FPO- Learning From Experience - शेतकरी उत्पादक कंपनी- अनुभवातून शिकवण
बऱ्याच मित्रांच्या प्रतिक्रिया आल्यात की, त्यांना
त्यांचे गावात काही शेतकरी मिळून शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) तयार
करावयाची इच्छा दर्शविली, आणि त्याकरिता त्यांना उदाहरणादाखल काही अश्या शेतकरी
उत्पादक कंपनीची माहिती हवी आहे की, जिथे शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र येऊन,
कोणत्याही NGO च्या मदतीशिवाय स्वतःची शेतकरी कंपनी उभी करून यशस्वीपणे संचालित
करीत आहेत, अश्याच एका शेतकरी उत्पादक कंपनीबाबत नाबार्डची सलग्न संस्था नॅबकिसान (https://www.nabkisan.org) यांनी अभ्यास केलेल्या उत्पादक कंपनीची यशोगाथा
जाणून घेऊ या........
शेतकरी उत्पादक कंपनीचे नाव- कृषीदीप
अग्रीकल्चर प्रोडुसर कंपनी.
गाव- बोरगाव, तालुका- मालेगाव, जिल्हा-
वाशीम, महाराष्ट्र.
वाशीम जिल्यातील, मालेगाव तालुत्यातील
बोरगाव गावच्या १० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन २००९ मध्ये शेतकरी बचत गटाची सुरवात केली, गटाचे काम सुरळीतपणे सुरु असतांना सरकारी विभागाच्या मार्गदर्शनाने त्यांनी २०१४ मध्ये गटातील सभासदांना घेऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली, त्याचे नाव कृषीदीप अग्रीकल्चर प्रोडुसर कंपनी असे नोंदणी केले. कंपनीचे ध्येय
असे होते की, गावात सोयाबीन आणि हरभरा यांचे प्रमाणित बीज उत्पादन करून त्यांची
साठवणूक करण्याकरिता इन्फ्रास्ट्रक्चर (गोदामे) उभे करणे आणि कृषी विभागामार्फत ते
प्रमाणित बियाणे विक्री करून सभासदांना अधिक उत्पादन मिळवून देणे.
याकरिता कंपनीने सोयाबीन व हरभऱ्याची बियाणे साठवणुकीसाठी गोदाम बांधकाम करून घेण्याकरिता नाबार्डकडून कर्ज घेतले व प्रत्येकी 500 मेट्रिक टन क्षमतेच्या दोन गोदामांचे बांधकाम करून घेतले. या
गोदामांमध्ये सोयाबीन व हरभरा बियाणे साठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडूनही मान्यता प्राप्त करून घेतली.
हे सर्व करतांना कंपनीच्या संचालकांना हे समजले की कंपनीचे यश हे जास्तीत जास्त मार्केट लिंकेज करण्यावर निर्धारीत आहे. आणि त्याकरिता त्यांनी अधिकाधिक मार्केट
लिंकेज मजबूत करण्याच्या दिशेने कार्य केले. कंपनी मार्फत शासकीय कृषी विद्यापीठांशी करार करून पायाभूत बियाणे (Foundation Seed) खरेदी केली जाते आणि त्याचे पिक घेऊन आलेल्या
उत्पादनापासून प्रमाणित बीज तयार करून महाराष्ट्र कृषी विभागाला विकल्या जाते. अश्याप्रकारे ही कंपनी आपल्या सभासदांना बीज व्यवसायातून
अधिकाअधिक फायदा मिळवून देत आहे. आज त्यांचा व्यवसाय करोडो रुपया पर्यंत पोहोचलेला
आहे. याकरिता कंपनीने नाबार्ड, नॅबकिसान तसेच स्थानिक बँकेच्या माध्यमातून ०५ वेळा साधारणतः २.००
करोड पेक्ष्या जास्त लोन घेऊन परत केलेत.
वरील उदाहरणावरून असे लक्ष्यात येते की, १) आपल्या
क्षेत्रात असलेली शेतकऱ्यांची गरज ओळखून, त्यावर नियोजनबद्ध व मेहनीतीने कार्य केल्यास
त्याचे संधीत रुपांतर होऊन आपल्याला यश मिळू शकते व आपण आपले ध्येय पूर्ण करू शकतो.
२) कंपनीला यशस्वी करण्याकरिता मार्केट लिंकेज खूप जास्त महत्वाचे आहे.

Nice
ReplyDelete