कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business

 कृषी हा व्यवसाय समजावा- Treat Agriculture as a Business


बऱ्याच महिन्यानंतर मागील आठवड्यात फिल्ड मध्ये जाण्याचा योग आला आणि बऱ्याच शेतकरी मित्रांबरोबर चर्चा करण्याचा झाली. सहज शेतामध्ये आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्या एका शेतकरी मित्राने विचारले कि, शेतकरी शेती योग्य रीतीने करीत नाही व आजकाल शेती परवडणारी राहिली नाही. याचे नेमके कारण काय असावे ?? असा प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या अंदाजाने सांगितले कि, असे असण्यामागचे कारण कदाचीत असे असावे कि, शेतकरी अनपड/ अडाणी आहे, किंव्हा शेतकरी आळसी आहे, त्यामुळे त्याला कितीही शिकविले किंव्हा माहिती असली तरी आळसीपणामुळे व्यवस्तीत शेती करीत नाही.

त्या शेतकऱ्याचा प्रश्न आणि त्याचे अंदाज हे त्यांच्या विचारांनी बरोबर आहेत, किंबहुना भारतातील बऱ्याच लोकांचा हाच समाज आहे (खासकरून पांढरपेशी लोकांचा) कि, भारतातील शेतकरी अडाणी व आळसी आहे. परंतु हे खरे असेल काय ?? हा प्रश्न कायम राहतो....

मग वरीलप्रमाणे विचार केल्यास, 

१) शेतकरी जर अडाणी असता तर, भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतीचे उत्पादन होते. किंबहुना बऱ्याच पिकांमध्ये आपला भारत देश जगात नंबर १ वर आहे. हे तर प्रत्येकाला मान्य करावे लागेल कि, सुशिक्षित व  उच्चशिक्षित बोटावर मोजण्यासारखे शेतकरी आहेत. मग आपला शेतकरी अडाणी असता तर इतके उत्पादन कसे होऊ शकते.....   ह्यातून त्याचे उत्तर मिळते.   

२) शेतकरी जर आळसी असता तर, आपल्याला रोज नवनविन प्रकारच्या भाज्या/ तरकारी वर्षभर उपलब्ध होते, ती कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही. ती पिकवायला शेतकरी दिवस-रात्र मेहनत करीत असतो. कधी कधी दिवसा लोडशेडिंग असेल तर रात्रोला जाऊन पिकाला पाणीपुरवठा करावा लागतो. एखाद्या नोकरीवाल्याला म्हटले कि, ऑफिस टाइमिंग संपल्यानानातर अर्धा तास काम करा, तर आपल्याला माहिती होणार कि त्यांची काय प्रतिक्रिया असते (अर्थात काही नोकरीवाले वगळता) ...... मग कोण म्हणणार कि, शेतकरी आळसी आहे... 

मग प्रश्न पूर्ववत येतो कि, शेतकऱ्यांना शेती का परवडत नाही??

वरील प्रश्नाचे कारण मला मुख्यत्वे असे वाटते कि, आपला शेतकरी बिजनेस माईन्डेड नाही. म्हणजेच साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपण शेतीकरिता १ रुपया जर खर्च करीत असू तर, त्या १ रुपयाचे मला १.५ रुपया किंव्हा २ रुपये करायचे आहेत, आणि ते करण्याकरिता मला काय उपाय योजना कराव्या लागणार, कोणाला भेटावे लागेत, काय टेस्ट कराव्या लागणार, शेतीला लागणारे साहित्य, बी- बियाणे कुठून आणावे लागणार,  ह्या सर्व गोष्टीवर शेतकरी विचार करेल आणि कोणत्याही परिस्थितीत पाहिजे तसा नफा मिळवू शकणार. जसे इतर बिजनेस मध्ये होत असते.

साधा पानटपरी वाला सुद्धा हिसाब लावत असतो कि, रोज किती पान / गुठखा विकायचा, गुटख्या बरोबर इतर काय वस्तू ठेवायला पाहिजे, जेणेकरून रोजचे इतके-इतके रुपये फायदा मिळणार आणि त्याचा व्यवसाय कसा फायद्याचा होणार, त्यासाठी तो निरंतर प्रयत्नशील असतो......(गुठख्याचे उदाहरण फक्त संधर्भाकरिता दिले आहे.)

मग ज्या दिवशी आपला शेतकरी शेतीला बिजनेस म्हणून सुरु करेल, त्या दिवशी त्याची शेती फायद्याची राहील आणि पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळवू शकेल. ते करण्याकरिता आजकाल शेतीमध्ये सर्व प्रकारचे तंत्रज्ञान व ते पोहोचविणारी यंत्रणा नक्कीच उपलब्ध आहे.

*********        


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय