अंधारी येणे- घरगुती उपचार
घरगुती उपचार
चालताना, उठतांना, बसतांना, काही कामात मग्न असतांना कधीकधी डोळ्यांना अचानक अंधारी येते, डोके जड होते, छाती भरल्यासारखी होते व डोक्यात कळा येतात असे केव्हातरी किंवा वारंवार होत असेल तर काही घरगुती उपायाने आपल्याला २ दिवसात त्यातुंन आराम मिळु शकतो.
थोडीशी काळेमिरीची पावडर, मिठ व लिंबु एक ग्लास पाण्यात टाकुन पिल्यास लगेच आराम होतो.
शेवग्याची शिंग पाण्यात २ तास भिजवुन नंतर गरम करून त्याचे पाणि पिल्यास आराम होतो.
मोसंबीचा ज्युस व कोथींबीर एकत्र करून ग्लासभर घेतल्यास आराम होतो.
ग्लासभर पाण्यात तांब्याचे नाणे टाकुन पिताना २ थेंब लिंबु टाकुन पिल्यास आराम होतो.
बीट व ड्रॅगन फळाचे ज्युस घेतल्यास वारंवार होणारा त्रास थांबतो.
चालताना अचानक अंधारी आल्यास त्वरीत ५ पावले मागे यावे व बसावे त्रास लगेच थांबतो.
चक्कर येत असल्यास एका पायाचा तळपाय दुसर्या पायावर ठेवुन ऊभे राहिल्यास चक्कर थांबते.
दोन्ही हाताचे पंजे एकमेकांना जोरात घासुन जी ऊब तयार होते ती डोळ्यांवर लावल्यास चक्कर, मळमळ थांबते.
३ वेळेस जोरात तोंडावाटे हवा बाहेर फेकल्यास अचानक येणार्या कळा थांबतात.
१००% घरगुती व दुष्परिणाम मुक्त असे उपाय नक्कीच चांगले सकारात्मक परिणाम देतात. ज्यांना स्वताच्या हातांनी ऊब घेणे शक्य नसेल त्यांना हा उपाय इतरांनी केल्यास देखील आराम होतो.
निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.
Comments
Post a Comment