मणिपूर चक्र आणि रामरक्षा

 

मणिपूर चक्र आणि रामरक्षा--- एक अभ्यास! 

हे चक्र नाभिस्थानाजवळ असते.

ह्याला दहा पाकळ्या असून सत्वगुणात्मक सृष्टीचे पालन करणारा विष्णु याची अधिष्ठात्री देवता आहे.

२) शरीराचा मध्य बिंदू अर्थात गुरुत्वमध्य ह्याच चक्रात असतो. 

३) ह्या चक्रावर धारणा केल्याने चित्तात सत्वगुण वाढून ते स्थिर होऊ लागते.

४) धारणा म्हणजे काय? चित्ताची स्थिरता म्हणजे धारणा...

धारणा, ध्यान आणि समाधी या तीन्ही भिन्न गोष्टी आहेत.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर धारणा म्हणजे concentration... किंवा एकाग्रता

५) चित्त शरीरांतील एखाद्या भागावर स्थिर ठेवण्याचा अभ्यास करणे म्हणजे धारणेचा अभ्यास करणे होय

६) महत्त्वाचं--- एकदा आपल्याला आपल्या चक्रांचं शरीरातील स्थान माहीत झाले की त्या स्थानावर धारणा केली (त्या स्थानावर आपलं चित्त एकाग्र केलं) की त्या चक्रावर ती धारणा केली असं म्हणतात.

७) ज्या नाडीचक्रावर आपण चित्त स्थिर केलं (धारणा केली) की त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे व्यापार सुसूत्रपणे चालू लागतात.

उदाहरणार्थ , आपल्या शरीरातील खालील अवयव/ग्रंथी मणिपूर चक्राच्या नियंत्रणाखाली असतात(आणि याचे आपल्याला अजिबात ज्ञान नसते) ..

-Liver 

-Pancreas

-Small Intestine

-Kidney

- Adrenal Gland

-Gall bladder

आता मणिपूर चक्र बिघडलं की त्यासंबंधीत होणारे रोग पाहू या-----

-Indigestion

-Diabetes

-Acidity

-Ulcer

-Cholitis

-Appendicitis

-Kidney Stone

-Nephropathy.

मी वर उल्लेख केला आहे Adrenal Glands चा आणि त्याला bold केलं आहे... 

या glands खूप महत्त्वाचे हॉर्मोन्स निर्माण करतात त्यांचं नाव आहे--- adrenaline आणि  cortisol...  Adrenaline च़ level बिघडलं की खालील परिणाम होतात---- 

High Blood Pressure

High Blood Sugar

Depression

एखादी वाईट बातमी आली की आपले हृदयाचे ठोके वाढतात, बीपी वाढतं, भीति वाटते, excitement वाढते, anxiety वाढते.... ते कश्यामुळे ????? तर त्यावेळी आपल्या Adrenal Glands खूप उत्तेजित होतात म्हणून. यालाच आपण म्हणतो पोटात खड्डा पडला किंवा छातीत धस्सं झालं.

हा आघात आपल्या मणिपूर चक्रावर होतो, हृदयावर नाही... पण त्याचे परिणाम हृदयावर होतात

मग ते pressure release करायला लगेचच आपल्या systems activate होतात... काही लोकांना लगेच urine pass होतं , काही लोकांना तर लगेच शौचास जावे लागते... असं झालं की समजावं की तुमच्या systems व्यवस्थित काम करत आहेत.

अश्या परिस्थितीत आपण लगेच रामरक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात करतो.... खरं ना ?????

तर रामरक्षा च कां?

मणिपूर चक्राचं बीज अक्षर आहे रं

रं चा वारंवार उच्चार केल्याने आपलं मणिपूर चक्र आहत होतं आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व इंद्रिये / ग्रंथी उत्तेजीत होतात... सोप्या भाषेत सांगायचे तर charge होतात व त्यातून निघणारा स्त्राव regulated/ नियंत्रित होतो... परंतु नुसतं एकसारखे रं म्हणत राहिलो की कंटाळायला होईल.... आपल्या ऋषीमुनींना याचं पक्क ज्ञान होतं.... म्हणून त्यांनी रामरक्षा स्तोत्राची रचना केली..

रामरक्षेत किती वेळा *र अक्षर येतं ते मोजून पहा... त्याची आवर्तनं केलीत तर किती वेळा र चा उच्चार होईल याची कल्पना करा !!!! मग किती वेळा आपलं मणिपूर चक्र आहत होईल याचा विचार करा. 

परंतु आपण यांत्रिक पणे रामरक्षा म्हणत राहतो त्यामुळे जितका फायदा व्हायला हवा तितका होत नाही ...... कारण आपण आधीच बघितलं आहे की कुठल्याही चक्राला activate करायचं असेल तर त्याच्यावर *धारणा करायची असते... 

आपण रामरक्षा म्हणताना डोळे मिटून मणिपूर चक्रावर आपलं चित्त एकाग्र केलं तर निश्र्चितच आपलं चक्र activate होईल आणि सतत *र अक्षराच्या उच्चाराने निर्माण होणारी energy , त्या चक्रांतील नाड्यांचे आणि त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या इंद्रियांचे शुद्धीकरण व बळकटीकरण करेल... परिणामी त्याला संलग्न असलेले आजार पण मिटतील.

यापुढे  रामरक्षा म्हणण्यापूर्वी -

१)एका जागी स्वस्थ बसा

(घरात इकडे तिकडे डुलत डुलत, घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना रामरक्षा म्हटली तर त्याचा मणिपूर चक्रावर काहीच सकारात्मक परिणाम होणार नाही)

२) डोळ्यासमोर श्रीरामाची मूर्ती आणा ,

३) मणिपूर चक्रावर चित्त एकाग्र करा...

४)  नंतर रामरक्षा पठण सुरु करा

५) ९० दिवसांत आपल्या मणिपूर चक्राशी संबंधित organs वर काय positive फरक वाटतोय ते observe करा....

टीप: --- 

*योग, मेडीकल सायन्स आणि अध्यात्म असा हा समन्वय आपणास कुठल्याही पुस्तकात रेडीमेड मिळणार नाही..🙏🏻🙏🏻🙏🏻 


संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय