऑपरेटिंग आणि मार्केटिंग प्लान, मानव संसाधन आदी,
·
यात सद्यस्थिती आणि व्यवसायाचा भविष्याचा अंदाज असावा.
·
ह्यात आर्थिक फायद्याच्या दृष्टीने
रिस्क / जोखमींचे जास्तीत
जास्त अंदाज आणि गुंतवणूकीवरील परतावा दर्शवावा लागतो.
·
आर्थिक योजनेत साधारणत: तीन वित्तीय बाबींवर चर्चा केली जाते:
a.
भांडवलाची आवश्यकता आणि वित्तपुरवठा नियोजन,
b.
आर्थिक अंदाजपत्रक,
c.
आर्थिक परतावा (गुंतवणूकीवर परतावा, परताव्याचा अंतर्गत दर, निव्वळ वर्तमान मूल्य)
I)
'बजेट’
(Budget):
·
सर्व प्रकारचे आर्थिक स्त्रोत आणि त्याचे उपयोग यांचा अंदाज करणे म्हणजे बजेट आहे.
·
बजेट हे आपल्याला,
अर्थसंकल्पांद्वारे आपल्याकडे किती पैसे आहेत किंवा किती येऊ शकतात, ते कोठे वापरायचे आणि आर्थिक लक्ष्य कसे प्राप्त करायचे, हे निर्धारित करण्यात मदत करते.
·
व्यवसायामध्ये आणि बाहेरील पैशांचा प्रवाह दर्शविते.
·
बजेटचे तीन मूलभूत घटक आहेत:
a.
विक्री महसूल (Revenue)
b.
खर्च (Expenditure/ Costs)
c.
नफा (Profits)
व्यवसाय
कल्पना
(Ideas) कशा निर्माण करता येतील?
·
विशिष्ट व्यवसायाची निवड करून ते यशस्वी करणे
ही मुख्यत्वे आव्हानात्मक प्रक्रिया असते.
·
फार्मर प्रोडूसर कंपनी च्या व्यवसायाची
निवड करतांना खालीलगोष्टीवर
भर द्यावा
a) प्राथमिक उत्पादकांनी अनुभवलेल्या समस्येवर आधारित व्यवसाय असू शकतो. उदा, मोठ्या बाजारपेठेत शेती उत्पादनांची सामूहिक विक्री केल्यास मध्यस्थांची भूमिका कमी होईल आणि उत्पादकांना चांगली किंमत मिळेल. बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादी शेतीविषयक साधनांची एकत्रितपणे खरेदी करणे आणि उत्पादकांना त्यांची विक्री करणे, त्यामुळे प्रति
युनिट किंमत कमी होणार तसेच गुणवत्ता सुनिश्चित करता येते.
b) नवीन तंत्रज्ञानाचा किंवा साहित्याचा भासणारी गरज
पूर्ती करणे, उदा. लहान शेतकर्यांना भाडे तत्वावर ट्रॅक्टर, पॉवर-टिलर, ट्रान्सप्लांटर, हार्वेस्टर, थ्रेशर इत्यादीकरिता कृषी सेवा केंद्र तयार करण्याची कल्पना उत्पादन वाढविण्याबरोबरच उत्पादन खर्चही कमी करू शकते. त्याचप्रमाणे दूध उत्पादकांसाठी मोठ्या प्रमाणात दूध शीतकरण युनिट स्थापन करणे ही चांगली व्यवसाय कल्पना असू शकते.
c) फी-आधारित विस्तार सेवा प्रदान करण्यासाठी अॅग्री-क्लिनिक स्थापित करणे.
व्यवसायातील संधी (Opportunities)
आणि आव्हाने
(Challanges) कसे
ओळखावे?
·
व्यवसाय निवळ केल्यानंतर, त्या
व्यवसायातील संधी व आव्हाने खूप क्रिटिकल पद्धतीने विश्लेषण करून, त्याला
दस्तावेजीकरण करावे.
·
व्यवसायातील संधी व आव्हानाचे विश्लेषण खालील गुणधर्मांनुसार केले जाते:
a.
बाजाराचा आकार
b.
त्याची स्थिरता म्हणजेच, उत्पादनाची दीर्घकालीन किंवा तात्पुरती मागणी,
c.
कोणते उत्पादन बाजाराची मागणी पूर्ण
करीत नाही आहे,
d.
स्पर्धा किती प्रमाणात आहे -(उच्च, मध्यम किंवा कमी)
e.
किंमत आणि दर्जाबाबत बाजाराची संवेदनशीलता,
f.
बाजारात पोहोचण्याकरिता अडथळे (Barriers
to entry in the market),
g.
सरकारी धोरणे, अनुदान, कमी
दरात निधीची उपलब्धता. आदी,
(Risk
Mitigation Strategy) जोखीम
ओळखून सुरक्षितता प्रदान करणे:
·
व्यवसातातील जोखीम किंवा धोके ओळखून व्यवसायाला सुरक्षितता प्रदान
करणे या मुळे शक्य होते.
·
एफपीओ मध्ये जोखीम मूल्यांकन यंत्रणा (Risk Mitigation
Committee) आणि जोखीम कमी करण्याचे धोरण विकसित करणे महत्वाचे आहे.
·
जोखीम व्यवस्थापन धोरणाच्या विकासासाठी पाच महत्त्वाच्या पायर्या आहेत.
a.
पहिली पायरी – (प्रक्रियांना / घटकांना ओळखणे आणि त्याचे म्यापिंग करणे) उदा, खराब पावसाळ्यामुळे पीक उत्पादनावर तीव्र परिणाम होईल आणि त्यामुळे पीओची मिळकत कमी होईल.
b.
दुसरी पायरी – (महत्वपूर्ण पायाभूत सुविधा- ज्यामध्ये प्रक्रिया, संबंध, लोक, नियम, वनस्पती आणि उपकरणे यांचा समावेश आहे)- उदा, जर बल्क मिल्क चिलिंग युनिटमध्ये ब्रेक-डाऊन होत असेल तर, दुधाचा संपूर्ण साठा खराब होईल,
c.
तिसरी पायरी- (मुख्य असुरक्षा ओळखणे)- (एखाद्या घटनेच्या किंवा जोखमीच्या प्रतिकूल परिणामाचा सामना करण्यास असमर्थता). उदा, पेकिंग बाबतचे नियमात बदल होणे,
सरकारी
नोटीस आदि,
d.
चौथी पायरी- (विकनेस ओडखने)- ज्यावर इतर बाबी अवलंबून असतात. उदा, सर्व उत्पादनांसाठी एकच खरेदीदार असणे,
e.
शेवटची पायरी- (जोखीम कमी करण्यासाठी नियोजित प्लान तयार करणे) उदा, विजेची
अल्टरनेटर व्यवस्था करणे. आदी,


Best information
ReplyDelete👍👍
Delete