भूक लागत नाही....या समस्याचे उपाय

 भूक लागत नाही....या समस्याचे  उपाय 


               भूक न लागणे, हा सुद्धा एक आजाराच आहे. परंतु, यामध्ये काळजी करण्यासारखे काहीच नाही. यावर तुम्ही घरगुती उपाय करून सहज मात करू शकता. शिवाय, या उपायांमुळे तुम्हाला चांगली भूक लागू शकते.


       करा हे उपाय


१.     हिंगाष्टक चूर्ण गरम पाण्याबरोबर, ताकामध्ये घालून किंवा भाताच्या पहिल्या घासाबरोबर तूपासोबत खाल्ल्यास चांगली भूक लागते. शिवाय अन्न पचनही होते.


२.     सुंठ, मिरी, दालचिनी, पिंपळीसारखे भूक वाढवणाऱ्या पदार्थांचे चूर्ण करुन मधाबरोबर चाटल्यास भरपूर भूक लागते.


३.      जेवणात चटणी आवश्य खा. लसूण, पूदिना, भोपळ्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, आले तीळाची चटणी खावू शकता. यामुळे पचन चांगले होते. पोटातले जंत मरतात.


४.      जेवणात साजूक तूप आणि जेवणानंतर ताक घ्या. यामुळे भूक नक्की वाढते.


५.       गरम पोळीला तूप लावून त्यावर लसूण किंवा पुदिन्याची चटणी खा.


६.       बैठे काम करत असाल तर नियमित व्यायाम करा. किमान रोज १२ सूर्यनमस्कार घालावेत. भरपूर चाला.


७.        रात्री उशिरा जेवणाच्या ऐवजी सांयकाळी लवकर जेवा.


८.        टी. व्ही. पाहात किंवा मोबाईल पाहात जेवण करू नका.


९.         जेवताना मन प्रसन्न ठेवा. यामुळे भूक जागी होते.


१०.       जेवण झाल्यावर ओवा, तीळ आणि सैंधव मीठ हे एकत्र करुन अर्धा किंवा एक चमचा खा.

संधर्भ- 

वैद्य श्री. माळाकोळीकर, 

नाडी परीक्षण तज्ञ

श्रीराम आयुर्वेदिक,  आरुर्वेद तज्ञ. 

 मोबाईल क्रमांक- 7350911888

अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय