हेमंत ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये

 आला हेमंत ऋतू.... या ऋतूत काय खावे ? काय खाऊ नये ? 

 १. ऋतूचे नाव - हेमंत 


 २. काळ - ऑक्टोबरचा उत्तरार्ध,  नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबरचा पूर्वार्ध


 ३. दोष प्रकोप - त्रिदोष संतुलीत असतात म्हणूनच याला आरोग्यदायी ऋतू म्हणतात.


 ४. योग्य आहार रस - गोड, आंबट, खारट


 ५. अयोग्य आहार रस - कडू, तिखट, तुरट


 ६. हे खावे -  तूप, लोणी, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध घातलेली तांदळाची खीर, उडीद, खडी साखर, रबडी, मलई, मध, ऊसाचा रस, हलवा, डाळी, मोड आलेले हरभरे, मोड आलेली कडधान्ये, मूग, गहू, ज्वारी, जुना तांदूळ, आवळा, संत्रे, मिठाई, सुका मेवा, मांसाहार, च्यवनप्राश, मोरावळा, गरम पाणी, गरम अन्न

भाजी - पडवळ, वांगी, कोबी, लाल टोमॅटो, गाजर, मटार, पालक


 ७. हे खाऊ नये -  कोरडे पदार्थ, आईस्क्रिम, थंड पेय व थंड पदार्थ, चिंच, आमसूल, आंबट दही, आंबा लोणचे, पातळ पदार्थ


 ८. हे करावे -

 

👉 रोज सकाळी ब्रश झाल्यावर चहाच्या चमच्याने अर्धा चमचा हिरडा चूर्ण आणि अर्धा चमचा सुंठ चूर्ण एक कप दुधात उकळून किंवा पाण्यात काढा करुन घ्यावे.

👉 सूर्योदयाच्या आधी उठावे, रात्री जागू नये, दिवसा झोपू नये.

👉 याकाळात रात्र मोठी असल्याने सकाळी भूक लागते. म्हणून सकाळी तोंड धुवून शौचाला जाऊन आल्यावर नाष्टा करावा. 

👉 संपूर्ण शरीराला तिळाचे तेल लावावे आणि उटणे व कोमट पाणी वापरुन आंघोळ करावी.

👉 हातपाय धुण्यास कोमट पाणी, गरम कपडे, गरम अंथरुण व पांघरुण वापरुन थंडीपासून बचाव करावा.

👉 आपल्या शरीराला व प्रकृतीला योग्य असणारा व्यायाम या काळात करावाच.

👉 नेहमी पादत्राणांचा उपयोग करावा.

👉 या काळात उपाशी राहू नये किंवा अर्धपोटीही राहू नये कारण प्रदीप्त अग्नी आहुती मिळाली नाही तर शरीरातील धातूंचा नाश करतो. 

👉 रात्री उशीरा जेवणे आणि जेवणानंतर लगेच झोपणे हे करुच नये.

👉 हेमंत ऋतूत सूर्य किरणे क्षीण आणि चंद्र किरणे प्रभावी असतात. म्हणून याकाळात कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात आटवलेले दूध पिण्याची प्रथा आहे. त्याचा अवश्य फायदा घ्यावा.

👉 या ऋतूत शरीरातील दोष समस्थितीत असतात आणि अग्नी बलवान असतो. त्यामुळे खाल ते पचवाल अशी स्थिती असते. याचा फायदा घेण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा. म्हणूनच दिवाळीचा सण याकाळात आहे. त्यामुळे दिवाळीच्या परंपरागत फराळाचा आनंद घ्यावा.


 वैद्य विश्राम माळाकोळीकर

 श्रीराम आयुर्वेदिक


आनंदी रहा, निरोगी रहा

Comments

Popular posts from this blog

जमिनीचा सामू - Soil pH

पिकाला आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य (Essential Micro-Nutrients to the Crop)

शेती सुधार कायदा २०२० - शेतकरी स्तरावरील अंमलबजावणीतील आव्हाणे आणि उपाय