ज्येष्ठमध
ज्येष्ठमध*
1) हे बल्य म्हणजे शक्ती देणारे औषध आहे.
2) कोणत्याही कारणाने येणाऱ्या अशक्तपणावर हे उत्तम औषध आहे.
3) दूध तूप हे बल वाढवते पण कफ वाढतो ज्येष्ठमध बलद औषध आहे तरी कफ कमी करतो.
4) ताकत वाढवण्यासाठी ज्येष्ठमध व मध तुपातून सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी घ्यावा सात ते आठ दिवसात फरक दिसतो.
5) उष्णतेमुळे तोंडास चट्टे पडले असता (वारंवार तोंड येणे) =
20 ग्रॅम ज्येष्ठ मध + 10 ग्रॅम खडीसाखर एकत्र काढा करून त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून पिणे.
6) आवाज चांगला साफ होण्यास
ज्येष्ठ मध + मिरे यांना त्याच्याच काढयाने भावना देणे व त्याच्या गोळ्या तोंडात ठेवणे याने बदललेला आवाज सुधारतो व आवाज चांगला होतो.
7) रक्तपित्त तोंडातून / नाकातून घशात फोड येऊन पडणाऱ्या रक्तावर=
जेष्ठमध + हिरडा चूर्ण + मणूका यांचा काढा करावा व त्यामध्ये अडुळशाचा रस तूप व मध एकत्र घालून पिणे.
8) क्षय रोगी याच्या खोकल्यावर जेष्ठमध देण्याचा प्रघात आहे =
सितोपलादि चूर्ण + ज्येष्ठ मध एकत्र मधासोबत घेतल्यास खोकला सुटतो व भरलेली छाती मोकळी होते.
ज्येष्ठमध त्रिदोष शामक असल्याने
याच्या काढयाने सर्व रोगांमध्ये उपयोग होतो.
ताप येणे सारखी तहान लागणे श्वास कोरडी ओकारी या विकारात याचा फार फायदा होतो
रक्ती मूळव्याध
याचे चूर्ण गरम पाण्याबरोबर प्यावे पोट साफ होते व रक्त पडण्याचे थांबते.
9) लघवी करताना दाह होत असेल तर =
त्याचे बारीक चूर्ण व दूध व खडीसाखर सोबत द्यावे लघवी साफ होते
● ज्येष्ठ मध्यारि चूर्ण =
रक्त शुद्ध करण्यासाठी हा देण्याचा प्रघात आहे
ज्येष्ठमध + बडीशेपचे बारीक चूर्ण + गंधक + तुपात तळलेली सोनामुखी + खडीसाखर एकत्र करावे.
हे जेवणानंतर एक तासाने घेतले असता कोणत्याही प्रकारचा रोग होऊ देत नाही.
पोट साफ होते व भूक चांगली लागते व ताकद वाढते तरतरी येते.
"रक्त जीव ईति स्थिती"
शरीरातील बहुतेक करून आजार पोट बिघडल्यामुळे होतात रोज पोट साफ होणे गरजेचे असते व त्यानुसार चांगल्या रक्ताची निर्मिती होते.
यकृत व किडनीचे आजार तसेच हृदयरोग, त्वचारोग, कॅन्सर सारख्या दुर्धर रोग आजारासाठी रक्त हे कारणभूत असते.
आजार झाल्यानंतर नंतर सुद्धा या औषधाचा उपयोग चांगला होतो.
● मासिक पाळीच्या अतिरक्तस्त्राव यावर =
ज्येष्ठमधाची कांडी दुधामध्ये उगाळून यामध्ये दार्वि व खडीसाखर घालून प्यावे असे रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे.
सुज येणे व जखम यावर ज्येष्ठमध याचा लेप व परिशेक याचा वापर होतो.
● डोळे लाल होणे =
ज्येष्ठमध पाण्यात उगाळून डोळ्यात घातले असता व डोळ्यावर लेप केल्यास डोळ्याची लाली कमी येते.
वैद्य विश्राम माळाकोळीकर
श्रीराम आयुर्वेदिक
7350911888
आनंदी रहा, निरोगी रहा !!
Comments
Post a Comment