वजन कमी होणेसाठी.- घरगुती उपचार

 


वजन कमी होणेसाठी.- घरगुती उपचार


अत्यंत साध्या सोप्या व जुन्या पध्दतीने वीनामुल्य वजन कमी कसे करता येते ते पाहुया. जेवणाचे काही बदल आपणांस वजन लवकर व कायमस्वरूपी कमी करता येऊ शकते आणि तेही कोणत्याही प्रकारचे दुष्परिणामा शिवाय. 


१) नाष्टा किंवा जेवणात कोणतेही प्रकारचे लिक्वीड पदार्थ घेऊ नये. उदा. चहा, दुध, डाळ, ताक, पातळ भाजी, कढी व इतर...!! 

२) नाष्टा किंवा जेवण जाल्यानंतर १ तासांनी वरील लिक्वीड पदार्थ घेऊ शकता.

३) नाष्टा किंवा जेवणाच्या १ तास आधी व १ नंतर पाणि पीऊ नये.

४) पोळी, भाकरी, चपाती सोबत सुकी भाजी खावी.

५) जेवण सावकाश व हळुहळु करावे.

६) जेवण झाल्यावर गुळ, सौफ, ओवा यापैकी काहीही अगदी थोडे घ्यावे.

७) ताक पिताना त्यात थोडे जीरेपुड टाकुन प्यावी. 

८) ज्यांना दुपारी जेवणानंतर झोपण्याची सवय आहे त्यांनी शक्यतो डाव्याकुशीवर झोपावे.

९) रात्रीचे जेवणानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये मिरीपुड व मिठ टाकुन प्यावे. ( चिमुटभर ) 

१०) रोज सकाळी अनोश्यापोटी १ चमचा तुप घ्यावे. 

११) किमान ८ तास शांत झोप होणे आवश्यक. 

१२) रात्री ८ नंतरचे जेवण बंद केल्यास परिणाम त्वरीत जाणवतात. 


वरील काही नियम पुर्णपणे पाळले तर वजन लवकर कमी होण्यास मदत होते शिवाय कमी जालेले वजन पुन्हा वाढत नाही. जेवण करताना कमी बोलावे, जमिनीवर बसुन जेवल्यास उत्तम, मैदा ,बेसण, साखर यांचे पदार्थ कमी खावे. 


असे अजून बरेच उपाय आहेत, पुन्हा सांगितले जातील..


निरोगी रहा आनंदी रहा 🙏🏼

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय