FPO- FAQ Series (Part- 2)

 FPO- शेतकरी उत्पादक संस्थेबाबत सामान्यतः विचारले जाणारे प्रश्न


मित्रहो, बऱ्याच लोकांच्या मनात शेतकरी उत्पादक कंपनी बाबत प्रश्न निर्माण होतात, हे लक्षात घेऊन लोकांच्या मनात येणाऱ्या प्रश्नाबाबत माहिती देण्याकरिता FPO- FAQ Series च्या माध्यमातून समजून घेऊया,

उत्पादक संस्थेची विशेषतः काय आहेत?

·         उत्पादकांची कंपनी ही शेतीकरी किंव्हा बिगर-शेती कामगार/ कारागीर याकरिता तयार केली असते.

·         उत्पादक कंपनी ही कायदेशीर अस्तित्व असलेली नोंदणीकृत संस्था असते.

·         संस्थेचे सभासद हे प्राथमिक उत्पादक असून ते भागधारक / शेअर होल्डर्स असतात.

·         ही संस्था आपल्या सभासदांच्या नफ्याकरिता कार्य करीत असते.

·         ह्या कंपनीच्या नफ्यातील एक भाग सभासदांमध्ये वितरीत केला जातो तर उर्वरित रक्कम संस्थाचा विस्तार करण्या करिता वापरला जातो.  

उत्पादक कंपनीचे मालक कोण असतात?

उत्पादक कंपनीचे मालक हे तीचे सर्व सभासद सदस्य असतात, संस्थेचे मालकी नेहमीच सदस्यांची असते तर फक्त व्यवस्थापन करण्याकरिता सभासदांचे प्रतिनिधी कार्यभार सांभाळतात. उत्पादक कंपनी / संस्था ही फक्त  उत्पादकांची आणि उत्पादकांचीच एक संस्था आहे. एक किंवा अधिक संस्था आणि / किंवा व्यक्तींनी एकत्रित येऊन संस्थेची / कंपनीची नोंदणी करणे, कंपनीच्या व्यवसायाचे नियोजन करणे आणि संस्थेचे/ कंपनीचे संचालन करून जास्तीत जास्त जाहिरात करणे, अश्या प्रकारची अनेक स्टेप्स उत्पादक कंपनी / संस्था बाबतीत करायच्या असतात.

शेतकरी उत्पादक कंपनीची प्रसिद्धी / जाहिरात कोण व कशी करू शकतो ?

कंपनीचे सभासद, संचालक, किंव्हा इतर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था शेतकरी उत्पादक कंपनीची प्रसिद्धी/ जाहिरात करू शकतात. कोणतीही व्यक्ती/संस्था उत्पादक कंपनीच्या आर्थिक विकासाला चालना देण्याकरिता उपलब्ध संसाधनांचा उपयोग करुन संस्थेला प्रोत्साहन देऊ शकतात.

शेतकरी उत्पादक संस्था/ कंपनी करिता कोण सहाय्य करू शकतो ?

भारत सरकारची राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड), एसएफएसी, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सरकारी विभाग, NGOs, कॉर्पोरेट्स, इतर कंपन्या त्यांच्या CSR फंडातून सहाय्य करू शकतात. याव्यतिरिक्त भारतातील तसेच भारताबाहेरील संस्था ज्या विकास कार्यात मदत करतात. ह्या संस्था शेतकरी उत्पादक कंपनीच्या / संस्थांच्या बांधणीकरिता, आर्थिक, तांत्रिक सहाय्य करीत असतात.

स्वयंसेवी संस्था (NGO) शेतकरी उत्पादक कंपनी तयार करू शकतात काय ?

स्वयंसेवी संस्था ह्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करू शकतात आणि त्याच्या आर्थिक समृद्धीसाठी आवश्यक मदत करू शकतात.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय