मोड आलेल्या कडधान्य- 'सुपरफूड'



 मोड आलेल्या कडधान्याला 'सुपरफूड' असं म्हटलं जातं. कडधान्यात असलेल्या अनेक उपयुक्‍त घटकांमुळे शरीराला भरपूर फायदा होतो. त्यामुळे शरीर सुदृढ आणि आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात नियमित मोड आलेली कडधान्ये असालयाच हवीत. मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने कोणते फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वच प्रकारची कडधान्ये पचायला सारखी नसतात. पचनाला सर्वात हलके कडधान्य म्हणजे मटकी. त्यानंतर मूग आणि चवळी. नंतर उडीद आणि हरभरा, कडू वाल आणि पावटा हे पचायला सर्वात कठीण असतात.

१: मोड आलेली कडधान्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व आढळतात.

2 - मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असतं.

3 - मोड आलेलं कडधान्य खाल्ल्याने वातुळपणा कमी होतो.मोड आणल्यामुळे टॅनीन आणि फायटीक अ‍ॅसीड यांचे निरूपद्रवी द्रव्यात रूपांतर होतं. ज्यामुळे शरीराला चांगला फायदा होतो.

5 - मोड आणल्यामुळे कडधान्य हलकं होतं आणि सहज पचतं.

मोड आलेली कडधान्ये वाळवल्यानंतर त्यातल्या कर्बोदकांचं आणि ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण वाढतंमोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय वाढते.

8 - मोड आलेल्या धान्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं आणि कर्बोदकं असतात. ज्यांचा दररोजच्या आहारात समावेश केल्यास आरोग्य उत्तम राहतं.


 विशेष सूचना:: ज्यांना uric acid चा त्रास होतो म्हणजेच सांधेदुखी होते त्यांनी protien diet टाळावे..

Uric Acid बद्दल लवकरच माहिती दिली जाईल,


निरोगी रहा, आनंदी रहा!!

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय