सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास

सामुहिक प्रयत्नातून पावसावर आधारित शेती विकास 


शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपायहा लेख वाचून एका मित्राने फीडबॅक दिला की, Land holding कमी असल्याने शेतकरी एकत्र येऊन शेती करणे आवश्यक परंतु dryland Agriculture मध्ये निसर्गाच्या लहरी पणा मुळे शाश्वत उत्पन्न येईलच याची खात्री नाही त्यामुळे जोखमीचे आहे” ..... त्यांचा हा फीडबॅक खूप चांगला आणि अतिशय महत्वाचा आहे, असे प्रश्न मनात येणे साहजिकच आहे, आपल्या राज्यात तसेच देश्यात शेती ही खूप मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून आहे, आणि वातावरणातील होत असलेल्या बदलामुळे अवकाळी पाऊसामुळे पीक घरी येई पर्यंत शास्वती नसते की, पीक होणार कि नाही.

वरील फीडबॅक नुसार तसे बघता, संघटन करणे आणि निसर्गावर आधारित शेती करणे ह्या दोन्ही गोष्टी अगदी वेगळ्या आहेत. आणि जर संघटन असेल तर कोणत्याही प्रश्नावर उत्तर मिळविता येऊ शकते. असो, तर निसर्गावर आधारित शेती किंव्हा पावसावर आधारित शेती बाबत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू या....

पावसाच्या पाण्यावर आधारित शेतीमधील आव्हाणे काय आहेत- 

  • पावसावर आधारित शेती करणारा शेतकरी सामाजिकआर्थिक दृष्टया साधारणतः गरिब दिसून येते.
  • पावसाचे प्रमाण आणि वितरणामध्ये खूप भिन्नता असल्यामुळे वारंवार दुष्काळ पडत असतो.
  • जमीन आणि मातीची गुणवत्ता खराब दिसून येते.
  • खत व इतर संसाधनाचा अभावआणि असंतुलित वापर होतांना दिसून येतो.
  • शेतीचा आकार लहान असल्यामुळे शेतीचे यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
  • सामाजिक-आर्थिक परिस्थिती हालाखीची आणि जोखीम सहन करण्याची क्षमता कमी दिसून येते.
  • आर्थिक पतपुरवठ्याचा अभाव दिसून येतो.
  • सुधारणात्मक धोरणांचा अभाव सुद्धा दिसून येतो.
  • अविकसित ग्रामीण बाजारपेठेला जोडणारी पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो.

अश्याप्रकारची वेगवेगळी आव्हाने पावसावर आधारित शेती करणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांपुढे आहेतच. याची ठळक कारणे बघितली तर दिसून येते की,

·         संसाधनांचा अभाव- मग ते सिंचनाच्या सोयी असेल, आर्थिक पाठबळ असेल, शेती करण्याकरिता लागणारे मनुष्यबळ, खते, यंत्र, औषधे, वीजपुरवठा, शास्वत बाजारपेठ आदिचा अभाव असल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण असते.

·         तांत्रिक माहितीचा अभाव- संसाधने असोत की नसोत जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती करण्याच्या तंत्रज्ञाचा अभाव दिसून येतो.

·        इतर  उत्पन्नाचे साधनांचा अभाव (जसे- दुय्यम व्यवसाय)- बऱ्याच शेतकऱ्यांकडे दुय्यम व्यवसायासारखे ठोस उत्पन्न देणारे साधन नसते, त्यामुळे सुद्धा कुटुंबाकडे नियमित उत्पन्न येत नाही.

       या प्रकारचे बरेच करणे आहेत, 

     मग अश्या परीस्थितीत छोटे शेतकरी पावसावर आधारित शेती करतांना कोणत्या उपाययोजनांचा  स्विकार करू शकतो- 

  •  माती आणि जलसंधारण सुधारण्याच्या दृष्टीने सामुहिक उपाययोजना करणे.
  • सामुहिक प्रयत्नाने संसाधनाची उपलब्धता करणे.
  • सामुहिक प्रयत्नाने कोरडवाहू शेतीच्या आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून शेती करतांना तश्याप्रकारच्या सुधारणा कराव्यात.
  • पीक पद्धती, पिकांचे वान, लागवडीच्या पद्धती मध्ये सामुहिकरित्या बदल करून तज्ञांच्या मार्गदर्शनाने आपल्या परिसराला अनुसरून बागायती शेती पध्दतीचा अवलंब करावा.
  • नियमितपणे थोडेफार उत्पन्न मिळेल अश्याप्रकारचे शेतीला जोडव्यवसाय करावा.

      याकरिता सरकारी योजना, कंपनी CSR फंड, NGO च्या मदतीने सामुहिक प्रयत्नानेच शक्य होऊ शकते. 

वरील सर्व उपाययोजना ह्या छोट्या एकट्या शेतकऱ्याला खूप कठीण आहे परंतु, असे निसर्गावर आधारित शेती करणारे छोटे शेतकरी एकत्र आले व मजबूत संगठन निर्माण केले तर यात यशस्वी योण्याची शक्यता अधिक आहे.

*************


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय