उंबर -औषधी उपयोग
उंबर -औषधी उपयोग
1)लहान मुलांमध्ये गाल सुजली असता त्यावर उंबराच्या चिकाचा जाड लेप लावावा.
2)कोणत्याही गाठी वर उंबराच्या चिकाचा लेप लावावा त्या गाठी कमी होतात.
3) लहान मुलांना आव झाली असेल तर उंबराच्या चिकाचे पाच ते सहा थेंब साखरेत एकत्र करून खाण्यास द्यावे.
4)उंबराच्या पानावरील फोड वाटून त्याची चटणी व मध साखर हे औषध दिवसातून दहा ते बारा वेळा घेतले असता तोंड आले आहे ते कमी होते.
5)उंबराची पिकलेली फळे खडीसाखर सोबत रोज सकाळी खाल्ल्यास शरीरातील उष्णता कमी होते.
6)सारखी तहान लागत असेल तर उंबराचे साल किंवा कच्ची फळे पाण्यात उगाळून दिली असता तहान कमी होते.
7)खोकला लागला असता उंबराचे चिक टाळूवर लावले असता खोकला कमी होतो.
8)लघवीची आग होणे, तिडीक लागणे ठणका,लघवीच्या जागेवरील जखम, इत्यादीवर उंबराच्या सालीचा काढा घेतला असता फायदा होतो.
9)उंबराच्या सालीच्या काढ्याने जखम धूतली असता ती लवकर बरी होते.
10)गोवर व कांजण्या या आजारांमध्ये उंबराच्या सालीचा फायदा होतो.
11)औदुंबर जल हे औषध पोटशूळ वरती उत्तम औषध आहे.
दोन ते तीन थेंब औषध सकाळी व संध्याकाळी पाण्यातून घेतली असता उदर शूल कमी होते.उंबराच्या झाडाच्या मुळापासून हे औषध मिळते.
12)डायबिटीस वर उंबराची फळे =
मधुमेहाच्या रुग्णावर उपचार करताना मी अनेक वेळा रुग्णांना "वसंत कुसुमाकर" या रस औषधी चा वापर केला या औषधामुळे खूप जणांची शुगर कमी झाली व रुग्ण बरे झाले पण तसाच फायदा उंबराच्या कच्च्या फळांचे चूर्ण करून वापरले असता मिळू लागला त्यामुळे कमी खर्चामध्ये डायबिटीज चा पेशंटचे उपचार सहज शक्य झाले.
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment