नाभी किंवा बेंबी वर तूप लावण्याचे फायदे

 बेंबी मध्ये तेल घातल्याने कुठले फायदे होतात?

गुडघेदुखी , सर्दीपडसे तसेच त्वचाविकार. यामुळे त्रस्त असाल तर रात्री झोपण्यापूर्वी बेंबीजवळ वेगवेगळ्या तेलांपैकी विशिष्ट तेल लावून झोपले तर अक्षरशः चमत्कारीक फायदे दिसतात. ही तेले नेहमी आपल्याकडे असतात. पण बेंबी मध्ये दोन तीन थेंब टाकून, बेंबीच्या जवळ फक्त दोन तीन थेंब लावून झोपल्यास बरेच विकार चुटकीसरशी दूर होऊ शकतात. मात्र कोणत्या तेलामुळे कोणते रोग बरे होतात त्याची माहिती फारशी कुणाला नसते.


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


1)सांधेदुखी असेल, ओठ फाटले असतील तर सरसोंचे (मोहरी)तेल घेऊन त्याचे दोन तीन थेंब बेंबीत टाकावेत,दोन थेंब बेंबीजवळ लावायचे. हा उपाय करताना थोडा चमत्कारीक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे. त्यामुळे सांधेदुखी आणि ओठ फाटने कायमचे बरे होईल.


2. ). सर्दी-पडसे तर कधीही होते. काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही. पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये (homeopathy remedies). बुडवून तो आपल्या बेंबीजवळ फिरवायचा.सर्दीपडशावर हा रामबाण इलाज आहे. करून पहाच एकदा. जुन्यातील जुनी सर्दीही या लहानशा उपायाने बरी होते.


3) मुलगी असो की मुलं तारुण्यात चेहऱ्यावर मुरुमे येणं ठरलेलं आहे. फार त्रास होतो त्यावेळी. पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोडय़ा थेंबांनी बेंबीभोवती मालीश करा. यामुळे मुरुमे तर गायब होतीलच, पण त्याबरोबरच त्वचाही डागविरहीत आणि सुंदर दिसू लागेल.


4). चेहरा स्वच्छ, चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात. पण त्यावरही सोप्पा उपाय करून पाहा. बदामाच्या तेलाचे दोन तीन थेंब टाकून,काहीथेंब बेंबीतबेंबीभोवती लावून पहा. झटपट परिणाम दिसेल.चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल.


5) एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टका,काही थेंब बेंबीजवळ लावून हळुवार हाताने मसाज करायचा. या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणताही विकार असेल तर तो बरा होईल. 🌸🌸🌸🌸🌸🌸


6) त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात. पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान ,देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन दोन तीन थेंब बेंबीत टाकून,काही थेंब बेंबीजवळ लावायचे.त्वचा अगदी छोटय़ा बाळासारखी मऊ होईल. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


7) मूळव्याध, भगेंदर, गॅस,पोट गच्च राहणे,पोटात जडपणा असणे,पोट साफ न होणे ,गुडघे दुखणे साठी नाभीमध्ये एरंड तेल वापरल्यास खूपच फायदा होईल. 🌸🌸🌸🌸🌸


माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ बेंबीशी संलग्न असते. त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो. 🌹🌹🌹🌹🌹.


टिप---दररोज संध्याकाळी झोपतांना प्रथम 2-3 थेंब तेल नाभीमध्ये टाकावेत. बोटाने थोडा मसाज देऊन परत 2-3 थेंब टाकावेत आणि झोपून जावे.


नाभी-बेंबी वर देशी तूप लावल्याने मिनिटात दूर होतात अनेक शारीरिक समस्यानाभी ज्यास आपण बेंबी असं देखील बोलतो तर इंग्रजी मध्ये बेल्ली बटन बोलतात. नाभी ही आपल्या पोटाच्या मध्ये भागी असते. एक शिशु आपल्या आईच्या पोटामध्ये यांच्या मदतीने आई सोबत जोडलेला असतो आणि यांच्या मदतीने त्याला पोषण आणि ऑक्सिजन मिळते. नाभी आपल्या शरीराचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

 नाभी किंवा बेंबी वर तूप लावण्याचे फायदे काय असतात? 


नाभी वर तूप लावल्यामुळे त्वचेच्या संबंधित अनेक समस्या, केस गळणे, गुडघे दुखी आणि इत्यादी प्रकाराच्या समस्यांमध्ये आराम मिळू शकतो. होय जर आपल्या नाभी वर नियमित तूप लावले तर आपल्याला अनेक समस्या पासून आराम मिळू शकतो. खरंतर नाभी मध्ये 70 हजार पेक्षा जास्त रक्त नलिका असतात ज्या आपल्या शरीराच्या रक्त धमनीला जोडलेल्या असतात. त्यामुळे नाभीला तूप लावल्याने आपल्या शरीराला लाभ मिळतो.


 त्वचे संबंधित फायदे : 


जर नाभीवर तूप लावून मालिश केली तर यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो आणि आपली त्वचेतील ओलावा टिकून राहतो. त्वचेतील मॉइश्चर सोबतच चेहरा टवटवीत होतो आणि चमकदार बनतो.


 केस गळणे :


 रात्री झोपण्याच्या अगोदर नाभी वर देसी तूप लावलं तर केसांवर त्याचा चांगला परिणाम होतो आणि केस मजबूत होतात आणि त्यांचे गळणे बंद होते.


 गुडघे दुखी मध्ये आराम :


 गुडघे दुखीची समस्या झाल्यास आपण घरगुती देसी तूप हलकेसे गरम करून त्यास नाभीवर लावावे. असे केल्याने याचा सरळ परिणाम गुडघे दुखी वर होतो आणि या वेदने पासून आराम मिळतो.


 फाटलेल्या ओठांना नरम बनवतो :


 नाभी मध्ये तूप लावण्याचे जे इतर फायदे आहेत त्यामध्ये ओठांना मिळणारा फायदा देखील आहे. थंडीच्या दिवसात लोकांचे ओठ फाटतात त्यांनी रात्रीच्या वेळी झोपण्याच्या अगोदर नाभी वर तुपाने मालिश करा. सकाळ पर्यंत ओठ चांगले होतील.


 बद्धकोष्ठ मध्ये आराम :

 बद्धकोष्ठचा त्रास झाल्यास आपण नाभी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावर तुप लावून काही वेळ मालिश करा. असे मालिश केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल आणि बद्धकोष्ठची समस्या दूर होईल.


 सर्दी मध्ये आराम :


 सर्दी झाल्यावर देखल नाभीवर तूप लावल्यास सर्दी मध्ये आराम मिळतो. आपल्यास वाटल्यास तुपाच्या ऐवजी आपण कापसाच्या मदतीने अल्कोहल देखील लावून सर्दी पासून आराम मिळवू शकता.


 शरीर कंप होणे :


 वय वाढल्यानंतर वृद्ध लोकांचे शरीर कंप होण्यास सुरुवात होते ज्यामुळे वृद्ध लोकांना समस्याच होते. जर ही समस्या झाल्यास नाभी वर देसी तूप लावून नाभी आणि आसपास मालिश केल्याने ही समस्या दूर होऊ शकते.


 मासिक धर्म :


 मासिक धर्म दरम्यान वेदना झाल्यास स्त्री आपल्या नाभीवर तूप किंवा ब्रांडी लावू शकतात. असे केल्याने त्यांच्या वेदना दूर होतील.


 डोळ्यांचा कोरडेपणा दूर करणे :


 अनेक लोकांचे डोळे कोरडी होतात ज्यामुळे डोळ्यात जळजळ होते. पण देसी तूप कोमट करून नाभी वर लावल्याने डोळे कोरडे पडण्याची समस्या दूर होते आणि डोळ्यांची नजर चांगली होते.


 पिंपल्स आणि डाग दूर होतात :


 अनेक लोकांना पिंपल्स आणि चेहऱ्यावर डाग होण्याची समस्या असते. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याची सुंदरता कमी होते. नाभी वर रात्री झोपण्याच्या अगोदर देसी तूप लावलं तर यामुळे पिंपल्स आणि डाग यांच्यावर परिणाम होतात आणि यांच्या पासून सुटका मिळते.


आनंदी रहा, निरोगी रहा!!


संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय