पीक उत्पादनात मुख्य अन्नद्रव्यांचे महत्त्व
पीक उत्पादनात मुख्य अन्नद्रव्यांचे महत्त्व-
कोणतेही पिक घेतांना पिकांच्या
अपेक्षित वाढीकरिता अन्नद्रव्यांची अतंत्य आवश्यकता असते व त्यांची पूर्तता वेगवेगळ्या
माध्यमातून होत असते. जसे- रासायनिक खते, सेंद्रिय खते, हिरवळीची खते, शेणखते, गांडूळ खते आदीमधून जमिनिद्वारे मातीतून अन्नद्रव्य मिळतात
तर काही सूक्ष्म अन्नद्रवे खते किंव्हा हवा आणि पाण्यातून पिकांद्वारे शोषून घेतले जातात.
पिकांच्या उत्कृस्ट वाढीसाठी तीन (०३) मुख्य अन्नद्रवे व तेरा (१३) प्रकारची
सूक्ष्म अन्नद्रवे आवश्यक असतात. या सर्वांची पिकांच्या वाढिमध्ये तसेच पिकांना रोगापासून
दूर ठेवण्यास महत्वाची भूमिका निभावत असतात. या लेखात मुख्य अन्नद्रव्य- नत्र (नायट्रोजन),
स्फुरद (फोस्फरस), व पालाश (पोटॅशिअम) बाबत समजून घेऊ या....
नत्र, स्फुरद व पालाश हे तीन मुख्य अन्नद्रवे पिकाला अतिशय जास्त महत्वाचे असतात आणि याचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात आवश्यक असते. शेतकरी याची पूर्तता रासायनिक खते- युरिया, सल्फेट / फास्फेट, पोटाश, डी.ए.पी., १९:१९:१०, अश्याप्रकारच्या खतातून तसेच सेंद्रिय शेती करिता सेंद्रिय खते, शेणखत, गांडूळ खत यामधून पूर्ण करतात.
नत्र (नायट्रोजन / युरिया ) – नत्र किंव्हा नायट्रोजनच्या योग्य वापरामुळे पिकात
हरितद्रव्यांच्या प्रमाण वाढ होऊन प्रकाशसंश्लेषनात मदत होते त्यामुळे पिकांची वाढ
मोठ्या प्रमाणात होते. नत्र खतामुळे पाने लूसलुसीत तजेलदार राहतात.
नत्र
(नायट्रोजन / युरिया) च्या कमतरतेमुळे पिकावर दिसून येणारी लक्षणे -
नत्राच्या
कमतरतेमुळे पानातील हरितद्रव्य कमी होऊन पणे पिवळसर दिसू लागतात, पानांची टोके व कडा जाळल्यासारख्या दिसतात तसेच पिकांची शाखीय वाढ कमी होते.
स्फुरद (फोस्फरस / सल्फेट)
- फोस्फरसच्या उपलब्धतेमुळे पिकांच्या मुळांचीवाढ होते,
पिकास फुटवे मोठ्या प्रमाणात फुटतात. त्याचबरोबर पिकाच्या खोडाला चांगली ताकद
येते. त्यामुळे झाड पडत नाही किंवा कोलमडत नाही, नैसर्गिकरित्या फळे व्यवस्थित
पिकण्यात मदत होते, पिकाची शक्ती वाढवून पिकाची मुळे मजबूत करण्यास मदत होते.
स्फुरद
(फोस्फरस / सल्फेट ) च्या कमतरतेमुळे पिकावर दिसून येणारी लक्षणे -
स्फुरद
(फोस्फरस / सल्फेट) च्या कमतरतेमुळे पिकाच्या पानांना निळसर- हिरवी झाक व जांभळट ठिपके दिसून येतात. पाने लांबट
होऊन वाढ थांबते, फुटव्यांची संख्या कमी दिसून येते, खोडचा आकार बारीक होऊन कमजोर होतात.
पालाश (पोटॅशिअम / पोटाश) -
पोटॅशियमच्या उपलब्धतेमुळे झाड सशक्त बनते, त्याचबरोबर
झाडाची अन्न तयार करण्यासाठी क्षमता वाढते, पोटॅशियममुळे फळाची गुणवत्ता सुधारते. तसेच तृणधान्याच्या खोडाची
ताकद वाढते त्याने ते जमिनीवर पडत नाही व झाड कोलमडत नाही.
पालाश
(पोटॅशिअम / पोटाश) च्या कमतरतेमुळे पिकावर दिसून येणारी लक्षणे -
पालाश
(पोटॅशिअम / पोटाश) च्या कमतरतेमुळे पानाच्या कडा पवा टोके प्रथम पिवळसर पडून तो भाग करपतो, जुनी पणे सुकून करडी होण्यास प्रारंभ होतो, बिया व फडे आकसतात आणि फळांची गुणवत्ता बिघाळते.
पिकाला सर्वात जास्त वरील तीन अन्नद्रव्यांची आवश्यक्यता असते. उदा. धानपिकाला ८०:४०:४० प्रती हेक्टर या प्रमाणात नत्र:स्फुरद:पालाश ची गरज असते. बाकी अन्नद्रव्य खूप कमी प्रमाणात लागतात.
प्रत्येक खताच्या प्रकारानुसार त्यात उपलब्ध असलेल्या नत्र, स्फुरद व पालाश ची मात्रा वेगवेगळी असते. त्यामुळे शेतामध्ये खत टाकत असतांना खताच्या प्रकारानुसार योग्य प्रमाणात टाकावे व माती परीक्षण जरूर करून घ्यावे त्यानुसार आपल्याला शेतात किती व कोणते खत टाकावयाचे याबाबत तंतोतंत कल्पना येते.
पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्याबाबत
माहिती पुढील लेखात बघुया ........

Best information sir
ReplyDeleteThanks brother
DeleteGood job 👍👍👍
Delete