पांगारा ( पारिभद्र,मन्दार, रक्तकुसूम):-


पांगारा ( पारिभद्र,मन्दार, रक्तकुसूम):-

हा काटेरी वृक्ष आहे. यामध्ये सफेद आणि तांबडा असे दोन प्रकार आहेत. त्यातील सफेद दुर्मिळ आहे. तांबडा बहूतेक ठिकाणी जसे रस्त्याच्या कडेला, डोंगरात, समुद्रालगतच्या जंगलात आढळतो. शोभेसाठीही याची लागवड करतात. तांबड्या पांगार्यास मोठी, लाल रंगाची व गंधरहित फूले येतात. फुलांमध्ये मध भरपूर असल्याने अनेक पक्षी, भुंगे नेहमी याच्याजवळ असतात. शेंगा काळ्या रंगाच्या, दोन ते तीन इंच लांब व वाकड्या असतात. फांद्यांवर शंकुच्या आकाराची बारीक काटे असतात. यास काटे असल्याने कंपाऊंड साठीही लागवड करतात. याची साल  गुळगुळीत, करड्या किंवा पिवळट असते. याचा लाकूड हलके असते. याची फांदी लवकर रुजते व वाढही लवकर होते. त्यामूळे लागवड करणे सोपे जाते.


यामध्ये कटु, उष्ण, वात, कफ नाशक, शोधनाशक, मेदनाशक, कृमीनाशक, ज्वरघ्न, पित्तघ्न, इ. तसेच कर्णरोगावर उपयोगी असे गुणधर्म असतात.


औषधी उपयोग:-


काविळीवर पांगार्याच्या सालीचे चूर्ण  तांदूळाच्या धुवणातून द्यावे.


पोटातील कृमीवर पानांचा स्वरस दहा मिली. प्रमाणे द्यावा.


झोप येत नसल्यास याच्या सालीचे चूर्ण अल्प प्रमाणात पाण्यातून द्यावे.


सांधेदुखी, सांध्यांना सूज येते अशावेळी याची साल पाण्यात भिजवून बारीक वाटून लेप करावा.


व्रण शोधावर पांगार्याची पाने पाण्यात वाटून लेप करावा. 


वातरक्तावर सालीचा रस गायीचे दूध व खडीसाखर घालून द्यावा.


तापामध्ये याच्या सालीचा काढा करुन द्यावा.




संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय