पक्षी थांबे - नैसर्गिक कीड नियंत्रणाची पारंपारिक व मोफतची पद्धती

 


कोणत्याही पिकात नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण करून आपण रासायनिक फवारणी वरील खर्च कमी करू शकतो त्याचबरोबरच अतिशय महत्वाचे आहे ते पर्यावरणाचा आणि मानवी आरोग्याचा तसेच जनावरांच्या आरोग्यावर होणारे परिणाम आपण टाळू शकतो व आपली जमीनिची सुपीकता जास्त काळ टिकवून ठेवू शकतो. 

नैसर्गिक कीड नियंत्रनाचा असाच एक प्रयोग म्हणजे- पक्षी थांबे

पक्षी थांबे म्हणजेच, आपल्या शेतामध्ये पक्ष्यांना विश्राम करण्याकरिता बसण्याची व्यवस्था करणे, जेणेकरून पक्षी आपल्या शेतात येऊन बसणार आणि शेतात पिकावर असलेली कीड, त्याची पतंगे यांना खाणार, कारण ती त्यांची भक्ष आहेत. असे केल्यास बऱ्यापैकी आपल्याला किडीवर नियंत्रण करता येऊ शकतो आणि किडींची पुढची पिढी खूप मोठ्या प्रमाणात कंट्रोल होत असते. 

अश्याप्रकारचे पक्षी थांबे उभारण्यास काहीही खर्च येत नाही.

साधारणता पिकापेक्षा थोड्या उंच काठ्या घेऊन त्याला टी- आकारात बांधू शकतो. पिकापेक्षा उंची जास्त असल्यामुळे पक्ष्यांना दूरवरचे किडे पण दिसणार आणि ते त्याला अलगत खाऊ शकणार. 

ज्या ठिकाणी काठ्या कमी प्रमाणात उपलब्ध आहेत त्या ठिकाणी एकेरी काठीवर सुद्धा टी- आकारात एक आडवी काठी बांधता येयील. 

शक्य असल्यास पक्षी थांब्याला पाणी ठेवण्याकरिता छोटे भांडे लावल्यास अती उत्तम, जेणेकरून पक्ष्यांना तिथेच पाणी मिळेल आणि जास्तीत जास्त वेळ ते तिथे राहून जास्तीत जास्त किड्यांना फस्त करू शकणार.





Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय