डोळेदुखीवर काही घरगुती उपाय
डोळेदुखीवर काही घरगुती उपाय
डोळेदुखी बऱ्याचदा केवळ डोळे लाल राहण्यावरही थांबते. अगदी डोळा ठुसठुसत नाही. कोणत्याही प्रकारची डोळेदुखी असू शकते. मग अशावेळी तुम्ही घरच्या घरीही डोळ्यांच्या या दुखण्यावर इलाज करू शकता.
मध (Honey)
मध हे जीवाणूविरोधी आणि नैसर्गिक घटक असणारे औषध आहे. मधामध्ये आढळणारे घटक हे डोळ्यांमध्ये लालसरपणा कमी करून डोळ्यांना अधिक थंडपणा देतात. तसंच मध हे सर्वांच्या घरातील एक अविभाज्य भाग असतो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मध उपलब्ध असते. अतिशय सोपा आणि खिशाला परवडण्याजोगा हा उपाय आहे. डोळे दुखणे घरगुती उपायांमधील हा सोपा उपाय आहे.
डोळ्याच्या प्रभावित क्षेत्रामध्ये मधाचा एक थेंब टाकावा
सुरूवातील जळजळ झाल्यासारखे वाटेल पण नंतर तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल
डोळ्याला त्वरीत आराम हवा असेल तर तुम्ही मधाचा वापर करून घेऊ शकता .
गुलाबपाणी (Rose Water)
डोळ्यांची जळजळ, डोळे दुखणे आणि डोळ्यांमध्ये खाज येत असेल तर गुलाबपाणी हा त्यावरील उत्तम उपाय आहे. यामध्ये विटामिन ए आणि सी चे प्रमाण आढळते. तसेच डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी लागणारे अँटीइन्फ्लेमेटरी घटक फायदेशीर ठरतात. डोळ्यांचा लालसरपणा पटकन कमी करायचा असेल तर गुलाबपाणी हा सोपा आणि उत्तम उपाय आहे. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. केवळ तुम्ही ज्या भांड्यात गुलाबपाणी घ्याल ते भांडे स्वच्छ असायला हवे.
आयड्रॉपर घेऊन गुलाबपाण्याचे साधारण 3-4 थेंब तुम्ही डोळ्यात घाला
थोडा वेळ डोळे बंद करून बसा
काही वेळानंतर पुन्हा साधे पाणी आणि गुलाबपाणी मिक्स करून डोळ्यांवर पाण्याचा हबका मारून डोळे स्वच्छ धुवा
दोन ते तीन दिवस तुम्ही ही प्रक्रिया केल्यास, तुम्हाला डोळ्याचे दुखणे जाणवणार नाही .
काकडी (Cucumber)
काकडी ही त्वचेसाठी थंडावा निर्माण करते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काकडीचा उपयोग डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि लालसरपणा घालविण्यासाठीही होतो. त्वचा सुंदर राखण्यासाठी जितका काकडीचा उपयोग होतो तितकाच डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठीही होतो. काकडीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेवोनॉईड्स हे डोळे दुखणे आणि डोळ्यांची जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच यातून लवकरात लवकर बरं होण्यासाठी काकडीचे तुकडे मदत करतात. याचा कोणताही दुष्परिणाम डोळ्यांवर होत नाही.
काकडीचे स्लाईस कापून घ्या आणि ते काही वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवा
त्यानंतर डोळ्यांवर साधारण 10 मिनिट्स ठेवा
असं साधारण अर्धा तास करत राहा
तुम्हाला त्वरीत डोळ्यांवर परिणाम जाणवेल.
कोरफड (Aleo Vera)
कोरफड जेल ही अत्यंत उपयुक्त ठरते. अगदी त्वचेपासून ते सौंदर्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी कोरफड जेलचा उपयोग करून घेता येतो. नैसर्गिक मॉस्चराईजर म्हणून काम करणारी कोरफड जेल ही डोळ्यांवरही उपयुक्त ठरते.यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्सचाही भरणा असतो. त्यामुळे फ्री रॅडिकल्सपासून सुटका आणि डोळ्यांच्या दुखण्याशी लढा देण्यासाठी ही उत्तम आहे. घरगुती उपायांपैकी उत्तम उपाय म्हणून कोरफडकडे तुम्ही पाहू शकता. त्वरीत डोळ्यांचे दुखणे बरे होण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करून पाहा.
कोरफडचे जाड पान आणावे. त्याची साल काढून टाकावी
त्यातून स्वच्छ जेल काढून घ्यावे आणि स्वच्छ भांड्यामध्ये काढून ठेवावे
तुमचे हात साबणाने धुवा आणि ग्लोव्ह्ज घाला
त्यानंतर बोटाला कोरफड जेल लावा आणि त्याने डोळ्यांना ती जेल हलक्या हाताने लाऊन घ्या
साधारण एक तास तसेच बसून राहा
नंतर स्वच्छ पाण्याने डोळे धुवा आणि कोरड्या टॉवेलने डोळे पुसा
आठवडाभर ही प्रक्रिया करा आणि सुंदर आणि जळजळमुक्त डोळे मिळवा.
घरगुती उपाय करूनही डोळ्यांची जळजळ, डोळेदुखी अथवा लालसरपणा कमी होत नसेल तर नक्कीच डोळ्यांच्या आजार हा गंभीर आहे हे तुम्ही वेळेवर लक्षात घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
संधर्भ-
वैद्य श्री. माळाकोळीकर,
नाडी परीक्षण तज्ञ
श्रीराम आयुर्वेदिक, आरुर्वेद तज्ञ.
मोबाईल क्रमांक- 7350911888
अधिक माहिती करिता वरील नंबरवर संपर्क करावा.

Comments
Post a Comment