Yellow Sticky Trap - पिवळे चिकट सापळे
पिवळे चिकट सापळे
चिकट सापळे
(स्टिकी ट्रॅप) काय असते?
टीन पत्रे
/ प्लायवुड / कार्डबोर्ड / फोम
शीट / अक्रिलिक शीट यापैकी कोणत्याही प्रकारचे विशिष्ट
आकाराचे तुकडे ज्याच्या दोन्ही बाजूंना चिकट व न सुकणारे
द्रव्य लावलेले असते, त्याकडे रस शोषणाऱ्या किडीं विशिष्ट रंगामुळे आकर्षित होतात
व चिकट द्रव्यावर घट्ट चिकटून तेथेच मरतात, त्यामुळे अश्या पत्र्यांना किंव्हा
तुकड्यांना चिकट सापळे म्हणतात. हे चिकट सापळे गडद पिवळ्या तसेच गडद निळ्या
रंगाचे असतात.
- गडद पिवळ्या रंगाचे चिकट सापळे पांढरी माशी, तुडतुडे, मावा व नागअळी या किडींना आकर्षित करतात.
- गडद निळ्या रंगाचे चिकट सापळे फुलकिडे आणि मावा किडींना आकर्षित करतात.
चिकट सापळे कूठे उपलब्ध होतात-
चिकट सापळे हे कृषी सेवा
केंद्र किंव्हा ऑनलाइन साईट वर उपलब्ध होतात. परंतु अत्यंत कमी खर्चात
घरगुती पद्धतीने सुद्धा आपल्याला घरी ते तयार करता येऊ शकतात.
घरगुती पद्धतीने चिकट सापळे
बनविण्याची कृती-
साहित्य- १) टीन पत्रे / प्लायवुड / कार्डबोर्ड / फोम
शीट / अक्रिलिक शीट या पैकी काहीपण. २)
प्रायमर रंग
(पिवळ्या
सापळ्यासाठी लख्ख/ तेजस्वी पिवळा / सोनेरी पिवळा रंग /
निळा सापळा करण्यासाठी तेजस्वी निळा किंव्हा आकाशी निळा रंग), 3)
एरंडी तेल / ग्रिस (मोटारसायकल/ ट्रक्टर यांचे वापरलेले/ जळलेले आईल), ४) ब्रश, ५)
लाकडी / बांबूच्या काठ्या, ६) सेन्ट्रीग तार / नायलॉन रस्सी / सुतळी, इत्यादी.
तयार करण्याची पद्धती -
१)
फोम शीटचे (१५ बाय ३० सेमी किंवा
३० बाय ४० सेमी आकाराचे तुकडे) कापून घेणे. २) फोम शीट दोन्ही बाजूंनी
काठाने चारही बाजूने किमान एक सें.मी. रिकामी जागा सोडून प्रायमर रंग
लावून घ्यावा. (प्रायमर नसल्यास, डिटर्जेंट पावडर २०० ग्रॅम प्रति २ लिटर पाणी या
प्रमाणात घेऊन टीन पत्रे, शीट्स
भिजत ठेवावेत. नंतर दोन्ही बाजूने एक दिवसाआड कोणताही उपलब्ध परंतु जलरोधक (Waterproof) रंग लावावा. दुसऱ्या
वर्षीपासून दर हंगामाआधी एकेरी रंग द्यावा. हे सापळे व्यवस्थित वापरल्यास ४-५
वर्षे टिकतात. ३) पेंट केलेल्या तयार शीट लाकडी किंव्हा बांबूच्या सहाय्याने
शेतात घट्ट बांधून रोपून घेणे. ४) बांधलेल्या पत्र्यांना ब्रशच्या सहाय्याने ग्रिस / एरंड
तेल किंव्हा जळलेले आईल लावून घेणे.
शेतात चिकट सापळ्यांची संख्या एकरी किती असावी?
·
सर्वेक्षणासाठी:
१५
बाय ३० सेंमी आकाराचे १००० चौ. मीटरला एक या प्रमाणात लावावेत.
·
किडीच्या
नियंत्रणासाठी: प्रति १०० चौरसमीटरला एक या प्रमाणे सापळे लावावेत.
सापळे लावण्याची पद्धत- योग्य ठिकाणी काठी किंव्हा बांबू जमिनीत
खोचून घ्यावा, चिकट सापळे जर बाजारातून रेडीमेड विकत आणले असल्यास सर्व प्रथम त्यावरील पारदर्शक आवरण काढून टाकावे, सापळ्याला वरच्याबाजूने
मध्यंतरी दोन छिद्रे घेऊन नायलॉन दोरी/ सेन्ट्रीग तार किंवा
सुतळीने काठीला घट्ट बांधावे. सापळे घरी तयार केले असल्यास सापळा काठीबरोबर उभा
करून, त्यावरून ब्रशच्या सहाय्याने ग्रिस / एरंड तेल किंव्हा जळलेले आईल
लावून घ्यावे. पांढरी माशी आणि तुडतुडे या किडीच्या नियंत्रणासाठी सापळयाची
उंची पिकाच्या उंचीपेक्षा १५ सेंमी खाली ठेवावी. याउलट मावा आणि फुलकिडे
नियंत्रणासाठी सर्वसाधारणपणे पिकाच्या उंचीच्या समकक्ष किंवा उंचीपेक्षा १५ सेंमीपर्यंत
अधिक उंचीवर असावे, जेणेकरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर
किडे उडतांना सापळ्याला चिकटणार. वाढत्या पिकाच्या उंचीबरोबरच सापळ्याची उंची
वाढवावी. सापळे
झाडांच्या रांगेमध्ये व झाडापासून किमान २० सेंमी अंतरावर लावावे. ते झाडांना
चिटकणार नाहीत, याची काळजी
घ्यावी. हरितगृहे किंवा काचगृहामध्ये चिकट सापळयांच्या वापराकरीता २५ चौ.
फुटाकरिता एक सापळा वापरावा.
सापळे लावतांना घ्यावयाची काळजी-
आंतरमशागतीच्या वेळी चिकट सापळ्यांना बैल किंवा वखर, डवऱ्याचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. चिकट सापळे
किटक चिटकल्यानंतर दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनी ओल्या कापडाने पुसून स्वच्छ
करून कोरडे होऊ द्यावेत. नंतर पुन्हा त्यावर एरंडी तेल किंवा ग्रीस किंवा जडलेले
ऑईल लावावे. संशोधन संस्थांच्या निष्कर्षानुसार वाऱ्याचा वेग व दिशा यामुळे
किटकाचे सापळ्याकडे आकर्षित होणे ठरते, त्यामुळे दिशेनुसार सापळे लावावेत. उत्तर - पूर्व (ईशान्य) व दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) दिशेने पिवळे / निळे
चिकट सापळे लावावेत.
*****************************************************


Comments
Post a Comment