गुलाबी बोंडअडी - फेरोमोन ट्रॅप


गुलाबी बोंडअडी ही कापूस पिकाची प्रमुख कीड आहे. गुलाबी बोंडअडी ही कीट विविध हवामान, विविध परिस्थितीशी अत्यंत जुळवून घेतो आणि गुलाबी बोंडअडीच्या अळ्या कापूस बोंडात/ बियाण्यात लपुन बसतात व त्यात ते संरक्षित असतात आणि कित्येक महिने जिवंत राहतात. 

एका हंगामापासून दुसऱ्या हंगामात ह्या कीडीचा संचार बोंडे, माती आणि वनस्पतींच्या अवशेषातून होत असतो.  

ही एकमेव कीड आहे, जी कापूस वेचणीच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात दिसून येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेत अळ्या ह्या पात्यांमध्ये छिद्र करतात आणि आतील भाग खातात, ज्यामुळे आतून बोंडे सुकून जातात आणि कोरडे होतात. नंतर ह्या अळ्या कळ्या आणि बोंडावर हल्ला करतात. 

अळ्यांनी खराब केल्यामुळे संक्रमित फुलांच्या कळ्या पूर्णपणे उघडण्यास अपयशी ठरतात, ज्यामुळे डोंबकळ्याचे (रोझेट ब्लूमचे) स्वरूप येते, आणि उत्पादनात घट होते. 

अडी ही बोंडामध्ये छिद्रे करून नुकसान करतात आणि बिज आणि धागा नष्ट करतात. संक्रमित बोंडे बुरशीजन्य रोगाच्या संसर्गास आमंत्रण देऊन रोगग्रस्त होतात.  

ह्या गुलाबीबोंड अडीच्या बंदोबस्तासाठी फेरोमोन ट्रॅप अतिशय महत्वाचे कार्य करतात. वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे फेरोमोन ट्रॅप कापूस पिकात उभे करावे लागतात आणि त्यात गुलाबी बोंडअडीला (पिंक बॉलवर्म) आकर्षित करण्याकरिता  पेक्टिनोफोरा गॉसीपीला चे ल्यूर वापरले जातात. हे गुलाबी बोंड अडीच्या नर कीटकांना आकर्षित करून बोंडअडीचे नियंत्रण करीत असते. हे ल्यूर दर 4 आठवड्यांनी बदलले पाहिजे, जेणेकरून त्यातून येणारा गंध नर कीटकांना आकर्षित करून त्यांना सापळ्यात पकडणार.

फेरोमोन ट्रॅपचा वापर दोन प्रकारे होत असतो, १) आपल्या शेतात किती प्रमाणात गुलाबी बोंड अडीचे प्रमाण आहे त्याचा आपल्याला अंदाज बांधता येतो आणि पुढील उपाय योजना करता येतात. तसेच २) गुलाबी बोंड अडी वर नियंत्रण करण्याकरिता फेरोमोन ट्रॅपचा योग्य वापर होतो. 

गुलाबी बोंडअडीवर नियंत्रण करण्याकरिता फेरोमोन ट्रॅप हे खूप प्रभावी यांत्रिक पद्धत आहे.

फेरोमोन ट्रॅप  शेतात उभे करतांना एक काळजी घेणे आवश्यक आहे कि, ते सरळ असावे जेणेकरून पावसाचे पाणी त्यात जाणार नाही आणि ल्युर खराब होणार नाही. तसेच ल्युर लावतांना त्याला हात लागू नये अन्यथा गंध येणार नाही आणि गुलाबी बोंडअडीचे नर पतंग त्याकडे आकर्षित होणार नाही.  

Comments

  1. धन्यवाद सर खुप छान चागली माहीती पाठवता

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय