कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व

 


कंबरमोडी_ आयुर्वेदीक महत्त्व

माझ्या बालपणीच्या अनुभवातून,


साधारणतः ३-४ वर्गात असतानाची गोष्ट आहे. लहान असतांना सुट्टीच्या दिवशी आजी बरोबर शेतात जायचे आणि झाडाखालील थंड हवेत खेळत बसायचे. 

असेच लहान भावाबरोबर विहीर तयार करण्याचा खेळ खेळत असतांना, अचानक भावाने हातावर विळा  मारला आणि त्यामुळे हात कापून पूर्णपणे रक्तबंबाळ झाला. मोठं मोठयाने रडणे सुरु झाले आणि लगेच आजी धावत आली. रक्त पाहून आजीने लगेच जवळचा कंबरमोडीचा पाला तोंडला व त्याला थोडे बारीक करून जखमेवर बांधून दिले. आणि साधारणतः २-३ दिवसाचे आत घाव भरून आला व जखम पूर्णपणे बारी झाली. कोणत्याही डॉक्टर कडे जायची गरज  भासली नाही. ही होती कंबरमोडीच्या अर्काची कमाल.

मित्रांनो हि कंबरमोडी आपल्या आजूबाजूला, शेतात, भारतातील कुठल्याही भागात बघायला मिळते. आपण बरेचदा शेतात काम करतांना, किंव्हा घरी काम करतांना काही धारदार अवजार लागल्याने जखम होत असते. त्यावेळेस नक्कीच तुम्हाला याचा वापर करून घरगुती उपायाने जखम भरून काढता येईल. 


कधी वापर केला तर अनुभव जरूर सांगा. 

धन्यवाद...  


याबरोबरच वैध साहेबांचे अनुभव खालीलप्रमाणे आहेत,

नाव माझ दगडी वा कुटकुटी/

त्वचेच्या नको मला कटकटी// 


ऐक रुग्ण तपासणी साठी आला असता त्याची परिस्थिती बघुन मला 90% जळालेली केस असावी असे वाटले.

त्वचा संपुर्ण काळी अंगास दुर्गंधी अनेक जखमा त्यातून पूमीश्रीत पाणीवाहतय.

अंगावर ऐकहि कपडा नाही ऐवढा प्रचंड दाह.

असाध्य आजार वाटला म्हणून रुग्णास गाडीतच राहुद्या व मागील ट्रिटमेंट फाईल त्याच्या नातेवाईकाला आणायला सांगीतली.

फाईलमधून सिव्हीअर डरमाटायटिस /अॕटोपीक डरमाटायटिस निदान होत.

खुप प्रयत्न झाले.शेवट तुमच्याकडे आलोय ऐवढच नातलग बोलला.त्वचारोगाचा ऐवढा जास्त शरीरावर परीणाम मी पहिल्यांदाच बघीतला होता.कदाचित्  औषधींचीही उष्णताहि जास्त झाली असावी .

मीही अगदि शेवटचा उपाय म्हणून गोमुत्रासोबत कुटकुटि खायचा सल्ला दिला.

व अंगाची आग होतो म्हणून उंबरजल व चंदनपाने खाण्यास सांगीतले.

साधारणपणे दोन वर्षाने तो रुग्ण धोतरशर्टटोपी व ऐकदम छान अवस्थेत आला.मी ओळखणे शक्य नव्हते.तोच बोलला .की तुम्ही सांगीतलेले दगडीपाला व गोमुत्र दोन वर्षे झाले घेतोय बंद करु की चालू ठेउ.

मला त्याची पहिली परिस्थिती आठवली व आश्चर्य वाटल .अगदि सहज दिलेला शेवटचा उपाय ईतका फलदायी.

मी तेव्हापासून या दगडी /कुटकुटिच्या प्रेमात पडलो ते आजपर्यंत.

अगदि माझा गोमुत्राचा गोमय साबन करतांना झेंडु, कडुनिंब, करंज रसासोबत दगडीपाला रस गोमुत्रात टाकून मगच साबन बनतो.

त्या रुग्णाचेही आभार मानले की त्याने नित्य सांगीतले प्रमाणे  केल.

नाहीतर खुप दिवस लागतात म्हणून ट्रिटमेंट वारंवार बदलन्याची मानसीकता बर्याच रुग्णात दिसुन येते.

बर दोन वर्षे दगडीपाला खाउनही कोणताही साईडईफेक्ट्स त्या रुग्णावर नव्हता उलट त्वचेला चकाकी आली होती.

आता दगडीपाला दिसला की पाने तोडायची व वाळवून पावडर करुन ठेवायची हा माझा नित्यक्रम झालाय.

फुल तोडु नये फुलांचेयोगे दगडीपाला कुठंही झटपट येतो.

ह्याची पावडर तुम्ही नित्य ऐक चिमुट घेउ शकता. 


(ही तुम्हाला रस्त्याच्या कडेला डोंगरावर शेताच्या बांधावर कुठं ही दिसते)

आता राउन्डअप व फवारण्यामुळे  बांधावर ही दिसायची कमी झाली .

हिचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.

तरीही शोधली तर लगेच सापडेल अशी वनस्पती  हीला खूप नावे आहेत .

दगडी ,गुडघेमोळी ,कुटकुटि,ऐकदांडी,कंबरमोडी, कुडमुडी, टणटणी ,जखमजोडी अशी अनेक नावे असलेली ही वनस्पति आम्ही जखम झाल्यास लावत असे.तीच्या आयोडीनयुक्त गुणामुळे जखम लगेच भरत होती.आता तर जरा लागले की लगेच दवाखाने करुन प्रतिकार शक्ती कमी करुन बसलोय आपण.

ही वनस्पती गोमुत्रासोबत खाल्यास रक्तदोषास उत्तम व त्वचा सुंदर राहते.

रक्त सकस होण्यासाठी हीचा उपयोग अप्रतिम आहे.

रक्तदोषामुळे त्वचारोग फार बळावत आहे खरुज, कंड ,व्रण त्वचेचा रंग बदलणे ,गजकर्ण सोरीआॕसीस असे अनेक वाढतच आहे.हे आजार होउ नये यासाठी निसर्गाने ही वनस्पती कुठंही उगवायला ठेवली नसेल ना?

आज आहारविहार सोडून वागल्यामुळे आजार वाढलेत हे सत्य नाकारुन चालणार नाही.

माझा स्वानुभव -देशी गाईचे गोमुत्रातुन दगडीपाला ,झेंडुपाला ,हराळी, पारीजातकपान, बेल पान, तुळस ,शिसमपान, उंबर पान,कडुनिंब रस व महामजिष्ट ऐकत्र करुन घेतल्यास रक्त शुद्ध होउन सामान्य त्वचारोग बरे होतात. 


बाह्यप्रयोग -गोमुत्रात पीवळाधोत्रा (बीलायत) कोरफड ,दगडी ,झेंडु,कडुनिंबपाला ,कुचला बी करंजीपान ,दुधानी ,शिसम व करविर (कन्हेर)सर्व वाटुन कींवा भीजउन 21दिवस ठेवा मग त्वचेवर लावा त्वचेला चकाकी व त्वचाविकारास आळा बसतो.[हा प्रयोग पोटातुन  चुकुनही घेउ नये.]

मग आता या पुढे हा दगडी पाला दिसला की ऐक पान धुवुन खाणे आपण कराल (कडु नसल्यामुळे चव वाईट नाही).ऐवढी गुणी वनस्पती निसर्गात वाढावी व त्यासाठी हीला खुप जपावी ही विनंती .


Comments

  1. खुप छान माहिती मिळाली सर कंबरमोडी...,🙏🙏

    ReplyDelete
  2. आमच्या कडे ह्या वनस्पतीला काळामखा म्हणतात... आज ही शेतात काम करत असताना किंवा लहान मुलांना खेळताना जख्म झाल्यास गावातील महीला ह्या वनस्पतीचा रस जखमेवर लावतात.. ह्याचे रिझल्ट खुप चांगले आहेत.
    उपयुक्त माहिती...

    ReplyDelete
  3. छान माहिती सर

    ReplyDelete
  4. आमच्या भागात या वनस्पतीला टंणटणी असे म्हणतात

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय